एखादी गोष्ट खूप प्लॅन करुनही व्यवस्थित घडून येत नाही. तर कधीकधी एखाद्या वेळेस अचानकपणे काही ठरतं आणि सगळं अगदी अनपेक्षितपणे छान होतं. अगदी असच झालं रायगड ट्रेक च्या बाबतीत. खरतर हा प्लॅन आधीच ठरला होता. पण ऐनवेळेस पावसाने (नेहमीप्रमाणे) घोळ घातला आणि प्लॅन कॅन्सल करावा लागला.
ही कल्पना मानसची. रायगड ट्रेक आणि तो ही नाईट ट्रेक करायचा. मी आयुष्यात आजवर कधीही नाईट ट्रेक केलेला नसल्यामुळे मी पण चटकन होकार दिला पण मुसळधार पावसामुळे अगदी ऐनवेळी सगळ्यावर पाणी पडलं. पुन्हा 28 / 29 तारीख फिक्स झाली. पण त्या दिवशीसाठीचा माझा दुसरा प्लॅन आधीच ठरल्याने मला जमणं जवळपास अशक्यच वाटत होतं. त्यात सर्दी आणि डोकेदुखीने मी बेजार झाले होते. अखेरीस हो नाही करता करता माझं जायचं ठरलं पण तोपर्यंत दहा जणं आधीच फिक्स झाली होती. दोन गाड्या आणि 11 मेंबर्स.... पुन्हा काय करायचं हा प्रश्न. बाकीच्यांचं आधीच ठरलेलं म्हणजे मी कॅन्सलच. पण मानस म्हणाला, 'होइल मॅनेज ये तू' आणि एकदाचं जाणं फिक्स झालं.
दुपारी जवळपास तीन वाजता आम्ही पुण्यातून निघालो आणि रायगडाच्या पायथ्याशी साधारणतः आठ वाजता पोचलो. सगळ्या सामानाची आवराआवरी करुन साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. सुरवातीला जाणवलं हे जरा कठीणच दिसतय. मिट्ट काळोख, निर्मनुष्य रस्ता, उंच पायऱ्या हे सगळं बघून आपण कितपत चढू शकू अशी शंका मनात आली. मानस अनेक सुचना देत होता. सगळेजण शहाण्या बाळासारखं(?) सगळ्या सुचनांचं पालन करत होते. सुरुवातीला खूपच अवघड अगदी जमेल की नाही असं वाटणारा ट्रेक हळूहळू 'आता जमेल आपल्याला' या वळणापर्यंत आला. मनात सारखं येत होतं, "त्या काळी मावळे ढाल तलवार घेऊन इथून कसे काय धावत असतील?" पायऱ्या नसताना सगळ्यांचा चालायचा स्पीड वाढायचा पुन्हा पायऱ्या दिसल्या की कपाळावर आठी यायची. एकमेकांना सांभाळून घेत, गप्पा गोष्टी/ चेष्टा मस्करी करत जवळपास अर्धाअधिक गड सर झाला आणि मग थोडावेळ सगळेजण विश्रांतीसाठी थांबलो स्वप्नील भदे फोटो काढण्यात व्यस्त झाला. बाकीच्यांनी एनर्जी ड्रिंक, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या इत्यादीची देवाणघेवाण सुरु केली. विश्रांतीनंतर पुन्हा गड चढायला सुरुवात केल्यावर मात्र "आता कधी संपतील या पायऱ्या" असं वाटू लागलं होतं. अखेर दहा वाजता गडावर सुखरूपपणे पोचलो. अवघ्या दीड/पावणेदोन तासात गड सर झाला होता. आपण गडावर पोचलो हे कळताक्षणी प्रचंड आनंद झाला. पण अजूनही चालणं संपल नव्हतं. आमची राहायची व्यवस्था जिथे होती तिथपर्यंत पोचायला गडाच्या थोडं खाली उतरुन चालायला लागणार होतं. पण उतरताना तसाही त्रास कमी असतो त्यात 'पायऱ्या' नाहीत म्हटल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
एका झोपडीवजा घरात जिथे लाईट्स नाहीत फक्त कंदिलाचा प्रकाश अशा ठिकाणी रहायचं म्हटल्यावर थोडसं टेंशन आलं होतं पण गप्पागोष्टी इतक्या रंगल्या की नंतर त्याचही काही वाटेनासं झालं. गरमागरम भाकरी, मसुराची उसळ, आमटी -भात, लोणचं, पापड असा जेवणाचा बेत. अंगणात चटईवर बसून, कंदिलाच्या उजेडात साधं पण अतिशय चविष्ट असं जेवण जेवताना आलेल्या मजेची सर कॅन्डललाईट डिनरलाही नाही.
जेवणानंतर अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. रात्री दोन वाजेपर्यंत सगळेच जागे होते. त्यानंतर चार वाजताच कोंबड्यांनी बांग द्यायला सुरुवात केली आणि पाच वाजता मुकुलच्या मोबाईल अलार्मने. तरीही कोणीही चिडचिड न करता हे सारं हसतखेळत एंजॉय केलं.
सकाळी लवकर आवरुन आधी जगदीश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक, राजवाडा ई. सगळं बघून आणि स्वप्नील भदेकडून भरपूर फोटो काढून घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना ओसंडून वाहणारा उत्साह जाऊन आता थकवा जाणवायला लागला होता. मानस आणि उन्मेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुणे टू रायगड ड्रायव्हिंग, त्यानंतर ट्रेक, जागरण आणि पुन्हा परतीच्या प्रवासातही ड्रायव्हिंग. दोघेही दोन्ही वेळेला अतिशय शांतपणे व्यवस्थित ड्राईव्ह करत होते. उन्मेशचा पाय मुरगळलेला असूनही त्याने हे सगळं सहज जमवलं. सौरभ आणि स्वप्नील भदेने हिशोबाचं डिपार्टमेंट भ्रष्टाचार न(?) करता सांभाळलं. ट्रेकच्या निमित्ताने अनेक नवीन ओळखी झाल्या रुचिता, अदिती, मुकूल यांना भेटून छान वाटलं. स्नेहल आणि नेहा या गोडबोले भगिनींशी तर अगदी जवळचीच ओळख निघाली. Archaeology शिकत असणाऱ्या श्रेयाकडून काही विषयांवर नवीन माहिती कळली. अशा अनेक नवीन ओळखी आणि ट्रेकचा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही सगळे अखेरीस चार वाजता पुण्यात परतलो. मुकुलच्या घरी (तिने केलेला) आग्रहाचा चहा घेऊन सव्वापाचला घरी पोचले आणि एका अविस्मरणीय ट्रेकची सांगता झाली.
©मानसी जोशी