बटर चॉकलेट कूकीज
१ वाटी लोणी/ बटर
२ ते ४ चमचे दूध
१ वाटी पिठीसाखर किंवा अर्धी वाटी साखर आणि अर्धी
वाटी पिठीसाखर
१ चमचा व्हॅनिला/ चॉकलेट इसेन्स
१ ते सव्वा वाटी कणिक
३ ते ४ चमचे कोको पावडर
१ चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा सोडा
लोणी चांगल फेसून घेऊन त्यामध्ये दूध, साखर घालून चांगल फेसून व्हॅनिला इसेन्स घालावा.
दुसऱ्या भांड्यात कणिक, कोको पावडर, सोडा, बेकिंग पावडर एकत्र करुन चाळून घ्यावी.
दोन्ही मिश्रण एकत्र करुन सैलसर पीठ तयार कराव. लिंबाएवढे गोळे करुन (किंचित चपटे) प्रीहिटेड मायक्रोवेव्ह मध्ये 180° वर १८ ते २० मिनिटे बेक करुन कूकिज थंड होण्यासाठी वायर रॅक किंवा चाळणीवर ठेवून मगच एअर टाईट डब्यात भाराव्यात.
**मायक्रोवेव्ह मधून काढल्यावर थोड्या मऊ वाटतात पण नंतर क्रिस्पी होतात. शक्यतो २० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही.
-मानसी जोशी
**** **** **** **** ****
मूगडाळ ढोकळा
साहित्य:
२ वाट्या मूगडाळीचं पीठ
५ चमचे साखर
५ चमचे तेल
१ चमचा खायचा सोडा
अर्धा ते एक चमचा किसलेलं आलं
१ चमचा मिरची पेस्ट
१ चमचा सायट्रिक ॲसिड साधारणतः १ फुलपात्र पाण्यात विरघळून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी: तेल, मोहरी, हिंग
सजावटीसाठी : खोबरं (खवलेला नारळ), कोथिंबीर
कृती:
१. मूगडाळीच पीठ, तेल, साखर, मीठ, किसलेलं आलं, मिरची पेस्ट हे सगळं एकत्र करुन त्यामध्ये सायट्रिक ॲसिड विरघळवलेलं पाणी हळूहळू मिक्स करावे.
२. नंतर सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे( म्हणजे गुठळी रहात नाही).
३. नंतर या मिश्रणात सोडा घालून साधारणतः १ मिनिट चांगले फेटून घ्यावे.
४. तेल लावलेल्या कुकरच्या डब्यात अथवा भांड्यात हे मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवावे व भांड्यावर झाकण ठेवावे आणि कुकरचे झाकण लावावे(***शीट्टी लावू नये).
५. पहिली ५ मिनिटे गॅस हाय फ्लेमवर ठेवून नंतर २०/२५ मिनिटे मिडिअम फ्केमवर ठेवावा.
६. गॅस बंद करुन लगेचच कुकरचं झाकण काढून ढोकळ्यावरचं झाकण काढून सुरी किंवा टुथपिक घालून ढोकळा झालाय का ते बघून लगेचच डबा कुकरमधून बाहेर काढावा.
७. साधारण गार झाल्यावर ताटात उलटा करुन वरुन फोडणी घालून (***फोडणीत हळद घालू नये), नारळ कोथिंबीर घालावी.
****टिप: फोडणी करताना त्यामध्ये साखरेचं पाणी (अर्धा चमचा साखर पाव ते अर्धी वाटी पाण्यात विरघळवून ) घातल्यास फोडणी ढोकळ्यात आतापर्यंत पोचते आणि ग्लेझिंगही चांगले येते.
**** **** **** **** ****
रवा चॉकलेट केक
साहित्य:
२ वाट्या रवा
२ वाट्या साखर
२ वाट्या दही
२ चमचे बेकिंग पावडर
२ चमचे कोको पावडर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स
१ चमचा सोडा
ग्रिसिंगसाठी तूप
कृती:
१. प्रथम रवा, साखर आणि दही एकत्र करुन घ्यावे
२. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घालून
मिश्रण व्यवस्थित फेसून घेणे.
३. त्यानंतर त्यामध्ये इसेन्स घालून मिश्रण पुन्ह व्यवस्थित
फेसावे.
४. तूपाचे ग्रिसिंग केलेल्या केकच्या डब्यात अर्धे मिश्रण
ओतावे
५. उरलेल्या मिश्रणात दोन चमचे कोको पावडर घालून
मिश्रण एकत्रीत करुन घेउन मग ते केकच्या डब्यात
ओतावे
६. प्रिहिटेड मायक्रोवेव्हमध्ये १९० डिग्रीवर २५ ते ३०
मिनिटे केक ठेवून द्यावा. (गॅसवर करायचा असल्यास
फ्राइंग पॅनमध्ये ५ ते ७ मिनिटे हाय फ्लेमवर ठेवून
नंतर १२/१५ मिनिटे मिडिअम फ्लेमवर व नंतर ५/७
मिनिटे सिमवर ठेवावा.)
७.केक मायक्रोवेव्हमधून काढल्यावर टूथपिक किंवा सूरी
घालून केक तयार झाल्याची खात्री करुन केक दहा
मिनिटे तसाच ठेवावा.
८. त्यानंतर एका डिशमध्ये उलटा करुन त्याचे पिसेस
करावेत.
©मानसी जोशी
**** **** **** **** ****
नवरतन कोर्मा
साहित्य:
१. मध्यम आकारात चिरलेल्या भाज्या -
फ्लॉवर , गाजर, फरसबी, बटाटे
२. मध्यम आकारात फळांचे तुकडे
अननस , सफरचंद, पनीरचे चौकोनी तुकडे
३. १०/१२ काजूगर
४. एक मोठा कांदा
५. १ चमचा आलं लसूण पेस्ट, १/२ चमचे साखर, मीठ
६. १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
७. १ चमचा धने-जीरे पावडर
८. खडा मसाला - ३/४ मीरीदाणे, १/२ लवंगा, १ वेलची
बारीक चिरून, दालचिनीचा तुकडा, ३/४ तमालपत्र
९. १ चमचा केशर- विलायची सायरप
१०. २ चमचे साय किंवा फ्रेश क्रिम
११. सजावटीसाठी कोथिंबीर, डाळींबाचे दाणे, द्राक्षे,
ड्रायफ्रूट्स- मनुका, बेदाणे, बदाम, ई.
कृती:
१. प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालून
बटाट्याची फोडी आणि गाजराच्या फोडी घालून पाणी
उकळायला ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यात फ्लॉवरचे
तुकडे आणि फरसबी घालून भाज्या शिजेपर्यंत
उकळून घ्यावे.
२. दुसऱ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये पाणी घालून
काजूगर, तमालपत्र आणि चिरलेला कांदा घालून
काजूगर शिजेपर्यत पाणी उकळवून घ्यावे.
३. शिजलेल्या भाज्या पाण्यातून काढून घ्याव्यात. आणि
शिजलेल्या काजूगर आणि कांद्याची पेस्ट
करावी(तमालपत्र बाजूला काढावीत)
४. कढईत तुप किंवा तेल गरम करुन त्यामध्ये खडा
मसाला व आलं लसूण पेस्ट टाकून परतून काजूगर-
कांद्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं.
५. नंतर धना-जीरं पावडर व थोडं पाणी घालून उकळी
आल्यावर भाज्या व मीठ घालून परतावे. आवश्यकता
वाटल्यास थोडं पाणी घालावं. नंतर केशर विलायची
सायरप, पनीर, चिरलेली फळे व साखर घालून परतावे.
६. चांगले परतून त्यामध्ये साय किंवा फ्रेश क्रिम घालून
ड्रायफ्रूट्स, द्राक्ष, डाळींबाचे दाणे व कोथिंबीर घालून
झाकण ठेवून साधारणतः अर्ध्या ते एक मिनिटांनी
गॅस बंद करावा.
©मानसी जोशी
**** **** **** **** *****
चॉकलेट केक
साहित्य:
१. कणिक / मैदा १ वाटी
२. कोको पावडर ३ चमचे
३ साखर ३/४ (पाऊण) वाटी
४. बेकिंग पावडर १ चमचा
५. खायचा सोडा १/२ (अर्धा ) चमचा
६. लिंबू रस १ चमचा
७. तेल १/४ (पाव)वाटी
८. चिमूटभर मीठ
९. पाणी १ वाटीपेक्षा थोडे कमी
१०. चॉकलेट किंवा व्हॅनिला इसेन्स १ चमचा
कृती:
१. प्रथम कणिक/ मैदा, कोको पावडर, मीठ, बेकिंग पावडर आणि खायचा सोडा एकत्र करुन चाळून घेणे.
२. दुसऱ्या भांड्यात पाणी घेउन त्यामध्ये साखर विरघळल्यावर लिंबूरस घालून मिक्स करुन घेणे.
३. दोन्ही मिश्रणे एकत्र करुन(कृती क्र. १ व २ )त्यामध्ये तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.
४. Microwave 200° सेल्सियसवर prehit करुन घेणे.
५. केकपात्राला तेल लावून त्यावर थोडीशी कणिक भुरभुरुन डस्टिंग करुन घेणे.
६. तयार मिश्रण केकच्या भांड्यात ओतून 200° सेल्सियसवर २५ ते ३५ मिनिटे बेक करणे.
७. कुकरमध्ये करायचा असल्यास प्रथम कुकर कोरडा करुन ५ मिनिटे गरम करुन घ्यायचा गॅस लहान करून त्यामध्ये कुकरचा रिकामा डबा खाली ठेवून त्यावर मिश्रणाचा डबा ठेवून द्यायचा. कुकरचे झालण न लावता कुकरवर एक मापाची ताटली ठेवून गॅस मोठा करुन ५ ते ७ मिनिटांनी गॅस मध्यम आचेवर करणे. साधारणतः ४० ते ५० मिनिटे लागतात.
#चॉकलेटसॉस// Choco frosting
साहित्य:
१. पाव (१/४)कप बटर
२. अर्धा (१/२) कप कोको पावडर
३. साखर १ कप
४. दुध पाव (१/४) कप
५. चॉकलेट / व्हनिला इसेन्स
कृती:
१. बटर मेल्ट करुन त्यामध्ये पिठीसाखर, कोको पावडर व दुध मिक्स करुन घेणे. गुठळी रहाता कामा नये. चांगले मिक्स झाल्यावर अर्धा ते १ चमचा चॉकलेट/ व्हॅनिला इसेन्स टाकून चांगके मिक्स करुन घेणे.
२. एक ते दिड मिनिट मध्यम आचेवर ठेवणे. मिश्रण मधूनमधून ढवळणे गुठळी होवू देउ नये.
३.साधारण कोमट झाल्यावर ब्लेंडरने किंवा एग बिटरने २ मिनिटे चांगले फेसून घेणे. आवश्यकता वाटल्यास अजून दुध मिक्स करता येइल. साधारणतः मधाइतकी कन्सिस्टंसी झाली पाहिजे.
केक तयार झाल्यावर त्याला थंड होवू द्यावा. थंड झाल्यावर मधोमध (आडवा )कापून त्यावर चॉकलेट सॉस पसरवणे. त्यानंतरच्या त्यावर दुसरा लेअर ठेवून त्यावर चॉकलेट सॉस पसरवणे आणि सर्व बाजूंनी चॉकलेट सॉस लावून फ्रीजमध्ये ३ ते ४ तास सेट होण्यासाठी ठेवणे. सेट झाल्यावर गाळण्यात कोको पावडर व पिठीसाखर घेवून त्यावर भुरभुरवणे.
-मानसी जोशी