सोनी चॅनेलवर सद्ध्या एक नवीन सिरिअल चालू झाली आहे.. "ये उन दिनों की बात हैं." या सिरिअलमध्ये ९० च्या दशकातील 'लव्ह स्टोरी' दाखवली जातेय. मी ही सिरिअल बघत नाही. आजवर त्याचा एकही एपिसोड मी बघितला नाहीये. पण त्याचे प्रोमोज मात्र इंटरेस्टींग आहेत. गेल्या आठवड्यातल्या प्रोमोमध्ये एक वाक्य ऐकलं ....."ये उन दिनोंकी बात हैं जब ब्रेक अप नही सचमें दिल तुटा करता था." एकदम क्लिक झाल हे वाक्य आणि मनोमन पटलही.
त्या काळात gadgets ची तोंड ओळखही झाली नव्हती. त्यावेळी कॉलनीतल्या एखाद्या घरात असणारा टेलिव्हिजन (त्यातही तो बरेचदा 'ब्लॅक ॲन्ड व्हाईट') म्हणजे फक्त दूरदर्शन! सतत ॲडजस्ट करावा लागणारा ॲन्टेना आणि "रुकावट के लिए खेद हैं .... हे वाक्य. मोबाईल तर नव्हतेच पण लॅन्डलाईनही क्वचितच कोणाकडे असायचा. रेडिओ मात्र जवळपास प्रत्येक घरी सकाळीच चालू व्हायचा. सुट्टीचा दिवस किंवा मोकळा वेळ कॅरम, पत्ते, बुद्धिबळ किंवा मैदानी खेळ खेळण्यात संपायचा.
ही परिस्थिती 20s पर्यंत बरीच बदलली. 'ब्लॅक ॲन्ड व्हाइट'चा जमाना जवळपास संपला. घरोघरी कलर टिव्ही आणि त्यासोबत केबल नेटवर्कही आले. झी, सोनी, स्टार प्लस, प्रादेशिक यासारखी वेगवेगळी चॅनेल्स सुरु झाली. पण तरीही काही गोष्टी मात्र हळूहळू बदलत होत्या.
त्यावेळेस मुलगे आणि मुली हळूहळू एकत्र एकाच ग्रूपमध्ये येऊ लागले. तरीही बरेचदा मुलांचे आणि मुलींचे ग्रूप्स वेगवेगळे असायचे.
प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यावेळेसही .... "प्यार किया नहीं जाता बस हो जाता हैं ".... हाच फॉर्म्युला लागू होत होता. मग ते बघताक्षणी .. 'ती पहाताच बाला' वालं असो किंवा खूप दिवस एकत्र/ एकाच ग्रूपमध्ये राहून मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम असो. तिथे #क्रश वगैरे प्रकार अस्तित्वातच नव्हता.
प्रेम ही एक भावना असायची आणि ती हळूवार जपली जायची. समोर बघताक्षणी मनातली धडधड, चोरुन बघणं हे सारं अगदी सहज घडत होतं. त्यावेळचे प्रेमी आजच्यासारखे एकमेकांच्या गळ्यात पडलेले नसायचे. नजरेतून किंवा ओझरत्या स्पर्षातूनही खूप साऱ्या भावना व्यक्त व्हायच्या.
#डेडीकेटेड_सॉंग्ज हा त्यावेळेचा सगळ्यात इंटरेस्टींग प्रकार. आपल्या आवडीची खास तिच्यासाठीची गाणी निवडून त्याची #ऑडिओ_कॅसेट बनवून तिला दिली जायची.
Mobile, whats ap chat , messenger chat, IMO chat हे प्रकार अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे मनातल्या भावना कागदावर उतरवल्या जायच्या. मग वही किंवा पुस्तकातून त्याची देवाणघेवाण होत होती.
#ग्रिटिंग_कार्ड हे भावना पोचवण्याच सगळ्यात प्रभावी माध्यम होतं. #आर्चिस _गॅलरी आणि कंप्युटरचा क्लास हा एक डेडली कॉम्बो होता.
कॉलेजच्या जुन्या आयकार्डवरचा किंवा संपलेल्या परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा पासपोर्ट फोटो अलगद काढून हळूच तो त्याला किंवा तिला दिला जायचा.
फोन करतानाही #कोड_लॅंग्वेज वापरली जात होती. दोन रिंग देउन फोन कट करायचा म्हणजे 'त्याचा' किंवा 'तिचा' फोन आहे हे बरोबर समजायचं आणि मग घरातल्या सगळ्यांच्या नकळत लगेच फोनजवळ जाऊन बसायचं. हे सगळं खूप थ्रिलिंग होतं. (हा माझा वैयक्तिक अनुभव नाही जनरल ऑब्झर्वेशन आहे. कृपया गैरसमज नसावा.)
#डेट वगैरे प्रकार हळूहळू अस्तित्वात येत होते. तरीही चोरुन भेटण्यातलं थ्रिल अजूनही कायम होतं . बरेचदा 'तिच्याबरोबर' तिची मैत्रीण असायची त्यामुळे 'प्रायव्हसी' जवळपास मिळतच नव्हती.
त्यावेळेस प्रेम हे एका वेळेस एकाच व्यक्तीवर केल जात होतं. त्यामुळे जेव्हा नातं तुटायच (त्यावेळी नातं तुटायच #ब्रेक_अप होत नव्हता) तेव्हा खूप दु:ख व्हायचं. "आज पूजा तो कल कोई दुजा" अशी परिस्थिती त्यावेळेस क्वचितच आढळायची.
आजकाल तर व्हर्च्युअल प्रेम वेगळं, कॉलेजमधलं प्रेम वेगळं, क्लासमधल प्रेम वेगळं, आणि या सर्वांवर कडी म्हणजे लग्नासाठीच प्रेम वेगळं हे असे प्रकार बघायला मिळतात.
काय चूक काय बरोबर या वादात मी पडणार नाही तो माझ्या पोस्टचा भागही नाही. कालानुरूप सगळ्याच गोष्टी बदलत असतात. आणि ते आवश्यकही असतं. काही बदल पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह. जे काही असेल त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. या पिढीचे विचार कसेही असले तरी मला त्यांच्या काही गोष्टी मनापासून पटतात. त्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ब्रेकअप नंतरही यांच्यातली मैत्री कायम रहाते. पूर्वी असं होत नव्हतं. एकदा का नातं संपल की दोघांचे मार्ग वेगळे व्हायचे. ही पिढी समोरच्याला आपलं आवडणं अगदी सहज स्विकारते त्याच सहजतेने त्याला आपलं नावडणही स्विकारते.
आजची पिढी अगदी प्रॅक्टिकल विचार करुन आयुष्य जगते. फक्त स्वतःपुरता विचार करतात. 'प्रेम म्हणजे त्याग' असल्या विचारांमध्ये जास्त अडकत नाही. भावनांना फारसा वाव देत नाही, असे अनेक आरोप या पिढीवर होतात. पण या पिढीच सगळं 100% चूक आहे असं मी कधीही म्हणणार नाही. उगाच स्वतःला भावनांमध्ये गुरफटून घेऊन दु:खी उसासे टाकत आयुष्य जगण्यापेक्षा त्यामध्ये न अडकणं केव्हाही चांगल. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
©मानसी जोशी
https://youtu.be/1S7nFVUsmJ4
https://youtu.be/B1wznN0Zmhw

No comments:
Post a Comment