13 जुलै 2002 .. या दिवशी भारताच्या क्रिकेटच्या इतिहासातल एक सुवर्ण पान लिहिलं गेल. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारतीय क्रिकेट टिमने इंग्लंडला हरवून नॅटवेस्ट सिरिज जिंकली. अजूनही आठवतोय तो दिवस. लॉर्ड्सवर फायनल ती ही इंग्लंडविरोधात; इंग्लंडच्या टिममध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. लॉर्ड्स म्हणजे त्यांच होम पीच त्यात नाणेफेक जिंकून नसिर हुसेनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीपासूनच सावध खेळणाऱ्या इंग्लंडच्या टिमची पहिली विकेट गेली ती सातव्या ओव्हरनंतर. अवघे 14 रन्स काढून नाईट(Knight) बाद झाला. पण त्यानंतर मात्र कॅप्टन नसिर हुसेन आणि ट्रेस्कोथिक या दोघांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२५ धावांच तगडं आव्हान भारतासमोर ठेवल.
आमच्याकडे बाबांनी नेहमीप्रमाणे टिम इंडियाला नावं ठेवायला सुरुवात केली. "भारत हरणार आता मॅच बघण्यात वेळ फुकट घालवू नका.... वगैरे वाक्यांचा भडिमार सुरु झाला. ब्रेकनंतर आपली इनिंग सुरु झाली. सुरुवातीपासूनच थोड चाचपडत पण सावधपणे खेळणाऱ्या सेहवाग – गांगुलीच्या चेहऱ्यावर प्रचंड टेंशन दिसत होत. पंधराव्या ओव्हरमध्ये अवघ्या 60 धावा काढून गांगुली बाद झाला. त्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरला सेहवाग बाद झाला. खूप अपेक्षा ठेवून मॅच बघणाऱ्या आम्हाला बाबा मुद्दाम चिडवू लागले. "हरणार आहोत आपण चॅनेल बदला" इथपासून ते अगदी पार फिक्सिंगपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत होत्या. मी शांत होते. पण लगेचच 19 व्या ओव्हरला दिनेश मोंगियाची विकेट गेली आणि भारताला पुढचा धक्का बसला. बाबांनी पुन्हा टिमला नावं ठेवायला सुरुवात केली. विकेट गेलेल्या परवडल्या पण हि बडबड नको अशी आमची अवस्था झाली. अचानक मला काय झाल काय माहिती मी पटकन बोलून गेले, "काहीही झालं तरी आजची मॅच आपणच जिंकणार”
माझ्या या वाक्यावर बाबा हसायला लागले. मला अजूनच राग आला आणि मी म्हटल, "हो जिंकणार आपण लावताय पैज ?"
बाबा हसून म्हणाले, "चल लावली पैज भारत जिंकला तर दिले तुला शंभर रुपये. (आमच्याकडे बाबांबरोबरची पैज नेहमी एकतर्फीच असते.)
भारत जिंकला तर शंभर रुपयांचा फायदा होणार होताच शिवाय "इज्जत का सवाल था".
मोंगिया पाठोपाठ भारताचा 'द वॉल' द्रविड आणि सर्वेसर्वा सचिन तेंडूलकर बाद झाला. आता भारत मॅच हरणार यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा होता.
मॅच संथ गतीने चालू होती. घनदाट अंधारात आशेचा किरण बनून आले ते युवराज आणि कैफ. या दोघांनी मात्र संयमित खेळी करत विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हे दोघे पीचवर असताना मैदानात अक्षरशः सन्नाटा होता. घरातल वातावरणाही निवळल होत. मधूनच बाबा हॉलमध्ये येउन मुद्दाम, "हे काय? इतकाच स्कोअर? कठीण आहे... अस म्हणून माझी चेष्टा करत होते. पण मी शांत बसले होते.
बेचाळीसाव्या ओव्हरमध्ये युवराजची विकेट गेली आणि पुन्हा इंग्लंडच पारडं जड झाल. पण त्यानंतर मात्र कैफने बॉलर्सच्या जोडीने अवघड वाटणारा 326 धावांचा पल्ला मोठ्या आत्मविश्वासाने गाठला. शेवटच्या क्षणापर्यंत जीवात जीव नव्हता. स्कोअर बोर्डवर 326 चा आकडा झळकला आणि पॅव्हेलियनमध्ये एकच जल्लोष झाला. भारताचा कर्णधार सौरभ गांगुलीने आपला शर्ट काढून हवेत फिरवला. बास ! दिल फिदा हो गया उसका ये ॲटीट्यूड देखकर.
या सिरिजपूर्वी ॲंड्र्यू फ्लिंटॉपने वानखेडे स्टेडियमवर मॅच जिंकल्यावर अशाच प्रकारे शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी त्यांच्याच देशात मिळाली आणि गांगुलीने या संधीच सोनं केल. इसे कहते हैं हिम्मत.... त्यावेळचा त्याचा ॲटीट्यूड, त्याचा कॉन्फिडन्स, त्याची एक्स्प्रेशन्स .... दिल जीत लीया बंदेने....
आजही आठवतोय तो क्षण. शेवटच्या क्षणापर्यंत मी श्वास रोखून बसले होते. India won by 2 Wickets …. हे वाक्य ऐकल आणि सुटकेचा निश्वास टाकला. या मॅचबरोबर आपण नॅटवेस्ट सिरिजही जिंकली (आणि मी शंभर रुपये). मोहम्मद कैफ मॅन ऑफ द मॅच ठरला. खरतर हा सांघिक विजय होता. पण तरीही या विजयाचा खरा हिरो ठरला तो सौरव गांगुली. #रिव्हेंज हा पॉझिटिव्ह असू शकतो हे तेव्हा पहिल्यांदा जाणवल.
©मानसी जोशी