ब्युटी कॉन्टेस्ट
"विक्रांत ब्रेकफास्ट तयार आहे लवकर येsss"
रचनाचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई आणि विक्रांतची आई विनिता उर्फ विन्स विक्रांतच्या आधी डायनिंग टेबलजवळ आल्या आणि तोंड वाकडं करुन म्हणाल्या, " हे काय गोडाचा शिरा?
"हो ! एवढ्या चांगल्या गोड पदार्थाच नाव तोंड आंबट करुन कशाला घेताय सासूबाई" रचना.
"सासूबाई? तुला किती वेळा सांगितलय मला ममा म्हणायचं म्हणून, गावठी कुठली." विन्स अजूनच वैतागली.
तेवढ्यात विक्रांत आणि त्याचे बाबा विनायकराव डायनिंग टेबलजवळ आले. साजूक तुपातल्या शिऱ्याचा खमंग वास आल्यावर त्या दोघांच्या तोंडाला पाणी सुटले.
रचनाने डिश भरायला सुरवात केली तेवढ्यात विन्स कडाडली, "थांब विक्रांत! अजिबात खायचा नाही तो गोडाचा शिरा केवढं तूप आहे त्यात! शिवाय ते कमी म्हणून की काय बदाम, काजूगर अगदी मुक्तहस्ताने ओतले आहेत. अरे असलं खाणं खाशील तर लवकरच ढेरपोट्या होशील. आधीच बघ पोट किती सुटलय ते.
आईच बोलणं ऐकून विक्रांतने आपलं पोट चटकन आत घेतलं.
"पण मी काय म्हणतो, एवढा केलाच आहे तिने शिरा तर खाऊ दे की त्याला", विनायकराव विक्रांतची बाजू घेत जरा घाबरतच म्हणाले.
"तुम्ही तर बोलूच नका. तुमच्या आईने हे असलं खायला घालूनच तुम्हाला ढेरपोट्या बनवलं आणि ही बया आता माझ्या मुलाला ढेरपोट्या बनवायला निघालेय. अग माझ्याकडे बघ. काल विक्रांतने मला क्लबबाहेर सोडलं तेव्हा माझ्या मैत्रीणी म्हणाल्या, "विन्स तुझा मुलगा अगदी तुझा भाऊ वाटतो हा!"
"छे काहीतरीच काय? विक्रांत काय एवढा म्हातारा वाटत नाही हा", रचना हसत म्हणाली.
"अग मूर्ख मुली....... जाऊदे तुला काय कळणार? स्वतः दुधी भोपळ्यासारखी ओबडधोबड आहेस आणि माझा मुलगा राजबिंडा, हे सहन होत नसेल तुला. देव सौंदर्य वाटत होता तेव्हा कुठे होतीस कुणास ठावूक? असशील आपल्या मिडलक्लास फॅमिलीबरोबर कुठली तरी हेवी डिश चाखत." विन्स
"छे हो आई देव सौदर्य वाटत होता तेव्हा मी अक्कल घ्यायला गेलेले. त्यामुळे सौंदर्य नसलं तरी भरपूर अक्कल दिलेय देवाने मला. पण देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही मात्र ब्युटी पार्लरमध्ये गेला होतात बहुदा म्हणून कदाचित.... "रचना.
"कदाचित? कदाचित काय ? काय म्हणायच काय आहे तुला? क्लास वन ऑफिसर आहेस म्हणून जास्त शहाणपणा करु नकोस. मला अक्कल नाही असं म्हणायच आहे का तुला ? विन्स संतापून बोलत होती.
"अय्या मला काय म्हणायचं आहे ते चक्क कळलं तुम्हाला? तसं माझ्या संगतीत काही काळ घालवून तुम्हाला समोरच्याचं बोलणं थोडं तरी समजायला लागलं म्हणायचं." रचना
या दोघींची जुगलबंदी चालू असताना विक्रांत आणि विनायकराव गुपचूपपणे दबकत दबकत पोटभर शिरा खाऊन आपआपल्या खोलीत निघून गेले.
विनायकरावांच्या मते या दोघींची जुगलबंदी म्हणजे अर्ध्या तासाचं एक विनोदी नाटक. पण काही झालं तरी बोलण्यात काही विन्स रचनाला हरवू शकत नव्हती. विन्स अतिशय मॉडर्न बाई तर रचना साधी सरळ, एका मध्यमवर्गीय घरातली प्रचंड हुशार मुलगी.
खरंतर विक्रांतचं लग्न विन्सची क्लबमधली मैत्रीण मोनाली उर्फ मोनाच्या मुलीशी व्हावं, अशी विन्स आणि मोना दोघींचीही इच्छा होती. पण विक्रांतला त्या मॉडर्न कसबसं ग्रॅज्युएट झालेल्या मुलीपेक्षा हुशार, कर्तुत्ववान रचना आवडली आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातली रचना या श्रीमंत घराची सून झाली. विक्रांतच्या नकारामुळे मोना आणि विन्सची मैत्रीही संपुष्टात आली. विन्सच्या क्लबमधल्या सगळ्याच मैत्रीणी सुमार बुद्धीच्या आणि महिन्याला कित्येक हजार ब्युटी पार्लर, जीम, शॉपिंग यावर खर्च करणाऱ्या होत्या. अर्थात विन्सही याला अपवाद नव्हती. वेळ आणि पैसा कुठे घालवायचा? हा जगातला सगळ्यात मोठा यक्षप्रश्न असणाऱ्या आणि अल्पबुद्धी असणाऱ्या बायकांनी एकत्र येवून स्थापलेल्या क्लबचे कार्यक्रमही तसे मनोरंजकच असायचे.
तर असो;
भांडणानंतर विन्स आपल्या डाएटनुसार ब्रेकफास्ट घेऊन तरातरा क्लबमध्ये निघून गेली. रचनाही ब्रेकफास्ट करुन ऑफिसला निघून गेली.
क्लबमध्ये आज "ब्युटी कॉन्टेस्टची" अनाऊन्समेंट करण्यात आली. विन्स आणि मोना त्यात मुख्य स्पर्धक होत्या. कॉन्टेस्टचे राउंड सोपे आहेत असं वाटत असताना विन्सवर एक बॉम्ब पडला. शेवटचे दोन राउंड्स जनरल नॉलेजवर आधारीत असल्याचा बॉम्ब!
क्लबमध्ये त्यातल्या त्यात मोनाच जनरल नॉलेज ठिक होतं.(ठिक म्हणजे फार काही नाही हो. वासरात लंगडी गाय शहाणी होती इतकच). त्यामुळे मोना ही ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकणार असं क्लबमध्ये सगळ्यांनाच वाटत होतं. विक्रांतच्या लग्नानंतर मोना विन्सला कमी लेखायची एकही संधी सोडत नसे. सहाजिकच यामुळे विन्सचा जळफळाट होत होता. तिने स्वतःचं जनरल नॉलेज सुधारायचा चंग बांधला आणि घरी जाताना डझनावारी जनरल नॉलेजची पुस्तके घेऊन गेली.
विनायकराव रिटायर्ड बॅंक ऑफिसर होते. आयुष्यभर खूप दगदग झाल्यावर आता रिटायरमेंटनंतरचा काळ निवांत गाणी ऐकण्यात किंवा वाचनात घालवायचा असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. सहाजिकच ते बरेचदा घरातच असत.
विन्सच्या हातातील शॉपिंग बघून विनायकराव हसत म्हणाले, "हे काय आज चक्क पुस्तकं आणलीस तू? सुनेचे टोमणे चांगलेच मनावर घेतलेले दिसतायत.
"तुमची सून गेली खड्यात. आमच्या क्लबमध्ये 'ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट' आयोजित केलेलं आहे. मी पार्टीसिपेट केलय त्यात. त्याची तयारी म्हणून आणली आहेत ही बुक्स.” विन्स
"ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट" हे शब्द ऐकून विनायकरावांना 440 व्होल्टचा जबरदस्त धक्का बसला.
"अग काहीतरीच काय बोलतेस अशा अश्लील कॉन्टेस्ट मध्ये तू भागच कसा काय घेऊ शकतेस? विनायकराव स्वतःला सावरत म्हणाले.
"अश्लील काय त्यात? साध्या ब्युटी कॉन्टेस्ट सारखं ब्युटी कॉन्टेस्ट” विन्स अगदी सहज विचारत होती.
"अग पण ॲडल्ट ब्युटी कॉंटेस्ट म्हणजे.... विनायकराव.
"अहो ॲडल्ट म्हणजे आम्ही सगळ्या आता 45+ आहोत ना म्हणून ॲडल्ट. तुम्हाला 'ॲडॅल्ट' या शब्दाचा अर्थ माहिती नाही? कमाल आहे तुमची. अहो बॅंकेत ऑफिसर होतात ना तुम्ही." विन्स कपाळावर हात मारुन घेत म्हणाली.
विनायकरावांनी मान हलवली आणि लायब्ररीत जायला निघाले.
"येताना कादंबऱ्या वगैरे नको जनरल नॉलेजची बुक्स असतील तर आणा लायब्ररीतून", विन्सने धावत जाऊन विनायकरावांना सांगितले.
दोन दिवस डोकफोड केल्यावर विन्सच्या लक्षात आलं जनरल नॉलेज हा काही आपला विषय नाही. पण ती हार मानणाऱ्यातली नव्हती. मोनाला कमी लेखायची संधी तिला सोडायची नव्हती. आपली जनरल नॉलेज ची तयारी करुन घ्यावी म्हणून तिने विनायकरावांची पाठ धरली. विनायकरावांना आपल्या बायकोचं अगाध ज्ञान चांगलंच माहिती होतं. या त्रासापासून सुटका कशी करुन घ्यायची याचा ते विचार करु लागले. मुळातच हुशार असणाऱ्या विनायकरावांना एक अफलातून कल्पना सुचली. ज्यामुळे विन्सची जनरल नॉलेजची तयारीही होइल आणि घरातली भांडणही मिटतील.
विनायकरावांनी विन्सला सांगितल, "हे बघ मी रिटायर्ड माणूस आहे. माझा सगळा वेळ गाणी ऐकणं, कादंबऱ्या वाचणं यातच जातो. जनरल नॉलेज हा असा विषय आहे ज्यात तुम्हाला नेहमी 'अप टू डेट' रहावं लागतं. त्यामुळे यामध्ये माझ्यापेक्षा चांगली मदत तुला रचना करु शकेल. मला माहिती आहे तुला हा सल्ला आवडणार नाही. पण हे बघ काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. आणि मला मनापासून वाटतं तू विनर व्हावीस म्हणून मी तुला हे सांगतोय."
विनायकरावांनी खूपच हुशारीने आपलं म्हणणं विन्सच्या गळी उतरवलं होतं. अखेर हो नाही करत विन्स रचनाकडून मदत घ्यायला तयार झाली. शेवटी तिला मोनाला हरवणं हे रचनापेक्षा जास्त महत्वाच वाटत होतं.
विनायकरावांनी रचनालाही समजावलं. रचना तशी विचारी होती. तिलाही घरातल्या रोजच्या भांडणांचा कंटाळा आला होता. त्यामुळे तिनेही तयारी दर्शवली.
विन्सची शिकवणी सुरु करण्यापूर्वी रचनाने क्लबची, इतर स्पर्धकांची आणि मुख्य म्हणजे परिक्षकांची माहिती मिळवली. त्यानंतर तिच्या लक्षात आलं अगदीच बेसिक जनरल नॉलेजचे प्रश्न यांना विचारण्यात येतील. तिच्यासाठी विन्सची शिकवणी म्हणजे हातचा मळ होता.
विन्सची शिकवणी सुरु झाली. रचनाला जेवढं सोप वाटत होतं तेवढं हे काम सोपं नव्हतं. कारण विन्सच जनरल नॉलेज अगदीच भयंकर या कॅटॅगरीत मोडणारं होतं. "राज्य आणि राष्ट्र" यातला फरकही विन्सला कळत नव्हता. पण रचनाने सगळ्या अडचणींवर मात करत विन्सची उत्तम तयारी करुन घेतली. इतकंच काय तर 'इन्ट्रो राउंडला' स्वतःची ओळख इंग्लिश ऐवजी संस्कृतमध्ये करुन द्यायला सुचवलं. विन्सही आनंदाने तयार झाली. मग दोघी सासवा सुना नऊवारी साडी आणि मोत्याच्या दागिन्यांच शॉपिंग करुन तडक बाहेरून जेवूनच घरी आल्या. दोघींना एकत्र बघून विनायकराव आणि विक्रांत मात्र सुखावले होते.
"ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट"चा दिवस उगवला. क्लब मेंबर्सच्या फॅमिलीजनाही आमंत्रण होतं (दुसरं कोण बघणार होतं म्हणा हे कॉंटेस्ट). रचना, विक्रांत आणि विनायकरावही उपस्थित होते. विन्सचा परफॉर्मन्स बघून सगळ्यांच्याच तोंडात बोटं गेली. मोना तर चक्कर येवून पडायची बाकी होती. अपेक्षेनुसार विन्स 'ॲडल्ट ब्युटी क्वीन' झाली. ब्युटी क्वीन झाल्यावर सगळ्यांसमोर तिने रचनाला स्टेजवर बोलावून तिचं कौतुक केलं. आणि आपल्या यशाच श्रेय तिला दिलं. हे बघून मोनाचा अजूनच जळफळाट झाला आणि विन्सच्या विजयाला 'चार चॉंद' लागले.
आज विन्स आणि रचना एकमेकींवर मायलेकींपेक्षा जास्त प्रेम करतात. आणि हो सांगायचच राहिलं. रचनानेही विन्सच्या मदतीने स्वतःला बदललं बरं का. टिपिकल काकूबाईच्या रुपाची कात टाकून ती आता चवळीच्या शेंगेसारखी बारीक आणि थोडा ॲटीट्यूड असणारी मॉडर्न सून झालेय. अगदी विन्सला हवी तशीच !
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment