[DCH
Friendship Lovestory]
रोमॅन्टिक मूव्ही म्हटलं की मला दिल चाहता हैं हटकून आठवतो. माझ्या या वाक्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या असतील. नाही मला माहिती आहे ही मूव्ही म्हणजे तीन मित्रांच्या मैत्रीची कहाणी आहे. पण तरीही त्यातल्या प्रत्येक मित्राची प्रेमकहाणी वेगळी आहे आणि त्यामुळेच चित्रपट अधिक रंगतदार झाला आहे.
आकाश (अमीर खान), समीर (सैफ अली खान) आणि सिद म्हणजेच सिद्धार्थ ( अक्षय खन्ना) या तीन जिवलग मित्रांनी केलेली धमाल, त्यांची मैत्री, त्यांच्या प्रेमकहाण्या म्हणजे दिल चाहता हैं. फरहान अख्तर यांचा पहिलाच प्रयत्न (कथा आणि दिग्दर्शन) असूनही चित्रपट पहाताना त्यांचा नवखेपणा कुठेही जाणवत नाही. आकाश, सिद आणि समीरची मैत्री, त्यांनी कॉलेजला केलेली धमाल, त्यांची गोवा ट्रिप हे सगळे प्रसंग भरपूर हसवतात त्याचबरोबर सिद आणि आकाशमद्ध्ये झालेले मतभेद, त्यांच्यात आलेला दुरावा, ग्रॅज्युएशननंतर वेगळ्या झालेल्या वाटा अशा हृदयस्पर्शीही प्रसंगांची मांडणीही अतिशय सुंदर.
आकाशचा प्रेमावर अजिबात विश्वास नसतो. "जाने क्यों लोग प्यार करते हैं" म्हणणारा आकाश आधीच कमिटेड असणाऱ्या आणि कॉलेजच्या पार्टीत जिच्या बॉयफ्रेंड करुन मार खावा लागलेला असतो अशा शालिनीच्या (प्रिती झिंटा) प्रेमात कधी पडतो ते त्याचं त्यालाच कळत नाही.
समीरची प्रेमाची व्याख्या क्लिअर नसते त्यामुळे एखाद्या मुलीने सॉफ्ट कॉर्नर दाखवला की लगेच तिच्या प्रेमात पडणारा समीर गोव्यामध्ये एका फॉरेनर मुलीकडून फसतो. त्यानंतर टिपिकल 'कांदेपोह्याचा' प्रोग्रॅम होतो. या प्रोग्रॅमसाठी आलेली मुलगी पूजा ( सोनाली कुलकर्णी) त्याला मनापासून आवडते. पण ती आधीच एंगेज्ड असते. मग तिला मिळविण्यासाठी त्याने केलेली धडपड, पूजाचा बॉयफ्रेंड सुबोध; त्याचं प्रत्येक गोष्टीचं तारीखवार लक्षात ठेवणं हे सारे प्रसंग मस्त जमून आले आहेत.
सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतं. अतिशय शांत, विचारी सिद घटस्पोटित, प्रौढ आणि एका टिनएजर मुलीची आई असणाऱ्या तारा जैसवालच्या (डिंपल कपाडिया) प्रेमात पडतो. platonic love ही कन्सेप्ट त्यावेळेस मला माहिती नव्हती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती कळली. त्यावेळी हे पचवणं थोडं जड होतं. पण अक्षयच्या सहज सुंदर अभिनयाने हे अलगद गळी उतरवलं.
तारा जैसवाल वरील सिदचं प्रेम आकाशला पटत नाही त्यामुळे आकाश आणि सिदमध्ये टोकाचे मतभेद होऊन दोघे दुरावतात. त्यानंतर आकाश सिडनीला निघून जातो. जाताना त्याला प्लेनमद्ध्ये शालिनी भेटते. पुढे सिडनीत दोघांच्या वारंवार भेटीगाठी होतात. आकाशच्या मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम तो शेवटी शालिनीच्या लग्नाच्या वेळी व्यक्त करतो. हा प्रसंग थोडा टिपिकल बॉलिवूड स्टाईल झाला असला तरी चित्रपट पहाताना फारसा खटकत नाही.
शेवटी आकाश आणि सिदमध्ये दिलजमाई होते. आकाश फोन करुन सिदला सॉरी म्हणतो. तिघेही मित्र पुन्हा एकत्र येतात. आणि सहा महिन्यानंतर पुन्हा गोव्याला जातात. तिथेच सिदला त्याच्या आयुष्याची नवी जोडीदार मिळते.
चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीता दिले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय तर आहेतच पण काही गाणी तर प्रेक्षणीयही झाली आहेत. 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' या गाण्यात अमीर प्रितीसमोर गुलाबाचं फुल धरतो ती ते घ्यायला जाते तेव्हा तिच्या हातात फक्त देठ येतो, त्यावेळचा तिचा लटका राग आणि क्षणात गोड हसून अमीरच्या हातातील गुलाबाचं फुल ओढून घेणं; या प्रसंगातील प्रितीच्या चेहऱ्यावरील खट्याळ हावभाव अगदी कायम लक्षात राहण्यासारखे. 'जिसे धुंडता हूँ मैं' हे सैफ सोनालीचं गाणही सुंदर. 'कैसी हैं ये ऋत' हे गाणं तर एखाद्या निवांत संध्याकाळी ऐकत रहावं असं. सिडनीमधील 'ओपेरा' आणि अमीरवर चित्रीत झालेलं 'तनहाई' हे गाणं पाहताना डोळे पाणावतात. समीरचं अनेकींवरील प्रेम(?) जेवढं हसवतं तेवढच सिदचं एकतर्फी निरपेक्ष प्रेम खरं प्रेम म्हणजे काय असतं हे शिकवतं. आकाश, समीर आणि सिदची मैत्री तर मैत्रीचं आदर्श उदाहरणच. या चित्रपटाला 2001 सालातील "सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment