१ मे १९९५..... या दिवशी झी टिव्हीवर एक आगळावेगळा शो चालू झाला होता #सारेगम नावाचा. एका संगीतपर्वाचा नितांतसुंदर प्रवास सुरु झाला तो "सारे सुरोंका हैं यही मिलन.. " या साधना सरगम आणि सोनू निगमच्या आवाजातल्या टायटल सॉंगने. त्यानंतर "बजे सरगम... " या सोनू निगम आणि स्पर्धकांच्या सुरेल गाण्याने प्रेक्षकांना मत्रमुग्ध केलं.या गाण्यानंतर कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरु झाला. सोनू निगमच शांत संयत सूत्रसंचालन, 'कुमार सानू' सारखे परिक्षक आणि मुख्य म्हणजे अगदी सर्वसामान्य कपड्यातले, कुठलाही ड्रामा न करता मनापासून सुरेल गाणी गाणारे चार स्पर्धक; दोन स्त्री स्पर्धक आणि दोन पुरुष स्पर्धक (यामध्ये एक स्वप्निल बांदोडकर होता).
स्पर्धेच स्वरुपही अगदी साधं; एकूण आठ प्राथमिक फेऱ्या; प्रत्येक फेरीमध्ये चार स्पर्धक आणि चार राउंडस. त्यानंतर चार सेमी फायनल आणि मग फायनल. प्राथमिक फेरीलाच 'कॉड राउंड' आणि 'जजेस चॉइस राउंड' यासारखे दोन कठीण राउंड्सही होते. ज्यामध्ये खरोखरच स्पर्धकांचा कस लागत होता. कुठेही आरडाओरडा नाही, स्पर्धकांचा ड्रामा नाही, परिक्षकांच अपमानास्पद बोलणं नाही, सूत्रसंचालकाचा किंवा परिक्षकांचा फ्लर्ट नाही; होती ती फक्त सुंदर आणि श्रवणीय गाणी. स्पर्धेच्या शेवटी कुमार सानू सरांनी प्रत्येक स्पर्धकाचे मार्क्स कोणालाही न दुखावता सांगितले. यावर स्पर्धकांच्या रिॲक्शनही अगदी सयंत आणि शांत होत्या.
पहिलाच भाग असल्यामुळे या भागात काही त्रूटीही होत्या. सूत्रसंचालनाच्या दृष्टीकोनातून एपिसोड म्हणाव तसा खुलला नाही. अगदी एका सरळ रेषेत झालेला कार्यक्रम वाटला. पण गायकांची गाणी मात्र मनाला स्पर्श करुन गेली. कालांतराने हळूहळू हि कमीही भरुन निघाली. सोनू निगमच्या शांत संयत सूत्रसंचालनाला हलक्याफुलक्या विनोदांची, अनुभवाची जोड मिळत गेली आणि कार्यक्रम अधिक रंगतदार होत गेला. कुमार सानू, अनू मलिक आणि उदित नारायण यासारखे परिक्षक या सारेगपच्या पहिल्याच सिझनला लाभले होते. १९९५ पासून २००० पर्यंत सोनू निगमने सारेगमच सूत्रसंचालन केलं. यामधून संजीवनी, बेला शेंडे, श्रेया घोषल यासारख्या अनेक चांगल्या गायिका पुढे आल्या. १९९८ मध्ये तर या कार्यक्रमाची #मेगा_फायनल झाली होती. यामध्ये १९९८ पर्यंतच्या सगळ्या विनर्सना सामाविष्ट करण्यात आलं. 'एकसे बढकर एक' असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अगदी चुरशीची स्पर्धा रंगली. स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती परिक्षक म्हणून लाभल्या. अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या मेगा फायनलची विजेती होती ती महाराष्ट्रातील #संजीवनी ही गायिका.
पुढे २००० सालानंतर 'अमान व अयान खान' या भावांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
त्यानंतर २००३ सालामध्ये या शो च नाव बदलून #सारेगमप असं करण्यात आलं. पुढे २००६ सालापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'शान' या गायकाने केले. वेळोवेळी कार्यक्रमाच्या नियमांमध्ये, राउंड्समध्ये, परिक्षकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. तरीही कार्यक्रम आपला दर्जा राखून होता. याच कार्यक्रमातून हृषीकेश रानडे, राहुल सक्सेना अर्पिता मुखर्जी यासारखे अनेक गायक/ गायिका पुढे आले. सन २००६ मध्ये तर "सारेगमप लिटल चॅंप्स" हा लहान मुलांसाठीचा सिझनही यशस्वी झाला. पुढे २००७ मध्ये "आदित्य नारायण" याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर मात्र कार्यक्रमाचा दर्जा हळूहळू खालावत गेला. तोपर्यंत अनेक वाहिन्यांवर साधारणतः याच धर्तीवर आधारीत अनेक कार्यक्रम सुरु झाले होते.
हिंदीनंतर झी टिव्हीने अनेक प्रादेशिक वाहिन्यांवरही 'सारेगमप' हा रिॲलिटी शो सुरु केला. झी मराठी वर चालू झालेल्या #सारेगमप ला पल्लवी जोशीच सुंदर सूत्रसंचालन आणि अवधूत गुप्ते आणि देवकी पंडित सारखे परिक्षक लाभले. हा शो हिट झाला आणि २००९ मध्ये आलेल्या लिटल चॅम्प्सने तर 'सारेगमप' चा मेकओव्हर केला आणि कार्यक्रमाच्या यशाला 'चार चॉंद' लावले. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत या पाच फायनलिस्ट्सना तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शो संपल्यानंतर या पाचही फायनलिस्ट्सच्या गाण्यांचा #पंचरत्न नावाचा अल्बमही झी मराठीने बाजारात आणला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. लिटिल चॅम्प्सच्या हा सिझन इतका हिट झाला होता की त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळेत मुंबईतल्या रस्त्यांवरही शुकशुकाट असायचा. रामायणानंतर एवढा हिट झालेला (निदान महाराष्ट्रात तरी) हा एकमेव कार्यक्रम होता.
आता मात्र सगळच चित्र बदललं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांना गाण्याच ज्ञान असतच असं नाही. गाण्यांपेक्षा/गायकांपेक्षा जास्त चर्चा "बाकीच्या" मंडळींवरच होते. गाण्यापेक्षा फॅशन, ड्रामा अधिक खुलतो. काही कार्यक्रमांमध्ये तर परिक्षकही असे होते की ज्यांचा गाण्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता. असे कार्यक्रम कधी आले आणि कधी गेले हे कळलच नाही. असो. पण हे शो बघितले की जुन्या "सारेगम" चे दिवस आठवतात. खरतर सारेगम चालू झाल तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे सुरवातीच्या २/३ वर्षातले काही एपिसोड्स मी ही बघितले नव्हते. पण १९९८ ची मेगा फायनल मात्र चांगली आठवतेय. परवा कुतूहल म्हणून सहज "यु ट्यूबवर" झी टिव्हीच्या सारेगमच्या प्रोग्रॅमचा पहिला एपिसोड सर्च केला. व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नाहीये. पण तरीही मी पूर्ण एपिसोड बघितला. खरतर हा ओरिजीनल एपिसोडही मी पूर्वी बघितला होता.
अनेक वाहिन्यांवर सद्ध्या सुरु असलेले गाण्याचे #रिॲलिटी_शोज बघितले की वाटतं नक्की गाण्याचा कार्यक्रम आहे की फॅशन शो आहे की ड्रामा शो आहे? प्रेक्षकांच्या माथी काहीही मारलं तरी खपतं, या भ्रमातून लवकरच या वाहिन्या बाहेर येतील आणि पुन्हा एकदा गाण्याचा एखादा दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळेल अशी आशा करणसुद्धा आता व्यर्थ वाटायला लागलय.
झी सारेगम च्या पहिल्या भागाची लिंक
https://youtu.be/3r2EbsQildA
फोटो: गूगलवरुन साभार
©मानसी जोशी