दुनियादारी
लेखक: सुहास शिरवळकर
आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबद्दल लिहयचं ठरवलं तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर दोन नावं आली. एक म्हणजे मृत्युंजय आणि दुसरं म्हणजे दुनियादारी. मृत्यूंजय वाचनाताही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं, तिथे त्या पुस्तकावर लिहिणं म्हणजे माझ्यासाठी कर्मकठीण. दुनियादारी मात्र सहज, सोपी, मनात घर करुन राहिलेली कादंबरी आहे. फर्स्ट इअरला असताना वाचलेली ही कादंबरी मनाला एवढी भावली होती की काही दिवसांनी पुन्हा लायब्ररीतून ती कादंबरी आणून वाचली होती. प्रत्येकाला आपल्या ‘गोल्डन डेज’ म्हणजेच कॉलेज जीवनात घेऊन जाणारी ही कादंबरी जेवढं हसवते तेवढंच मनाला हळवं करुन स्पर्श करते. स्वप्नापासून सत्यापर्यंत नेणारी ही कादंबरी कुठेही आपला ट्रॅक सोडत नाही आणि आपण स्वप्नातून वास्तवात कधी येतो ते आपलं आपल्यालाही समजत नाही. या कादंबरीबद्दल लिहिणं म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. तरीही मी प्रयत्न करते.
दुनियादारी! ही कहाणी आहे श्रेयसची. श्रेयस तळवलकर या प्रमुख पात्राभोवती फिरणाऱ्या या कादंबरीत पुढे अनेक व्यक्तिरेखा येतात. ही कादंबरी वाचणारा जवळपास प्रत्येकाजण यातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखेशी स्वतःला रिलेट करत रहातो.
पुण्याच्या SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेला मुंबईचा साधा, सरळ, निरागस, हुशार मुलगा श्रेयस सुरुवातीला सिनिअर्सकडून होणारं रॅगिंग सहन करतो. पण पुढे जाऊन श्रेयस या रॅंगिंग ग्रूपचाच एक भाग होतो. या ग्रूपचा लिडर दिग्या उर्फ डीएसपी आणि श्रेयस एकमेकांचे खास मित्र बनतात. मित्रासाठी जीव टाकणारा दिग्या कादंबरी वाचून झाल्यावरही डोक्यातून जात नाही. या कादंबरीमध्ये अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा आहे ती म्हणजे साईनाथ. दिग्या आणि साईनाथ हे एकेकाळचे खास मित्र अचानक एकमेकांचे जानी दुश्मन बनतात. या दोघांची दुश्मनी संपूर्ण कॉलेजला माहिती असते पण त्याच कारण मात्र कोणालाच माहितीनसतं.
दिग्या आणि गॅंगबरोबर झालेली श्रेयसची दोस्ती त्याच्या आयुष्याला, व्यक्तिमत्वाला एक वेगळं वळण देते. श्रीमंत घरातला श्रेयस, आई-वडिलांच्या बिघडलेल्या संबंधामुळे घरापासून दूर रहायचं ठरवून मुंबईहून पुण्याला येतो. निरागस एकाकी श्रेयसला दिग्याच्या रुपाने एक जवळचा मित्र मिळतो. दिग्या आणि साईनाथ या दोघांना धरुन ठेवणारा पण प्रत्यक्षात कोणाचाच नसणारा अश्क्या, दिग्याची प्रेयसी सुरेखा, साईनाथची बहीण अशी अनेक पात्रे या कादंबरीत येतात.
श्रेयसच्या आयुष्यात प्रेमाची हळूवार जाणीव घेऊन आलेल्या मीनू आणि शिरीन वाचताना मात्र हरवून जायला होतं. वयाने मोठी असणारी आकर्षक शिरीन आणि अल्लड मीनू यापैकी आपल प्रेम नक्की कोणावर आहे याचं उत्तर शोधणाऱ्या श्रेयसच्या विवाहाच वळण हे धक्कादायक नसल तरी काहीसं अनपेक्षित आहे.
श्रेयसच्या आयुष्यात आलेली अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे MK; प्रचंड हुशार माणूस पण एक असफल प्रेमी. प्रेयसीच्या आठवणीत सतत दारुमध्ये बुडालेल्या MK ची व्यक्तीरेखा कथेमध्ये अधूनमधून डोकावत रहाते. MK चा मृत्यू झाल्यावरही ही व्यक्तिरेखा काही डोक्यातून जात नाही. याच कारण म्हणजे काहीस अपेक्षित असणारं पण मनाला स्पर्शून जाणारं आणि कथेच्या शेवटी समजणारं MK बद्दलच एक सत्य!
असं म्हणतात की कथेचा/कादंबरीचा शेवट नेहमी मनाला स्पर्श करणारा हवा तर कथा/कादंबरी संस्मरणीय होते. पण दुनियादारीबद्दल बोलायचं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कादंबरी संस्मरणीय आहे. ही कादंबरी वाचताना यातील प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करते. प्रत्येक व्यक्तिरेखा जीवंत व्यक्तिरेखा वाटावी इतक्या सुंदर पद्धतीने ती उभी केलेली आहे. यातल्या प्रत्येक व्यक्तीरेेखेबद्दल लिहायल गेल तर ही पोस्ट "क्रमशः" लिहावी लागेल.
दुनियादारी चित्रपट हा फक्त या कादंबरीवर बेतलेला आहे. मूळ कथानकामध्ये आणि काही व्यक्तिरेखांमध्ये केलेल्या बदलांमुळे प्रत्यक्षात हा चित्रपट कादंबरीच्या आसपासही फिरकू शकला नाही. दुनियादारी वाचयचं असेल तर चित्रपट डोक्यातून बाजूला ठेवूनच वाचायला हवं. सुदैवाने मी हे पुस्तक चित्रपट यायच्या खूप आधी वाचलेलं असल्यामुळे मला अस्सल दर्जेदार पुस्तकाचा आस्वाद घेता आला.
काही कलाकृती या इतक्या दर्जेदार असतात की त्या ‘न भूतो न भविष्यती’ या प्रकारातल्या असतात. दुनियादारी ही त्यातलीच एक कलाकृती आहे.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment