या वळणावर
दोन दिवसांची रजा संपवून नेहा ऑफिसमध्ये आली. तिला आलेली बघून तिची कलिग सलोनी तिच्याजवळ येउन म्हणाली, "नेहा, सरांनी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला."
"काय ? कसं शक्य आहे ? मी होल्डवर ठेवला होता तो प्रोजेक्ट. खूप चूका होत्या त्या प्रोजेक्टमध्ये. तस मी काही चुका रेक्टिफाय केल्या होत्या पण एवढ्या चुका असताना प्रोजेक्ट ॲप्रूव्ह कसा काय होवू शकतो तो ही माझ्या सहीशिवाय? आणि प्रोजेक्टची डेडलाईन तर पुढच्या आठवड्यातली होती ना?" – नेहा.
" तुला फोन केला होता सरांनी पण तुझा फोन 'आऊट ऑफ कव्हरेज' होता.क्लाएंटला प्रोजेक्ट थोडा लवकर हवा होता. प्रोजेक्ट याच आठवड्यात मिळावा म्हणून क्लाएंटने रिक्वेस्ट केली आणि तनयाचा प्रोजेक्ट क्लाएंटला तितकासा आवडला नाही. मग सर म्हणाले की, नेहा आल्यावर शेफालीच्या प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते बदल करेल. तसही क्लाएंटला हा प्रोजेक्ट आवडला आहे तर हाच प्रोजेक्ट ॲप्रूव्ह करावा लागणार." सलोनी.
"अग पण याला काय अर्थ आहे? याला प्रोफेशनॅलिझम नाही म्हणत. अर्जंट हवा होता मिन्स? डेडलाईन तर त्यांनीच ठरवली होती ना?" नेहा.
शेफाली काही बोलणार इतक्यात सरांनी कॉल करुन नेहाला केबिनमध्ये बोलावलं. नेहा केबिनमध्ये गेली.
"नेहा सॉरी, पण अर्जन्सी असल्यामुळे तुझ्या सहीशिवाय मी शेफालीचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह केला. तुझी आजची सगळी कामं सलोनीला डेलीगेट कर. आजचा पूर्ण दिवस क्लाएंट बरोबर कॉन्फरन्स रुममध्ये बसून शेफालीच्या प्रोजेक्टमधे असलेल्या मिस्टेक्स रेक्टिफाय करुन त्यात क्लाएंटच्या इच्छेनुसार आवश्यक ते बदल कर आणि प्रोजेक्ट फायनल कर. क्लाएंटला प्रोजेक्ट लवकर हवा आहे." सर
खरतर नेहाला मनातून प्रचंड राग आला होता. पण तरीही शक्य तितकं शांत रहायचा प्रयत्न करत तिने 'ओके' म्हणून मान हलवली.
"गुड! मीट अवर क्लाएंट मिस्टर अनुप सरदेसाई." असं म्हणून सरांनी समोर बसलेल्या क्लाएंटची ओळख करुन दिली.
सरांच्या केबिनमध्ये येताना नेहा इतकी चिडलेली होती की तिला त्यांच्या केबिनमध्ये अजून कोणी बसलं आहे हे सुद्धा लक्षात आलं नाही. नेहाने क्लाएंटकडे बघितल आणि समोर अनुपला बघून तिला कसं रीॲक्ट व्हावं तेच कळल नाही. कितीतरी वर्षांनी ती अनुपला बघत होती.
"हॅलो नेहा ?" अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली. चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत त्याला 'हॅलो' म्हणाली.
नेहाने केबिनच्या बाहेर येउन शक्य तितकं नॉर्मल रहायचा प्रयत्न करत सलोनीला सगळी कामं समजावली. आज पूर्ण दिवस अनुपबरोबर घालवायचा या कल्पनेने ती काहीशी उदास झाली होती. तिला आठवलं; कॉलेजला असताना याच अनुपचे तिच चांगल स्क्रिप्ट रिजेक्ट केलं होतं. पण आता जे आहे ते प्रोफेशनल रिलेशन आहे त्यामुळे शक्य तितकं प्रोफेशनली वागायचा प्रयत्न करायचा असा विचार करुन ती कॉन्फरन्स रुममध्ये गेली.
अनुप आणि नेहा एकाच कॉलेजमधले. अनुप नेहाला दोन वर्षांनी सिनिअर पण कॉलेजच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमूळे दोघंही एकाच ग्रूपमध्ये होते. कॉलेजचा कल्चरल ग्रूप सोडून या दोघांना जोडणारा अजून एक कॉमन धागा होता; तो म्हणजे विकास. नेहा विकासची बालपणापासूनची मैत्रीण तर विकास आणि अनुपची मैत्री कॉलेजमधली. अनुपची नेहाशी ओळख झाली तिच मुळी विकासची गर्लफ्रेंड म्हणून. अनुपचं विकास आणि नेहा दोघांबरोबरही छान जमत असे. विकासने अनुपला प्रत्येक गोष्टीत मदत केली होती. या नवीन शहरात विकासामुळेच अनुप चटकन रूळला होता. दोघही एकदम खास मित्र बनले होते. नेहा आणि अनुपचही एकमेकांशी छान पटायचं. त्या दोघांच्या आवडीनिवडीही बऱ्यापैकी कॉमन होत्या. विकास शांत सिन्सिअर तर अनुप आणि नेहा एकदम त्याच्याविरुद्ध बिनधास्त, मस्तीखोर. विकास आणि नेहाच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र नेहमीच अनुपचं सॅण्डविच होत असे. पण हे सारं तो छान एंजॉय करत असे.
सगळं सुरळीत चालू असताना अचानक या तिघांच्याही मैत्रीला वेगळच वळण देणारी एक घटना ग्रूपच्या पावसाळी पिकनिकच्या दिवशी घडली. त्यानंतर मात्र अनुप नेहा आणि विकासापासून हळूहळू दुरावत गेला.
"एस्क्युज मी सर मे आय कम इन?" , नेहाच्या आवाजाने कॉन्फरन्स रुममध्ये विचारांच्या तंद्रीत हरवलेला अनुप भानावर आला.
"ओह येस शुअर! टेक युअर सिट प्लीज. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतोय"- अनुप.
"इट्स ओके, डोंट माईंड प्लीज! आपण प्रोजेक्टवर वर्किंग सुरु करुया का?" अस म्हणत नेहा पुढे येउन त्याच्या समोरच्या चेअरवर बसली .
अनुपनेही मानेनेच होकार दिला. खरं तर अनुपला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करायची हेच त्याला कळत नव्हतं. तो विचारात हरवलेला असतानाच नेहा त्याच्याकडे लॅपटॉप सरकावत म्हणाली, "खरं तर या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच चुका आहेत यातल्या काही चुका आणि त्यांची करेक्शन्स मी रजेवर जाण्यापूर्वी या फाईलमध्ये स्टोअर करुन ठेवल्या होत्या. उरलेल्या चूका कशा काय सुधारायच्या यावर आपण नंतर चर्चा करुच पण तुम्ही आधी ही सजेशन्स तुम्हाला पटतात का ते बघाल का?" नेहाने शक्य तेवढं प्रोफेशनली बोलायचा प्रयत्न करत अनुपला विचारल.
तिचं असं प्रोफेशनल वागणं बघून अनुप काहीसा निराश झाला. पण तरीही क्षणात स्वतःला सावरुन तो लॅपटॉपवरची फाईल काळजीपूर्वक बघू लागला. दोघांमध्ये बराच वेळ प्रोजेक्ट या विषयावरच चर्चा सुरु होती. दोघं चर्चेमध्ये इतके गढून गेले की, तहान भूक कशाचच भान उरल नाही. अखेर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सगळं वर्किंग पूर्ण झालं. नेहाने अतिशय हुशारीने शेफालीच्या मूळ प्रोजेक्टला धक्का न लावता त्यातल्या त्रूटी दूर केल्या होत्या. तिची हुशारी आणि कामाप्रतिचं डेडीकेशन बघून अनुप चांगलाच इंप्रेस झाला होता. प्रोजेक्ट पुन्हा एकदा नजरेखालून घालत अनुप नेहाकडे बघत म्हणाला, 'परफेक्ट!' ... हे ऐकून नेहाही रिलॅक्स झाली.
"ओके, आता मी जाऊ शकते का?"नेहा.
खरं तर अनुपला मनातून तिला सांगावसं वाटत होतं; 'थांब ना थोडावेळ इतके वर्षांनी भेटलोय...' पण मनातलं सगळं मनातच ठेवून तो म्हणाला, "ओके थॅंक्स ॲंड सॉरी!"
"इट्स ऑल राईट ॲंड आफ्टरऑल इट्स माय ड्युटी!" असं म्हणून नेहा जायला निघाली. तेवढ्यात अनुपने तिला विचारल, "तुझ्या मुलाला बरं नव्हतं असं कळलं कशी आहे त्याची तब्येत आता?"
"ठिक आहे, म्हणूनच आज ऑफिसला आले ना?" नेहा
"आणि विकास कसा आहे?"- अनुप
या प्रश्नावर नेहा क्षणभर स्तब्ध झाली. पण मग स्वतःला आणि डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना थांबवत ती म्हणाली, " विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर."
तिचं उत्तर ऐकून अनुपला धक्का बसला. काय बोलायचं त्याला काहीच सुचत नव्हत. स्वतःला सावरुन तो नेहाला काही विचारणार तोपर्यंत नेहा निघून गेलेली होती. त्यानंतरही कितीतरी वेळ तो कॉन्फरन्स रुममध्ये तसाच बसून होता. "विकास आता या जगात नाही, ही इज नो मोअर...." नेहाचे हे शब्द त्याच्या कानात गरम तेल ओतल्यासारखे घुमत होते. विकासच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.
कॉलेजला असताना दोघांनी मिळून केलेली धम्माल; ते कल्चरल प्रोग्रॅम्स, रुमच्या कट्ट्यावर आणि विकासच्या घराच्या गच्चीत जागवलेल्या रात्री..... सगळं एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर आलं. आणि त्यानंतरची पावसाळी पिकनिक ...... पावसाळी पिकनिक आठवली आणि अनुप विकासच्या आठवणींमधून बाहेर आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी अनुप विकासच्या घरी गेला. दार नेमकं नेहाने उघडल. नेहाला समोर बघून अनुप गोंधळला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, "विकासच्या आई बाबांना भेटायचं आहे."
नेहाने त्याला आत बोलावून बसायला सांगितल. हॉलमध्ये भिंतीवर टांगलेला विकासचा फोटो बघून अनुपचे डोळे पाणावले. तो त्या फोटोसमोर गेला पण तेवढ्यात विकासचे बाबा बाहेर आले. त्यांना पाहून अनुपने चटकन पुढे होवून त्यांना नमस्कार करत अनुप म्हणाला, "काका मला ओळखलत? मी अनुप ... विकासचा मित्र .आम्ही कॉलेजला एकत्रच..... "
"अरे हो.... ओळखलं तुला. तू तर गायबच झालास एकदम. कुठे होतास इतकी वर्ष?" विकासचे बाबा.
"पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून US ला गेलो आणि मग तिथेच नोकरी मिळाली. आत्ता दोन वर्षांपूर्वीच आई गेली. बाबा तिकडे यायला तयार नाहीत म्हणून मग मी इकडे भारतात परत यायचा निर्णय घेतला. आता वर्षभरापूर्वीच इथे स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला आहे. योगायोगाने ऑफिसच्या कामानिमित्त काल नेहाची भेट झाली आणि विकासाबद्दल कळलं. ते ऐकल्यावर मी सून्न झालो एकदम. काल रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कसं झाल हे काका?" -अनुप.
"नियतीच्या मर्जीपुढे कोणी जाऊ शकत नाही. साधासा ताप वाटला होता पण तपासण्या केल्यावर डेंग्यू आणि मलेरिया दोन्ही एकदम झाल्याचं निदान झालं . दिड महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. पण .......बोलता बोलता विकासच्या बाबांचा कंठ दाटून आला.
"काका मी समजू शकतो तुमचं दु:ख. मी विकासची जागा नाही घेऊ शकत पण एक सांगतो, विकास नसला तरी मी आहे. कधीही कसलीही गरज लागली तर मला हक्काने सांगा." – अनुप.
तेवढ्यात विकासची आई गरमागरम पोहे आणि चहा घेवून येते आणि अनुपला म्हणते, "तू आल्याचं कळलं आणि लगेच पोहे करायला घेतले. तू आणि विकास दोघांनाही माझ्या हातचे पोहे खूप आवडायचे. आठवतय का तुला तुमच्या दोघातं पैज लागायची कोण जास्त पोहे खातंय ...... बोलता बोलता विकासच्या आईचा स्वर कापरा झाला. नकळत अनुपचे डोळे पाणावले. तेवढ्यात एक तीन साडेतीन वर्षांचा मुलगा स्कूल ड्रेस घालून बाहेर आला आणि विकासच्या बाबांना बिलगला. हा नक्कीच विकासचा मुलगा असणार हे अनुपने लगेच ओळखलं.
"विहान, हा अनुप काका आहे तुझा कसा फ्रेंड आहे अर्णव, तसा हा तुझ्या बाबांचा फ्रेंड अनुप”. विकासचे बाबा म्हणाले.
"हॅलो अनुप काका" विहान गोड आवाजात म्हणाला.
अनुपने त्याला जवळ बोलावल आणि खास त्याच्यासाठी आणलेली कॅडबरी त्याच्या हातात दिली. कॅडबरी बघून सहाजिकच विहान खूष झाला. तेवढ्यात नेहा बाहेर आली.
"आई, मी विहानला शाळेत सोडून पुढे ऑफिसला जाते आज त्याची स्कूलबस येणार नाही त्यामुळे तुम्हाला किंवा बाबांनाच त्याला आणावं लागेल." नेहा.
नेहा आणि विहान निघून गेल्यावर विकासचे बाबा अनुपला म्हणाले, "या दोघांकडे बघूनच जगतोय आता आम्ही. नाहीतर एकूलता एक मुलगा निघून गेल्यावर आम्ही अगदी खचून गेलो होतो. पण नेहा आणि विहानकडे बघून सावरलं स्वतःला. विकास गेला तेव्हा दिड वर्षांचा होता रे विहान. त्याला तर विकास आठवतही नसेल. पण बाबाची कमी मात्र जाणवते. नेहापुढे तर अख्ख आयुष्य पडलय पण विकास गेल्यापासून ती हसणच विसरलेय. अनुप, कॉलेजला असताना तू नेहाचाही चांगला मित्र होतास ना? जमलं ना तर तिला या दु:खातून बाहेर काढशील? आम्ही थकलो आता तिला समजावून." बोलता बोलता विकासच्या बाबांना रडू कोसळलं.
"रडू नका काका. होईल सगळं व्यवस्थित. मी मगाशीच तुम्हांला सांगितल ना, 'विकास नसला तरी मी आहे. तुम्हांला कधीही काहीही वाटलं तरी हक्काने सांगा मला आणि हो काळजी करु नका मी बोलेन नेहाशी." अनुप.
विहानला शाळेत सोडून नेहा ऑफिसला गेली. पण अनुप आणि त्याच्यामुळे पुन्हा आठवलेली पावसाळी पिकनिक काही तिच्या डोक्यातून जात नाही. दिवसभर ऑफिसमध्ये नेहा यांत्रिकपणे वावरत होती.
असेच काही दिवस सरले. अनुप आणि नेहाची ऑफिसच्या कामानिमित्त अधूनमधून भेट होत होती. पण नेहा मात्र त्याच्याशी शक्य तितकं प्रोफेशनल वागत होती. अनुप अधूनमधून विकासच्या आई बाबांना भेटायला त्यांच्या घरी जात होता, पण नेहा नसताना. कारण नेहाचं प्रोफेशनल वागणं बघून मनातून कुठेतरी तो दुखावलेला होता. नेहाच्या मुलाची; विहानची आणि अनुपची मात्र खूप छान गट्टी जमली होती.
एक दिवस संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहा पार्किंगमध्ये गाडी काढायला जात असताना नेमका त्याच वेळी अनुप तिथे आला . अनुप समोर आल्यावर कसं रिॲक्ट व्हावं तेच तिला कळत नव्हतं. भूतकाळात काहीही घडलेलं असलं तरी वर्तमानात अनुप तिच्या ऑफिसच्या रेग्युलर आणि महत्वाच्या क्लाएंटपैकी एक क्लाएंट होता. त्यामुळे त्याला डावलून पुढे जाणं तिच्या प्रोफेशनल एथिक्समध्ये बसणारं नव्हतं. ती काही बोलणार इतक्यात अनुप तिला म्हणाला, "मी तुलाच भेटायला आलो होतो नेहा. मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी."
"प्रोफेशनल का पर्सनल?" नेहाने अलिप्तपणे विचारलं.
"पर्सनल !" तिने जितक्या अलिप्तपणे विचारलं अनुपने तितक्याच सहजपणे तिला सांगितल.
"बोल, काय बोलायचं आहे ? नेहा
"इथे नको आपण बाहेर जाऊया. तुझी गाडी राहूदे इथेच मी घरी सोडतो तुला. तसही उद्या सकाळी मला तुमच्या ऑफिसला यायचच आहे. मी येता येता तुला पिक करेन. चालेल ?" अनुप
"ठिक आहे. तू हो पुढे मी घरी कळवते उशीर होइल म्हणून." नेहा.
तिच असं चटकन 'हो' म्हणणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्याला जे बोलायचं होतं ते ऐकल्यावरही ती इतक्याच शांतपणे रीॲक्ट होइल ही अपेक्षा करणंसुद्धा चूकीचं आहे याची त्याला कल्पना होती. पण तरीही त्याला आज मनातलं सगळं तिच्याशी शेअर करायचं होतं. खास करुन त्या पावसाळी पिकनिकच्या दिवसाबद्दल!
अनुपची गाडी हायवे सोडून एका गावाकडच्या रस्त्याला लागली. अगदीच निर्मनुष्य नसला तरी रस्ता तसा शांत होता. तिथल्याच एका चहाच्या टपरीच्या थोड पुढे जाऊन अनुपने गाडी थांबवली आणि नेहाला विचारलं, "नेहा इथेच गाडीबाहेर उभ राहून चहा घेत बोलूया का? मिन्स इफ यू आर कंफर्टेबल."
"इट्स ओके नो प्रॉब्लेम", नेहा.
अजूनही तिच्या बोलण्यातला अलिप्तपणा गेलेला नाही हे अनुपला पुन्हा जाणवलं.
गाडीतून बाहेर येवून नेहा गाडीला टेकून उभी राहिली. समोरुन आलेल्या गार वाऱ्याच्या झुळूकीमुळे तिला अगदी प्रसन्न वाटत होतं. कितीतरी दिवसांनी नव्हे महिन्यांनी ती अशी मोकळं वातावरण अनुभवत होती. या अशा वातावरणात ती आणि विकास खूप वेळा फिरायला येत असत. विकासच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.
"नेहा चहा!" अनुपच्या आवाजाने नेहा भानावर आली.
अनुपच्या हातातला चहाचा ग्लास बघून अचानक तिला पावसाळी पिकनिक आठवली. क्षणभर तिची आणि अनुपची नजरानजर झाली. त्याच्या नजरेत तिला आजही तेच भाव दिसत होते जे तिला 'त्या' दिवशी दिसलेले होते. "पण मग नक्की कुठे चुकलं आणि काय?" नेहाच्या मनात भूतकाळातल्या विचारांची गर्दी झाली.
"नेहा चहा घे गार होतोय... आणि मला माहिती आहे तुला एकदम कडक चहा लागतो. तुझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुला मिळतील. खरतर त्याचसाठी आपण आलोय इथे”, अनुप.
"इतक्या वर्षांनंतर आज तुला ती सगळी उत्तरं द्यावीशी वाटतायत?" नेहाने चहाचा ग्लास हातात घेत विचारलं.
" हो! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ येईल अस मला कधीच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट ही वेळ यावी असही मला वाटत नव्हतं. पण दुर्दैवाने म्हण किंवा आणखी काही, पण आज ती वेळ आलेय", अनुप.
"प्रेम करत होतास माझ्यावर?" नेहा.
"तुला वाटतय असं?" अनुपने प्रतिप्रश्न केला.
"मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटत होतं हे जाणून घ्यायचं आहे मला", नेहा.
"तू आवडायचीस आधीपासून. आपलं ट्युनिंगही खूप छान जुळलं होतं. पण यापलीकडे जाऊन त्यावेळी माझ्या मनात दुसरी कुठलीच भावना नव्हती किंवा दुसऱ्या कुठल्या भावनेचा मला विचार करायचा नव्हता. कारण तू विकासची गर्लफ्रेंड होतीस. पण मला आजही आठवतोय तो पावसाळी पिकनिकचा दिवस.....
सम्याची गाडी बंद पडली आणि विकास त्याच्याबरोबर थांबला. खरतर तेव्हा मी सम्याबरोबर थांबाणार होतो पण विकासच आणि सम्याच घर एकाच रोडवर असल्यामुळे तो त्याच्याबरोबर थांबला." अनुप.
त्यादिवशी मी तुझ्या गाडीवर बसले आणि आपण दोघ एका वेगळ्याच विश्वात वावरू लागलो. आपण दोघही भिजून ओलाचिंब झालो होतो. अशा परिस्थितीत तुझा ओझरता होणारा स्पर्शही मनात एक अनामिक धडधड निर्माण करत होता. मला तुझ्याबरोबरचे ते क्षण हरवू द्यायचे नव्हते. जास्तीत जास्त वेळ तुझ्याबरोबर घालवायचा होता. म्हणूनच नंतर चहाची टपरी दिसल्यावर जेव्हा आपण चहा घ्यायला थांबलो तेव्हा मी समोरच्या डोंगरावर जायचा हट्ट केला; मुद्दाम ठरवून नाही; ती अगदी सहज रिॲक्शन होती मनाची. हे सगळं मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होते. विकासबरोबर असताना या अशा भावना कधी निर्माणच झाल्या नव्हत्या मनात", नेहा.
त्या डोंगरावर गेलो तेव्हा पहिल्यांदा ग्रूप किंवा विकास सोडून फक्त आपण दोघच एकत्र होतो. त्या दिवशी मला आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली. तुला मनमोकळेपणे बोलताना, हसताना मी प्रथमच इतकं निरखून बघत होतो. अचानक एका क्षणी तू अगदी जवळ आलीस आणि स्वतःवरचा ताबा सुटतोय की काय असं वाटत असताना मी स्वतःला सावरलं. त्या क्षणी स्वतःला तुझ्या मिठीतून बाजूला केलं ते कायमच दूर होण्यासाठीच. त्यानंतर मी जाणीवपूर्वक तुझ्यापासून लांब रहायचा प्रयत्न केला म्हणूनच कल्चरल प्रोग्रॅमच्या वेळी तुझ स्क्रिप्ट उत्तम असतानाही मी ते रिजेक्ट केलं कारण मला तुझ्यापासून लांब रहायचं होतं. तुझ्या आणि विकासच्यामध्ये मला कधीच यायच नव्हतं. कारण तुझ्यापेक्षा विकास आणि त्याची मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची होती", अनुप.
"सगळं काही एकट्याने किती सहज ठरवून टाकलस ना तू. माझा विचारही नाही केलास. तुझ्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं होतं की विकास आणि माझ्यामध्ये खूप छान मैत्री आहे खूप छान बॉन्ड आहे पण ते प्रेम नाही. पण तरीही मी कनफ्युज होते. मनातल्या विचारांचा गुंता सुटत नव्हता. कळत नव्हतं नक्की मला वाटतय तसच आहे का तुझ्याबद्दल वाटणाऱ्या क्षणिक आकर्षणामुळे असं वाटतय? एकीकडे मी अशा गोंधळलेल्या मनस्थितीत होते आणि दुसरीकडे तू मला टाळतोयस हे मला स्पष्ट जाणवत होतं. कळतच नव्हतं मला काय करावं. तुझ्याशिवाय याबद्दल मी कोणाशीच बोलू शकत नव्हते. पण तू तर माझ्यापासून शक्य तितका दूर रहायचा प्रयत्न करत होतास. तुझ्या मनात नक्की काय आहे हेच मला कळत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं; तू माझं स्क्रिप्ट रिजेक्ट केल्यामुळे आपण दुरावलोय पण प्रत्यक्षात जे काय घडलं होत ते आपल्या दोघांशिवाय कोणालाच माहिती नव्हतं", नेहा.
"मला माफ कर नेहा पण मला तुमच्यामध्ये यायचं नव्हतं. मुख्य म्हणजे मला विकासची मैत्री गमवायची नव्हती. जी माझ्यासाठी खूप महत्वाची होती. पण आज विकासच या जगात नाहीये तर स्वतःच घातलेली स्वतःवरची बंधन झुकारुन मी तुझ्याशी बोलायच ठरवलं. आज मी प्रामाणिकपणे कबूल करतो की हो प्रेम करत होतो मी तुझ्यावर अगदी मनापासून!" अनुप
हे सगळं ऐकून नेहा सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. थोडावेळ कोणीच काही बोलत नाही.
"नेहा, फक्त एवढच नाही तर अजूनही खूप काही सांगायच आहे तुला." अनुप.
"बोल अनुप, जे काही बोलायच असेल ते आज बोलून टाक. बोलायच होत पण बोलता आलं नाही असं नंतर नको वाटायला”, नेहा.
"विकासच्या बाबांनी मला तुझ्याशी लग्न करशील का? असं विचारलय", अनुप.
"काय ? हे कसं.... कधी?.... मला काहीच माहिती नाही यातलं", नेहा.
"गेल्या आठवड्यातच विचारलं त्यांनी. त्यांना तुझी खूप काळजी वाटते नेहा. एकदा का तू तुझं आयुष्य नव्याने सुरु केलस की ते रिलॅक्स होतील, असं वाटतय त्यांना. खरतर माझ्यासाठीही हा प्रश्न अनपेक्षित होता. पण 'मी विचार करतो' असं म्हणून विषय थांबवला", अनुप.
"सॉरी अनुप. पण तू त्यांच्या बोलण्याचा एवढा सिरिअसली विचार नको करुस. मी समजावेन त्यांना." नेहा.
"मी विचार करतोय नेहा. पण त्यापूर्वी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच भेटलोय आपण आज", अनुप.
"पूर्वीची गोष्ट वेगळी होती अनुप आता मी एक विधवा आहे. एका मुलाची आई आहे आणि तू सिंगल आहेस. उगाच भावनेच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याचा पुढे जाऊन आपल्या दोघांनाही त्रास होइल." नेहा.
"भावनेच्या भरात नाही नेहा. गेला आठवडाभर विचार करत होतो मी यावर. विहानच आणि माझं छान जमतं. त्याला या वयात आई इतकीच पित्याच्या प्रेमाचीही गरज आहे. कुठेतरी तो माझ्यामध्ये त्याचे वडील शोधत असतो. सगळ्यात महत्वाच म्हणजे विहान विकासचा मुलगा आहे. त्याची शेवटची आठवण! ही आठवण मला आयुष्यभर जपायची आहे. माझ्याकडून विहानला कधीच सावत्र वागणूक मिळणार नाही. पण या साऱ्याबरोबरच मला तुझा विचार पण तितकाच महत्वाचा वाटतो. म्हणूनच तू कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायच आहे", अनुप.
"भूतकाळाबद्दल? आता अजून कुठला भूतकाळ अनुप?" नेहा
"तुमच्या दोघांपासून दूर जायचं म्हणून मी यु. एस. ला निघून गेलो. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुदैवाने मला नोकरीही मिळाली. नोकरीत स्थिरावत असतानाच तुमच्या लग्नाची बातमी कानावर आली. मनातून जेवढा आनंद झाला तेवढच अंतर्मनात खोल कुठेतरी प्रचंड दु:ख झालं होतं. या सगळ्यातून सावरणं मला खूप कठीण जात होतं. नेमकं त्याचवेळी 'सारा' माझ्या आयुष्यात आली. आधी खूप छान मैत्री झाली पण नंतर एका रात्री आम्ही खूप जवळ आलो. साराला लग्न करायच नव्हतं. तिचा विवाहसंस्थेवर विश्वासच नव्हता. त्यानंतर आम्ही दोन वर्ष 'लिव्ह इन" मध्ये रहात होतो. मी जेव्हा भारतात परत यायचा निर्णय घेतला तेव्हा तिने खूप विरोध केला. पण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. बाबांसाठी मला परत यावच लागणार होतं. भावनिकदृष्ट्या आम्ही दोघही एकमेकांमध्ये गुंतलो होतो. मी सारासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण ती तिच्या मतावर ठाम होती. अखेर नाईलाजाने मला ते रिलेशन तोडावं लागलं. सारानेही प्रॅक्टिकल विचार करुन हे "ब्रेकअप" स्विकारल. त्यानंतर मी भारतात परत आलो. भारतात परत आल्यावर मात्र माझा आणि साराचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं तुला सांगण खूप आवश्यक वाटलं मला म्हणून मी सांगितल. बाकी तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण माझा निर्णय झालाय. मी तुला विहानसकट स्विकारायला तयार आहे", अनुप.
"आपण सगळं बोलतोच आहोत तर इतके दिवस मनात साठवलेलं बोलून मी ही मोकळी होते. माझं आणि विकासच लग्न झाल्यानंतरही मी तुला विसरु शकले नव्हते अनुप. विकासला मला कधीच फसवायचं नव्हतं पण माझ्या मनातला गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्तही करु शकत नव्हते. कारण मुळात माझ मलाच काही कळत नव्हतं. विकास नेहमीच आदर्श नवरा आदर्श मित्र होता. पण तो माझा प्रियकर नाही होवू शकला. विकासबद्दल माझी काहीच तक्रार नाही/ नव्हती; कारण मुळात चूक माझीच होती. मी स्वतःच्या भावना समजूच शकले नाही. माझ्या मनातल्या 'त्या' भावना विकासासाठी कधीच नव्हत्या त्या तुझ्यासाठी होत्या हे मला खूप उशीरा समजलं. पण समजूनही मी काहीच करु शकले नाही आणि जे समोर आहे ते स्विकारत गेले. पण तरीही आज आपण एकत्र नाही येऊ शकत. कारण जे नातं कोणाच्यातरी नसण्यावर अवलंबून आहे असं नातं मला जोडायचच नाहीये", नेहा.
"कोणाच्यातरी नसण्यावर? म्हणजे मी समजलो नाही. तुला नक्की काय म्हणायच आहे ते",अनुप.
"मला जे म्हणायच आहे ते तुला कितपत समजावता येइल ते नाही माहिती मला पण प्रयत्न करते.
अनुप तू विकाससाठी माझ्यापासून लांब राहिलास. आज विकास नाही म्हणून तू तुझं माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलस. पण परिस्थिती जशी आहे तशी नसती तर? विकास आज आपल्यामध्ये असता तर? तर काय अनुप? आयुष्यभर मी हे कधी समजूच शकले नसते की तुझही माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे हे नातं नेहमीच विकासच्या अस्तित्वावर अवलंबून होत. कदाचित नियतीला आपण एकत्र येणं कधी मंजूरच नव्हतं”, नेहा.
"इथे नियतीचा प्रश्न कुठे आला नेहा? तू चुकीच्या दिशेने विचार करतेयस. जर तू ठरवलस तर आपण आजही एकत्र येऊ शकतो” , अनुप.
नाही, मी कुठलाही चुकीचा विचार करत नाहीये. आज आपल्यात ते नातं निर्माण नाही होवू शकत जे तेव्हा होवू शकलं असत. जर त्यावेळी हे नातं निर्माण झालं असतं तर विकास दुखावला गेला असता पण त्याने हे सगळं मोकळ्या मनाने स्विकारल असतं. आणि आपल्यामध्ये प्रेमाच एक सुंदर नातं निर्माण झालं असतं. पण आज सगळीच परिस्थिती बदलली आहे.", नेहा.
"नेहा रिमॅरेज हे बहुतांश वेळा कोणाच्यातरी नसण्यावरच अवलंबून असतं.", अनुप.
"हो पण ते पूर्णपणे नव्याने तयार होणारं नातं असतं. आपल्याबाबतीत तसं नाही आपलं नातं नेहमीच 'विकास' या एकाच गृहितकावर आधारित होतं आणि ही परिस्थिती कायम अशीच राहील.
तू एक चांगला माणूस आहेस म्हणूनच मला तुझी आयुष्यभर सोबत हवी आहे पण एक चांगला मित्र म्हणून. कारण प्रेमापेक्षा जास्त चांगल तू मैत्रीचं नातं निभावशील. आयुष्याच्या 'या वळणावर' मला खरच एका मित्राची गरज आहे. आणि तुझ्यापेक्षा चांगला मित्र मला दुसरा कोणीच मिळू शकत नाही म्हणूनच मला हे मैत्रीच नातं गमवायचं नाहीये. आपण आज पुन्हा नव्याने या मैत्रीच्या नात्याला सुरुवात करुया अर्थात तुझी इच्छा असेल तर”, नेहा.
"मी तुझ्याबरोबर नेहमीच असेन नेहा. मग ती मैत्री असो वा प्रेम! नात्याच नाव महत्वाच नाही. माझ्यासाठी तू खूश असणं महत्वाच आहे. आयुष्यातल्या त्या सुंदर वळणावर आपण एकत्र नाही येऊ शकलो पण 'या वळणावर' मात्र पुन्हा एकदा जगातल्या सगळ्यात सुंदर आणि निरपेक्ष अशा मैत्रीच्या नात्याची सुरुवात करुया आपण!" अनुप.
नेहाच्या चेहऱ्यावर आज कितीतरी दिवसांनी समाधान दिसत होतं. आयुष्यात प्रथमच तिला हवं असणारं नातं निर्माण झालं होतं. आणि ते ही अगदी आयुष्यभरासाठी!
समाप्त
©मानसी जोशी.