#तो आणि ती
तो आणि ती. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात येणार कोणीतरी खास. प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाची कहाणी वेगळी; पण भावना मात्र एकच, प्रेम!! हि कहाणी आहे अशाच एका त्याची आणि तिची म्हणजेच राजीव आणि नेत्राची.
ऑफिसच्या कामासाठी US ला गेलेल्या राजीवला तिथे नेत्रा भेटते. सुरुवातीला दोघही एकमेकांना ओळखत नाहीत. पण तिच्या गालावरची ती गोड खळी बघून झटक्यात त्याला तिची ओळख पटते. आणि तो स्वतः तिच्यासमोर जावून तिला विचारतो, "Excuse me!! Are you Netra Sabanis? आपल माहेरच नाव ऐकून नेत्रा क्षणभर गोंधळते पण क्षणात स्वतःला सावरुन म्हणते, "Yes right.....
ते ऐकून राजीव उत्साहाने विचारतो, "अग नेत्रा मला नाही ओळखलस मी राजीव.........राजीव किल्लेदार"
"राजू तू इथे कसा? किती वर्षानी भेटतोय आपण?" नेत्रा.
दोघांमध्ये संवाद चालू होतो. काही मोजक्या गप्पा आणि कॉफी होते. एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन टाटा बायबाय करुन दोघेही घरी जातात पण जाताना मात्र प्रत्येक पावलागणीक अंतर्मनात दडलेल्या भूतकाळातील आठवणी जाग्या होत जातात.
'त्या'च्या नजरेतून ती-
आजची अनपेक्षितपणे झालेली नेत्राची भेट दुनिया गोल आहे हेच सिद्ध करते. आजही आपल्या भेटीचा पहिला दिवस आठवतोय नेत्रा ....... गुलाबी रंगाचा साधासा फ्रॉक घातलेली तू आमच्या सोसायटीमध्ये रहायला आलीस अगदी आमच्या फ्लॅटसमोर...... तुझ्या गालावर पडणारी खळी बघून सुरुवातीपासूनच आवडायला लागलीस. त्यावेळेस तू तिसरीत आणि मी पाचवीत. प्रेम या भावनेपासून दोघही कोसो दूर. पण तरीही खूप आवडायचीस तू मला. खेळताना कोणी तूला रडवल, चिडवल की मी नेहमी तुझीच बाजू घेतली. तू रडलेली मला अजिबात आवडत नसे. माझी सगळी 'सिक्रेट्स' मी फक्त तुझ्याशी शेअर करत असे. आपल्या दोघांच्या शाळा वेगवेगळ्या होत्या पण शाळेची वेळ आणि वाट मात्र एकच असायची. तुझ्या शाळेच्या आधीच्या गल्लीत माझी शाळा. त्यामूळे शाळा सुटली की मी धावत जावून गल्लीच्या तोंडाशी येवून तुझी वाट बघत थांबात असे. दिवस मजेत चालले होते. तुझ्या वाढदिवसाला मी तुला माझ्याजवळच एक मोरपीस भेट दिल होत. आणि तू वाढदिवसाला भेट दिलेल पिंपळपान आजही मी माझ्या डायरीमध्ये जपून ठेवल आहे. अशातच एक दिवस अचानक कळल की तूझ्या बाबांची बदली झालेय दुसऱ्या शहरात.आजही आठवतोय तो दिवस तू जाणार या कल्पनेने उदास झालेल्या मला समजावत तू म्हणाली होतीस, "मी काही लगेच नाही जाणार. माझी वार्षिक परिक्षा झाल्यावर मग जाणार मी आणि आई".
ते ऐकून क्षणात माझा चेहरा खूलला होता माझा .पण लगेच डोळ्यात पाणी आणून मी तुला विचारल होत, "तुला आठवण येइल का ग माझी? तू विसरणार नाहीस ना मला?"
तू गोड हसून म्हणाली होतीस, "नाही रे तुला कशी विसरेन?" ए पण तू रडू नकोस हा. तू रडलास की मला खूप वाईट वाटत आणि मग मलाही रडू येत. मग मात्र आपण दोघही हसलो होतो. आजही आठवतोय तू गेलीस तो दिवस मी स्तब्ध आणि तू प्रवाही. तू निघून गेलीस . सुरुवातीला दर महिन्याला येणारी तूझी पत्र, प्रत्येक सणाला येणारी ग्रीटिंग्ज हळूहळू कमी होवून कधी बंद झाली ते काही कळल नाही. मी ही मग इतर मित्रमैत्रीणिंच्यात मिसळून गेलो. पण आजही मनातला एक कप्पा मात्र फक्त आणि फक्त तूझ्यासाठीच आहे.
अशीच काही वर्षे सरली. त्याने बारावी होवून दुसऱ्या शहरात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आणि एक दिवस ती त्याला कॉलेजमध्ये दिसली. "हो तिच आहे ती... त्याच्या मनाने कौल दिला. गालावरची खळी बघून खात्री पटली आणि तो खूश होवून तिच्याशी बोलायला गेला. तिनेही त्याला पटकन ओळखले. ती आता पूर्वीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती आणि तो रुबाबदार.
"तू इथे कशी? तो.
"उद्या इथे Inter college Dance competition आहे त्यात मी सुद्धा भाग भाग घेतला आहे. तू येशील का माझा डान्स बघायला?" ती उत्साहाने सांगत होती आणि तो तिच हे मोहक रुप आपल्या नजरेत साठवून ठेवत होता.
तिचा डान्स बघायला जायला त्याला काही जमल नाही. नंतर अधूनमधून ती भेटत राहिली. तिच कुटूंब मूळचे याच शहरातील असल्यामूळे ते याच शहरात स्थायिक झाल होत. एक दोन वेळा तो तिच्या घरी पण जाऊन आला होता. तेव्हा तिने त्याला त्याने दिलेल मोरपीस दाखवल होत. ती भरतनाट्यमच्या परीक्षा देत होती. नृत्य विषय घेवूनच B.A. करायच तिने ठरवल होत. अधूनमधून ती तिच्या कार्यक्रमांना, स्पर्धा बघायला बोलवायची पण त्याला काही जमल नाही. दिवस भरभर जात होते. त्याची आणि तिची होणारी प्रत्येक भेट त्याला नव्याने तिच्या प्रेमात पाडत होती.
त्या दिवशी ती खूप आनंदात होती तो इंजिनिअर झाला होता आणि त्याला नोकरीही मिळाली होती; तिच्याच शहरात. आता भेटिंच प्रमाण थोड कमी झाल होत. पण ओढ मात्र कायम होती. हळूहळू तो ऑफिसच्या कामात बिझी होत होता. त्यादिवशी तिचा फोन आला, "काहीही कर पण उद्या माझ्या कार्यक्रमाला ये. उद्या खूप मोठा सांस्कृतीक कार्यक्रम आहे. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत. प्लीज तू ये. केवळ कार्यक्रमासाठी म्हणून नाही तर खूप महत्वाच बोलायच आहे तुझ्याशी अस समज की माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय घ्यायचाय."
त्याने 'ओके' म्हणून तिला येण्याच वचन दिल. पण त्यादिवशी ऑफिसमध्ये हेड ऑफिसचे साहेब आल्यामुळे बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि नेमकी ती बराचवेळ चालली होती. तो घरी पोचला तेव्हा रात्रीचे १० वाजत आले होते. त्याला फार वाईट वाटल. पण एवढ्या रात्री तिला फोन करण त्याला योग्य वाटल नाही.उद्या बोलू असा विचार करुन तो झोपी गेला. सकाळी जाग आली तेव्हा साडेआठ होवून गेलेले. भराभर आवरून तो ऑफिसला पोचला. तो स्वतःवरच वैतागला. नेमकी काल मिटिंग लागली. तिला काय वाटल असेल माझ्याबद्दल? काय बोलायच असेल तिला? काहीही झाल तरी संध्याकाळी फोन करायचाच ... अखेर मनातले विचार थांबवून त्याने ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. संध्याकाळी तो घरी आल्यावर थोड्या वेळातच घरचा फोन खणखणला ..... फोन तिचा होता.
तो तिला 'सॉरी' म्हणतो आणि अजून काही बोलण्यार एवढ्यात ती सांगते "माझ लग्न ठरल!!! "
हे ऐकून तो स्तब्ध होतो. पण क्षणात स्वतःला सावरुन तिच अभिनंदन करतो. जुजबी बोलून झाल्यावर फोन ठेवून खूप रडतो. तिच्या लग्नालाही तो जातो पण त्या रात्री स्वतःला हतबल समजून खूप रडतो. सतत त्याच्या मनात येत रहात मी का बोललो नाही तिच्याशी. पण त्याने काय फायदा झाला असता? एक ना अनेक प्रश्न. कदाचित त्याची कधीच उत्तरे मिळणार नाहीत. कधी स्वतःला दोष देत तर कधी नशिबाला अनेक रात्री हे प्रश्न त्याला छळत रहातात. हळूहळू तो त्याच्या दिनचर्येमध्ये व्यस्त होतो. कधीतरी येते तीची आठवण! मनात एक कळ उठते आणि मग काही क्षणांसाठी तो हळवा होतो. दिवस असेच सरत असतात. एक दिवस त्याच्याही आयुष्यात भयंकर उकाड्यानंतर गार वाऱ्याची झुळूक यावी तशी वसुधा आली. लग्नासाठी आलेल्या या पहिल्याच स्थळाला तो होकार देतो. वसुधा त्याला आवडते म्हणण्यापेक्षा ती त्याच्या अपेक्षांमध्ये फिट बसलेली असते. त्याची निवड सार्थ ठरवत वसुधा त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देते. गोड स्वभावाची लाघवी वसुधा त्याला आवडायला लागते. हळूहळू वसुधाच्या प्रेमात तो तिला विसरायला लागतो पण हृदयाच्या एका कोपऱ्यात तीची जागा अजूनही तशीच असते. स्वतःच्याही नकळत त्याने ती जपलेली असते कदाचित आयुष्यभरासाठी!
'ती'च्या नजरेतून तो-
काही गोष्टी आयुष्यात अचानकच घडतात तशीच आजची तूझी भेट. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आज इतक्या वर्षांनी तू समोर आलास. आणि जूनं सार काही आठवल. लहानपणीची आपली मैत्री, ती लुटूपुटूची भांडणं, आपल शाळेत एकत्र जाणं, शाळेतून येताना तूझ माझ्यासाठी थांबून रहाणं सार काही अगदी अलिकडेच घडल्यासारख आठवतय. तू दिलेल ते मोरपीस आजही माझ्याजवळ आहे. आम्ही दुसऱ्या शहरात गेलो पण मी मात्र तुला खूप मिस केल. जेवढी मैत्री तुझ्याशी होती तेवढी नंतर कधीच कोणाशी झाली नाही. खूप वर्षांनी जेव्हा डान्स कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी तू भेटलास तेव्हा पूर्वीचा राजू एकदम राजबिंडा दिसू लागला होता. त्यानंतर आपल्या वारंवार भेटी होत होत्या. नकळतपणे बालपणीच मनात रुजलेल्या प्रेमाची उमलत्या वयात जाणीव होवू लागली होती. मला वाटत होत तुझही माझ्यावर प्रेम आहे पण ......... माझ्यावरच तुझ प्रेम व्यक्त होणाऱ्या त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते मी. पण तो क्षण आयुष्यात कधी आलाच नाही. माझ्या नृत्याच्या प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येक कार्यक्रमाला मी तुला बोलावत होते; पण तू मात्र कधीच आलाchq नाहिस.त्या दिवशी मी तुझी आतुरतेने वाट बघत होते. मी तुला सांगितलही होत कि प्लीज तू ये मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. पण तू आला नाहिस. आणि मी शशांकशी लग्नाचा निर्णय घेतला.
शशांक; कॉलेजमधला, हुशार, अतिशय साधा सरळ मुलगा. तिला तिन वर्षांनी सिनिअर. तिच्यावर त्याच जिवापाड प्रेम. कॉलेजमधल्या मैत्रिणी तिला नेहमी म्हणायच्या असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्याला होकार दे. पण ती मैत्रिणींना कस सांगणार होती की तिच्या मनाला साद घालणारा 'तो' कोणीतरी वेगळा आहे. कॉलेजमध्ये असतानपासून तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा शशांक MBA झाला आणि छान नोकरीही मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर शशांकच्या आईने तिच्या घरी जावून तिला मागणी घातली. मुलगा चांगला असल्याने तिच्या घरी सगळेच खूष होते. पण अंतिम निर्णय त्यांनी तिच्यावरच सोपवला. 'त्याच्याकडून' काहीच प्रतीसाद न मिळाल्याने तिने विचार केला, "जर आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर प्रेम करत नसेल तर निदान जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशीच जन्माच नातं जोडाव. आणि तिने शशांकला होकार दिला.
शशांकच्या आईला मात्र मनापासून ती पसंत नव्हती. तिला शशांकसारखीच हुशार मुलगी सून म्हणून हवी होती. केवळ मुलाच्या सुखासाठी तिने नेत्राला स्विकारल होत. शशांकचे वडील तो लहान असतानाच गेले होते. त्यामुळे सहाजिकच त्याची आई त्याच्याबाबतीत जरा जास्तच पझेसिव्ह होती. या सगळ्याचा थोडाफार त्रास नेत्राला होत होता. पण शशांकच्या प्रेमामुळे ती सार काही सहन करीत होती.लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच कंपनीने शशांकला दोन वर्षांसाठी US ला पाठवल. सुरुवातिला नेत्राला त्याच्याबरोबर पाठवायला तयार नसणाऱ्या तिच्या सासूने अखेर शशांकची
खाण्यापिण्याची आबाळ होवू नये म्हणून तिलाही परवानगी दिली.
शशांकच्या सहवासात US मधले दिवस जणू स्वप्नवत होते. मुख्य म्हणजे तिला तिथे भरतनाट्यमची प्रॅक्टिसही मोकळेपणे करता येत होती.तिथे तिची रोझीशी ओळख झाली. तिला भारताबद्ल, भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण होते.तिने तिच्या 10 वर्षांच्या मुलीला; जेनीला भरतनाट्यम शिकविण्यासाठी नेत्राला आग्रह केला. दोन वर्षे नेत्राने कसलाही मोबदला न घेता जेनीला भरतनाट्यम शिकवले. जेनीही मनापासून शिकत होती. बघता बघता दोन वर्षे सरली आणि नेत्रा भारतात परतण्यासाठी निघाली तेव्हा जेनी खूप रडली होती. नेत्रालाही खूप वाईट वाटले होते. रोझीने तिला मोबदला घेण्याची विनंती केली तेव्हा नेत्रा सांगितल, मी इथे नसेन पण तू जेनीच भरतनाट्यमच शिक्षण अर्धवट सोडणार नाहीस. बस मला अजून काही नको.
दोन वर्षांनंतर US मधल्या सोनेरी क्षणांच्या आठवणी घेवून शशांक आणि नेत्रा भारतात परत येतात. भारतात आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच नेत्राने गोड बातमी देते. सगळी खूश होतात. ९ महिन्यानंतर नेत्राच्या आणि शशांकच्या आयुष्यात एक गोंडस परी येते. मुलगी झाल्यावर नाराज झालेल्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये नेत्राला बघायलादेखिल जात नाहित. शशांक मात्र आनंदात असतो. शशांकच्या इच्छेनुसार मुलीच नाव जाई ठेवल जात. दिवस मजेत जात असतात. पण नेत्राच्या सुखाला दृष्ट लागावी तस घडत. शशांक आजारी पडून त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि पुढच्या सहा महिन्यातच तो तिला सोडून कायमचा निघून गेला . त्याच्या आजारपणात बराच पैसा खर्च झालेला होता. जवळपास सगळी सेविंग्ज संपलेली होती. शशांकच्या जवळपास सगळ्या विमा पॉलिसीज या लग्नाच्या आधी काढलेल्या असल्याने त्या पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून त्याच्या आईचे नाव होते. नाही म्हणायला जाईसाठी काढलेल्या पॉलिसीची नॉमिनी नेत्रा असल्याने ते पैसे मात्र नेत्राच्या नावावर जमा झाले. नेत्राच्या सासूबाई शशांकच्या पॉलिसीजचे मिळालेल्या पैशांपैकी एकही पैसा नेत्राला देत नाहीत. उलट तुझ्या मुलीच्या पायगुणामूळेच माझा मुलगा गेला अस सतत म्हणून तिचा छळ सुरु करत होत्या. या छळाला कंटाळून नेत्रा मुलीसह माहेरी निघून गेली. माहेरीही पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. तिचे बाबा रिटायर झालेले होते. त्यांच्या पेंशनवरच त्यांच घर चालत होतं.. वयोमानानुसार आलेल्या आजारपणावरची औषधे, दैनंदिन खर्च या साऱ्यामध्ये नेत्रा आणि तिच्या मूलीची भर पडते. त्यांची आर्थिक ओढाताण सुरु होते. नेत्रा हतबल होते तिच्याकडे एवढी हुशारीही नव्हती की एखादी नोकरी करून ती स्वावलंबी होवू शकेल. अखेर तिच्या मैत्रिणिंच्या सल्ल्यानुसार ती भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते. सुरुवातिला खूप कमी प्रतीसाद मिळाला. पण तिची नृत्यनिपूणता, शिकविण्याची पद्धत, तिचा गोड स्वभाव या साऱ्यामुळे हळूहळू तिच्या क्लासची लोकप्रियता वाढत जाते. शशांक जावून ४ वर्षे होत आलेली असतात. नेत्राच्या घरचे तिला दुसर लग्न करण्यासाठी आग्रह करत असतात पण ती मात्र ठाम नकार देते.
एके दिवशी एका सांस्कृतीक कार्यक्रमासाठी परदेशातून काही मुले आलेली असतात. अचानक तिथे नेत्राला रोझी आणि जेनी भेटतात. भरतनाट्यमच शिक्षण जेनीने चालूच ठेवल आहे हे कळल्यावर नेत्राला फार आनंद होतो. रोझीला नेत्रा आग्रहाने घरी घेवून जाते शशांकबद्दल आणि नंतरची सारी हकीगत कळल्यावर रोझीला खूप वाईट वाटते. ती नेत्राला US ला यायचे सुचवते आणि मदत करण्यचेही आश्वासन देते. हो नाही करत अखेर नेत्रा तयार होते आणि रोझीच्या मदतीने तिथे भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते.
आज सहा वर्षानंतर ती यशस्वी आहे. पैसा, स्टेटस या साऱ्या गोष्टी तिच्याजवळ आहेत. पण कमी आहे ती एका जोडीदाराची.
ती राजीवच्या आठवणीत हरवलेली असतान अचानक तिचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने क्षणभर ती दचकते पण फोनवर राजीवच नाव बघून सुखावते आणि चटकन फोन घेते. थोड्या जनरल गप्पा होतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजीवच्या रुमवर भेटायचे ठरते. फोन ठेवल्यानंतर नेत्रा लगेचच उद्याच्या तयारीला लागते. राजीवच्या भेटीच्या नुसत्या कल्पनेनेच तिच मन हळव होतं. काहीही झाल तरी राजीव हे तिच पहिल प्रेम होतं.
इकडे राजीवची अवस्थाही काही वेगळी नव्हती. जिच्याशी बालपणी सगळी सिक्रेट्स शेअर केली तिच्यापासून लपवलेल आयुष्यातल एक मोठ सिक्रेट या वेळी मात्र तो तिला सांगायच ठरवतो. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच असत; एकमेकांना खूप काही सांगायच असत. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी नेत्रा राजीवच्या रुमवर पोचते. कॉफी घेता घेता एकमेकांच्या आयुष्यातील घटना शेअर होतात. नेत्राच्या आयुष्यात तिला किती दु:ख सहन कराव लागल हे कळल्यावर राजीव अस्वस्थ होतो. बोलता बोलता तो तिला सांगतो की त्याच तिच्यावर खूप प्रेम होत. ती हतबल होवून रडू लागते आणि त्याच्यावरच तिच प्रेम व्यक्त करते. रडणाऱ्या तिला तो मिठित घेतो.
"का अस घडल? तू का आला नाहिस त्या दिवशी? ती रडतच विचारते.
आता बोलून काहिच उपयोग नाही हे माहिती असल्याने तो गप्प रहातो आणि तिला मिठीत अजूनच घट्ट पकडतो. त्याच्या स्पर्शाने ती ही मोहरते. मनात एक अनामिक धडधड होत असते. तिच्या मनात येत बस आता अजून काही नको पण ही मिठी सुटू नये. त्याचे थरथरणारे ओठ तिच्या ओठांजवळ जाणार इतक्यात त्याचा फोन वाचतो. ती दचकते क्षणात तिला वास्तवाचे भान येते आणि ती त्याच्यापासून दूर होते.
फोन त्याच्या बायकोचा होता. त्याच्या लहान मुलीला बर नसत हे कळल्यावर तो हळवा होतो. तिला तिचा बाबाच हवा असतो. लेकीशी बोलता बोलता तो रुमच्या गॅलरीमध्ये जातो. बराच वेळ बोलून तो फोन ठेवतो. पण काही क्षण तो गॅलरीतच रेंगाळतो. त्याच्या मनात येत बर झाल आत्ता फोन आला नाहीतर खूप मोठी चूक घडली असती माझ्याकडून. तस झाल असत तर माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोला माझ्या वसूला मी काय तोंड दाखवल असत. आणि माझ्या मुली ?......... नाही नाही. ज्या वसूने माझ्यावर जिवापाड प्रेम केल, माझी प्रत्येक सुखदुःखात साथ दिली तिच्याशी प्रतारणा नाही करु शकत मी. मला नेत्राशी बोलायलाच हव. आजची भेट ही आमची शेवटची भेट ठरली पाहीजे. मनाचा निश्चय करून तो आतमध्ये येतो तर नेत्रा कुठेच दिसत नाही. एवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ....... आपण यापुढे कधीही भेटणार नाही......... ज्या शशांकने माझ्यावर जिवापाड प्रेम केल त्याच्याशी तो गेल्यानंतरही मी प्रामाणिक राहिले. पण आज ...... आज जर तुझा फोन वाजला नसता तर आपल्याकडून जे घडू नये ते घडल असत...... मनाच्या एका कोपऱ्यातली तुझी जागा आजही तशीच कायम आहे आणि राहिल पण माझ्या शशांकची जागा मी कोणालाच नाही देवू शकत .... Good by forever. तो मंद हसून मेसेज डिलिट करतो आणि तिचा नंबरही.
मनात येत, माणसाला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात फक्त त्याची वेळ चूकलेली असते!
समाप्त.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment