गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जाताना नेमक इअरफोन न्यायला विसरले. तशी सकाळची वेळ म्हणजे घाई गडबडीचीच वेळ असते कारण लवकर उठून पोळी भाजीचा डबा तयार करुन लेकीच आवरुन तिला ६.४० ला येण्याऱ्या स्कूलबससाठी बसस्टॉपवर सोडायला जायच. बस आली कि टाटा बायबायचे सोपस्कार करुन मस्तपैकी गाणी ऐकत मॉर्निंग वॉक करुन ७.३० पर्यंत घरी परत यायच. पण इअरफोन घरी विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागले आणि त्याचा राग लेकीवर काढत म्हणाले, "किती रेंगाळत रहातेस ग आवरत जा ना पटापट, तुझ्यामुळे मी घाईघाईत इअरफोन विसरले. आता मी चालायला कशी जाणार?"
यावर लेक म्हणाली, "अग आई चालायला जायचा आणि इअरफोनचा काय संबध? तू पाय घरी विसरल्यासारख काय करतेस?"
यावर मात्र माझ मलाच हसू आल. तेवढ्यात स्कूल बस आली आणि ती निघून गेली. मीसुद्धा वैतागून चालायला सुरुवात केली.
"आज काय मॉर्निंगच बॅड झालेय पुढे दिवस कसा जाणार कुणास ठावूक?"असा विचार करतच चालत होते. माझ्या पुढे एक जोडप हातात हात घेउन अगदी हळू आवाजात गप्पा मारत चालत होत. बहुदा नवीन लग्न झालेल असाव. चालायला येणाऱ्या बहुतांश रणवीर दीपिकांच त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष होत. त्यांना क्रॉस करुन मी थोडी पुढे गेले तर माझ्या पुढे एक मध्यमवयीन जोडप चालत होत. बहुदा त्यांच्या मुलाच दहावी च वर्ष होत. त्यामुळे त्याच्याबद्दलच त्यांची काहितरी चर्चा चालू असावी. क्षणात टेंशन आल. "अजून लेक चौथीमध्ये आहे तर तिच्या अभ्यासाची लढाई लढवताना माझी ही हालत होतेय, तर पुढे काय होइल?" बोलता बोलता ते कपल दुसरीकडे वळल आणि माझ विचारचक्रही थांबल.
थोड पुढे आल्यावर दोन रिटायर्ड(बहुदा) आजोबा एकमेकांशी बोलत होते
पहिले आजोबा विचारत होते, "मग दिवसभर काय करतो? बोअर नाही होत घरात?"
दुसरे आजोबा अगदी सहज सांगत होते, "नाही बसून असतो कधी हॉलमध्ये बसतो कधी किचनमध्ये. पण त्रास नाही देत कोणाला."
ते बहूदा रिटायर्डमेंट नंतरच्या दिनचर्येबद्दल बोलत असावेत अस मला वाटल.
तेवढ्यात पहिल्या आजोबांनी दुसऱ्या आजोबांना विचारल, "कोणी आल की अंगावर वगैरे धावून जातो की नुसताच भुंकतो?"
यावर दुसरे आजोबा उत्स्फूर्तपणे म्हणाले, "भुंकतो फक्त पण आम्ही समजावल की गप्प बसतो, सगळ ऐकतो अजिबात हट्ट करत नाही अगदी गुणी आहे."
हे ऐकून माझ्या लक्षात आल की मगाचपासून हे दोघे एका कुत्र्याबद्दल बोलतायत. मला हसू आवरल नाही. कसबस हसू दाबत मी माझा चालायचा स्पिड वाढवून त्यांच्या पुढे गेले. थोड पुढे गेल्यावर ज्येष्ठ नागरिक महिलांचा एक ग्रूप माझ्या पुढे चालत होता. एक खमकी आजी दुसऱ्या खमक्या आजीला समजावत होती, "अहो अस करुन सवरुन ऐकून नाही घ्यायच. आपल्या पिढीच हेच दुर्दैव आहे. आधी सासुच ऐकायच आणि आता सुनांच ......" त्यांच बोलणं खर तर इंटरेस्टींग होत पण त्यांचा स्पीड कमी असल्याने मी कधीच त्यांच्या पुढे निघून गेले होते.
थोड पुढे आल्यावर समोरुन एक गोंडस छोट बाळ येताना दिसल माझ्याकडे बघुन गोड हसल. मी ही त्याच्याकडे पाहून हसले. दोन मिनिटे थांबून त्याच्याशी गप्पा मारल्या खर तर हे बाळ मला जवळपास रोजच दिसत पण इअरफोन असल्यामूळे कधी त्याच्याकडे लक्षच गेल नाही. या सगळ्या प्रकारात घरी पोचायला मात्र उशीर झाला. चला आता पुढे सगळ्याला उशीर होणार असा विचार करुन घरी आले तर मस्त आलं घालून गेलेल्या चहाचा वास दरवळत होता. अहोंनी वाट बघून चक्क चहा केला होता. कितीतरी दिवसांनी सकाळी असा मस्तपैकी आयता चहा मिळाला आणि एकूणच बॅड वाटणारी माझी मॉर्निंग एकदम गुडमॉर्निंग झाली.
काही गोष्टी आपण मनाशी पक्क्या ठरवलेल्या असतात आणि आपल्याला वाटत त्या तशा असतिल तरच छान असतात. जरा बदल झाला की आपण वैतागतो. जस माझ झाल इअरफोन न वापरतासुद्धा मॉर्निंग वॉक खूप छान होवू शकत हा विचारच मी केला नव्हता. अर्थात बाकी काहीही असलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मी न विसरता इअरफोन घेतले.. काय करणार ? आदत से मजबूर...
©मानसी जोशी
सदरचा लेख म.टा च्या ठाणे आवृत्तीमध्ये(२२ नोव्हेंबर २०१६) छापून आला आहे.

No comments:
Post a Comment