लग जा गले..
पावसाळा नसताना अचानकपणे दाटून आलेले ढग.... त्यामुळे अमावस्या नसतानाही अंधारलेली एक भयानक रात्र.... ढगांचा गडगडाट..... वीजेचा कडकडाट ..... मोकळा निर्मनुष्य रस्ता ....... मधूनच येणारा कुत्र्याच्या रडण्याचा आवाज तर कधी रातकिड्यांचा किर्र्रर्र्र असा आवाज.... आणि या वातावरणातून जाणारी एक सिदान क्लास लाल रंगाची होंडा सिटी....त्यामध्ये बसलेले प्रेमी युगुल.... दोघही हनीमूनला निघालेली असल्यामुळे रोमॅन्टिक मूडमध्ये. रोमॅन्टिक मूडमध्ये असल्यामुळे असेल कदाचित पण भयानक रस्त्यावरही दोघांना अजिबात भीती वाटत नव्हती. गाडीत म्युझिक प्लेअरवर मंद रोमॅन्टिक म्युझिक चालू होतं..... एक गाणं संपून दुसरं गाणं सुरु झालं... 'लग जा गले .....' त्याने एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये तिच्याकडे बघितल. ती लाजली. सहज तिची नजर समोर गेली आणि ती घाबरली. एक पांढऱ्या कपड्यातली, केस मोकळे सोडलेली बाई त्यांच्या गाडीच्या समोर आली. त्या बाईला डोळे नव्हते आणि तिची मान गोल गोल फिरत होती. गाडीमध्ये बसलेली तरुणी जोरात किंचाळली. त्याने गाडी थांबवायचा प्रयत्न केला पण ती बाई त्यांच्या गाडीच्या आरपार पलीकडे चालत गेली. त्याने मिरर मधून मागे बघितलं. ती बाई दात विचकून विकृत हसत होती... आणि काही कळायच्या आत गाडी समोरच्या झाडावर आपटून गर्द झाडीत कोसळली. ती पांढऱ्या कपड्यातली बाई मात्र गडगडाटी विकट हसत अजूनही तिथेच उभी होती.....
आssssssss........ श्रेया जोरात किंचाळली आणि विक्रमने करकचून गाडीचा ब्रेक दाबला. विक्रमच्या बाजूला बसलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडने- रियाने दचकून श्रेयाकडे बघितल. मधल्या सिटवर बसून पेंगत असलेले सोहम आणि नेहाही दचकून आजूबाजूला बघायला लागले. श्रेयाच्या बाजूला बसलेला समीर मात्र मोठ्यामोठ्याने हसत होता.
विक्रम: आयला सम्या कशाला घाबरवतोस रे तिला.
समीर: मी काही नाही केलं यार. तिच म्हणाली मला तुझ्या नवीन स्क्रिप्टबद्दल सांग म्हणून सांगितलं.
रिया: सम्या तू कधीपासून हॉरर स्टोरीज लिहायला लागलास रे ?
श्रेया: (चिडून) बघ ना तो रोमॅन्टिक स्टोरीज लिहितो म्हणून सांग म्हणाले मी. हे असलं काही सांगेल असं वाटलही नव्हत मला.
समीर: आमच्या चॅनेलला रोमॅन्टिक स्टोरीजची सिरिज बंद करुन हॉरर शो चालू करायचा आहे. त्यासाठीच एक हॉरर स्टोरी लिहितोय. श्रेयाने स्टोरी सांग म्हटल्यावर म्हटलं हॉरर स्क्रिप्ट ऐकवावं तिला. आज बाहेरच वातावरण पण हॉरर आहे मजा येइल.
विक्रम: सम्या XXXX गेलो असतो खाली दरीत आपण कसला दचकलो मी.
रिया: रोमॅन्टिक सिरिज बंद होतेय? का रे? मस्त चालली होती ती. आणि तुझ्या स्टोरीज तर रिॲलिस्टिक असतात ना ?
समीर: ना मुन्ना ना.... मी आधी स्टोरी लिहितो मग त्या खऱ्या होतात.
श्रेया: ओ हिरो बास करा आता. म्हणे मी आधी लिहितो आणि मग त्या रिअल होतात.
श्रेयाच्या या बोलण्यावर सगळेच हसले. श्रेया, समीर, विक्रम, रिया आणि सोहम हे पाचही जण कॉलेजपासूनचे मित्रमैत्रीणी होते. कॉलेज संपवून प्रत्येक जण आपआपल्या करिअरमध्ये स्थिरावलेली होता. नेहा सोहमची गर्लफ्रेंड होती. ती या ग्रूपमध्ये नवीन होती. श्रेया आणि रिया 'आयटी' कंपनीत नोकरी करत होत्या तर विक्रम आपला फॅमिली बिझनेस सांभाळत होता. सोहम आणि नेका बॅंकेत नोकरी करत होते आणि समीर स्क्रिप्ट रायटर होता.
रिया ही विक्रमची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड आणि त्याची होणारी बायको होती. विक्रम रियाच लग्न ठरल्याचं सेलिब्रेशन आणि पार्टीसाठी सगळे विक्रमच्या फार्महाउसवर जायला निघालेले होते. ते ज्या रस्त्याने जात होते तो रस्ता हॉन्टेड रस्ता म्हणून प्रसिद्ध होता. त्या रस्त्यावर अनेक अपघात झालेले होते. खास करुन नवीन लग्न झालेल्या किंवा लग्न ठरलेल्या जोडप्यांच्या गाडीचे. बाकी कोणाचा या गोष्टींवर विश्वास नसला तरी सोहमचा होता. त्यामुळेच सोहम या रस्त्यावरून जायला मनापासून तयार नव्हता. पण नेहाने समजावल्यामुळे तो तयार झाला होता . नेहाला बॅंकेतून निघायला उशीर झाल्यामुळे शहरातून निघायलाच अकरा वाजलेले होते शॉर्टकटच्या रस्त्याने गेलो तर जवळपास दिड तास तरी लवकर पोचू असा विचार करुन सगळ्यांनीच या हॉन्टेड रस्त्यावरून जायचं ठरवल.
शहराची गर्दी मागे सोडून गाडी निर्मनुष्य रस्त्याला लागली. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला गर्द झाडी त्यात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे विक्रम काळजीपूर्वक गाडी चालवत होता. श्रेयाच्या किंचाळण्यामूळे का होईना काही काळ शांत झालेल्या गाडीत पुन्हा गप्पागोष्टी आणि हास्यविनोद चालू झाले होते.
हसता हसता अचानक सोहमची नजर खिडकीबाहेर गेली आणि तो विक्रमला म्हणाला, "विकी मगाशी त्या माईलस्टोनवर 'सारगाव' ३८ किमी. लिहिलं होतं आताही तेच दिसतंय. आर यू शुअर, आपण बरोबर रस्त्यानेच जातोय?"
"अरे असं होत अनेकदा. लास्ट टाईम आपण गोव्याला गेलो तेव्हाचं आठवतंय ना? असेच माईलस्टोन होते. जुने माईलस्टोन न काढताच नवीन बसवतात XXXX साले." विकी.
"नाही विकी सोहम बरोबर बोलतोय. मला आत्ता परत तोच माईलस्टोन दिसला जो मगाशी दिसला होता." रिया
हे ऐकून मात्र सगळेच सावध झाले. थोड्याच वेळात सगळ्यांच्या लक्षात आलं की गाडी पुन्हा पुन्हा त्याच माईलस्टोनला क्रॉस करुन पुढे जातेय. कितीही नाही म्हटलं तरी सगळेच घाबरले होते.
"याचा अर्थ आपल्याला चकवा लागलाय. आता सकाळपर्यंत आपण असच फिरत रहाणार. तरी मी सांगत होतो हायवेवरुन जाऊया म्हणून. पण कोणी ऐकेल तर ना.” सोहम वैतागून म्हणाला.
"अरे ए गप ना. जरा विचार करु दे. आता काय करायचं ते ठरवायला हवं." विक्रम
"विकी यार गाडी थांबव. असच फिरत राहिलो तर पेट्रोल संपेल गाडीतलं. त्यापेक्षा बाहेर पडून काही मदत मिळतेय का बघूया." समीर
"नाही! नको! गाडी थांबव पण बाहेर नका पडू कोणी. आपण गाडीत सेफ आहोत." नेहा.
"इनफ नाऊ यार. सम्या यू आर राईट", असं म्हणून विकीने गाडी थांबवली.
समीर आणि विक्रम गाडीबाहेर येऊन काही मदत मिळू शकेल का बघत होते. तेवढ्यात त्यांना एक झोपडीवजा घर दिसलं. सगळ्यांना सांगून दोघेही तिकडे जायला निघाले. पण श्रेया आणि रियाने त्यांना अडवलं. अखेर सगळ्यांनीच तिकडे जायचं ठरलं. पण यासाठी नेहा तयार झाली नाही. तिला सरपटणाऱ्या प्राण्यांची आणि जंगली जनावरांची प्रचंड भीती वाटत असे. त्यामुळे गाडीत बसणं सुरक्षित आहे असं तिला वाटत होतं. सोहमने नेहाजवळ थांबायच ठरवलं. पण नेहाने त्याला बाकीच्यांबरोबर जायला सांगितलं अखेर नाईलाजाने नेहाला एकटीला गाडीत बसवून आणि गाडी व्यवस्थित लॉक करुन सगळे त्या घराजवळ जायला निघाले. घरात कोणी आहे नाही याचा काहीच अंदाज येत नव्हता. समीर हिम्मत करुन पुढे झाला आणि जरा घाबरतच त्याने घराचे दार वाजवलं. पण कोणीच दार उघडलं नाही. थोडा वेळ गेल्यावर त्याने पुन्हा दार वाजवलं. पुन्हा तेच. तिसऱ्या वेळेस त्याने दार वाजवले तेव्हा घरातून हलकीशी गार वाऱ्याची झुळूक आली आणि दार खाटकन उघडलं पण पलीकडे कोणीच दिसलं नाही. बंद दारामागून आलेली गार वाऱ्याची झुळूक आणि आत कोणीही नसताना अचानक उघडलेलं दार यामुळे सगळेजण घाबरुन तिथून पळत रस्त्यावर आले. तेवढ्यात त्यांना पाठमोरी नेहा रस्त्यावरुन चालत जाताना दिसली. गाडीच्या बाहेर पडायला घाबरणारी नेहा अशी एकटीच रस्त्यावरुन चालतेय म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सगळेजण नेहाला हाक मारत तिच्या मागून धावत गेले. तेवढ्यात समोरुन एक लाल रंगाची होंडा सिटी आली आणि काही कळायच्या आत कार नेहाच्या आरपार जाऊन बाजूच्या झाडावर आपटली आणि वेडीवाकडी वळणं घेत गर्द झाडीत कोसळली. सगळेजण धावत तिकडे गेले पण आधीच अंधार आणि त्यात गर्द झाडी त्यामुळे नेहा आणि कार कुठेच दिसली नाही.

"सम्या पोलिसांना फोन कर मी ॲंब्युलंस बोलावतो." विक्रम प्रसंगाच गांभीर्य ओळखून म्हणाला.
दुर्दैवाने कोणाच्याच फोनला रेंज नव्हती. तेवढ्यात रियाच्या फोनला नेटवर्क मिळालं आणि त्यावरून पोलिस आणि ॲंब्युलंस दोन्ही कॉल लागले. सगळेजण पुन्हा नेहाला शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांना नेहा त्या मगाचच्या घराकडे जाताना दिसली. सगळेजण चक्रावले. पण कसलाही विचार न करता सगळे पुन्हा तिच्या मागून धावत गेले. पण आता तिथे घर नव्हतं होती ती फक्त गर्द झाडी. सगळेजण घाबरून पुन्हा पळत रस्त्यावर आले. काहीतरी विपरीत घडतंय यावर हळूहळू सगळ्यांचाच विश्वास बसू लागला होता. नेहाला एकटं सोडून गेल्याबद्दल सगळ्यांनाच पश्चात्ताप होत होता. आपण तिच्याजवळ थांबायला हवं होत असं प्रत्येकालाच वाटत होतं. हतबल होवून सगळी गाडीकडे जायला निघाली तेवढ्यात पोलिसांची गाडी येताना दिसली आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.
पोलिसांना बघून सगळे थोडेफार सावरले. विक्रमने त्यांना सगळी हकीगत सांगितली आणि अपघात झालेली जागा दाखवली. पण अंधारामुळे पोलिसांना अपघाताच्या खूणा स्पष्टपणे दिसत नव्हत्या. तेवढ्यात ॲंब्यूलन्स आली. पोलिसांचा तपास चालूच होता पण काहीच धागा मिळत नव्हता. काही वेळात अपघात झालाय का नाही, याबाबतच पोलिस साशंक होऊ लागले. ही पाचही जण पोलिसांना अपघात झालाय हे पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होती. थोडा वेळ शोधाशोध करुन पोलिस आणि ॲब्युलन्स जायला निघाले. सगळे हतबल झाले. तेवढ्यात गर्द झाडीतून गाण्याचा आवाज ऐकू आला, "लग जा गले........" पोलिस पुन्हा मागे फिरुन आवाजाच्या दिशेने शोधाशोध करु लागले. त्यांना तिथे लाल रंगाची होन्डा सिटी आणि त्यात अडकलेले एक जोडपं दिसल. त्यातील स्त्री चा आधीच मृत्यू झालेला होता पण पुरुष मात्र बेशुद्ध असला तरी जिवंत होता. पोलिसांनी तातडीने त्या पुरुषाला कारमधून बाहेर काढलं आणि ॲंब्युलन्स मधून हॉस्पिटलला पाठवलं. सगळ्यांना नेहाला शोधण्याची खात्री देऊन परत जायची विनंती केली.
सगळे उदास मनाने गाडीजवळ गेले, तेव्हा गाडीत शांतपणे झोपलेल्या नेहाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
विक्रमने फोन करुन नेहा सापडल्याचं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी गाडीजवळ येउन नेहाची चौकशी सुरु केली. पण नेहाशी बोलल्यावर जेव्हा सगळ्यांना कळलं की नेहा गाडीतून बाहेर पडलेलीच नव्हती. तेव्हा मात्र इंस्पेक्टरसकट सगळेच थक्क झाले. जुजबी चौकशी करुन झाल्यावर इंस्पेक्टरनी सगळ्यांना जायला सांगितल. निघताना प्रत्येकाच्याच मनात एक विचार येत होता जर ती नेहा नव्हती तर मग 'ती' कोण होती? मृत्यूनंतरही आपल्या नवऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारी ती अपघातग्रस्त स्त्री च तर नेहा बनून आली नव्हती?

सगळ्यांनी फार्म हाऊस वर पोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकला. तिथे गेल्यावर समीरने आपलं स्क्रिप्ट श्रेयाच्या हातात दिलं आणि म्हणाला, "मी सांगितलं होतं ना, 'माझ्या कथा रिॲलिस्टिक नसतात. आधी मी कथा लिहितो आणि मग त्या खऱ्या होतात!!"
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment