सत्यनारायण
टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच तिला पटत नव्हत. तिला आठवली शाळेतली सत्यनारायणाची पूजा!
तस तिची शाळा काही फार नावाजलेली नव्हती. एका छोट्याशा पण सगळ्या सुविधा असणाऱ्या शहरातली तिची एक साधीशी शाळा. शाळेत दरवर्षी श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा असायची. अजूनही असते. पण आता .....?
तिला आठवल... शाळेत असताना सत्यनारायणाच्या पूजेला मनापासून रांगोळी काढणारा इम्रान चक्क दहावीत असताना सत्यनारायणाला नवस बोलला होता, "देवा यावर्षी फक्त मॅथ्स सांभाळ, पुढच्या वर्षी शाळेत नसलो तरी पूजेच्या दिवशी येवून मोठी रांगोळी काढेन”. हे कळल्यावर शिक्षकांसकट सगळे खूप हसले होते.
इम्रान तिच्याच कॉलनीमध्ये रहायचा. अगदी तिच्या घरासमोर. इम्रानची धाकटी बहीण शमा तर तिची खास मैत्रीण. कॉलनीतल्या गणपतीची आरास कधी शमाच्या मदतीशिवाय आणि इम्रानच्या रांगोळीशिवाय पूर्ण झाली नाही. उकडीचे मोदक म्हणजे शमा आणि इम्रानचा जीव की प्राण. तिच्या घरी मोदक करताना शमाच्या कुटुंबासकट संगळ्यांसाठी मोदक केले जायचे. ईदिचा शिरकुर्मा तर कॉलनीतल्या सर्वच घरात अगदी डबाभरुन दिला जायचा. एकावर्षी गणपतीत गौरीच्या दिवशी नऊवारी साडी नेसलेली, नथ घातलेली शमा बघून तर आपटे काकूंच्या बहिणीने आपल्या मुलासाठी पसंत केल होत तिला. शमा मुसलमान आहे हे कळल्यावर मात्र त्यांचा हिरमोड झाला होता.
शाळेतली पूजा आठवली आणि तिला पूजेची सगळी जबाबदारी जणू स्वतःचीच आहे अस समजून, दिवसभर शाळा करुन डेकोरेशनसाठी रात्रभर जागणारे कांबळे सर आठवले. कांबळे सर चित्रकला शिकवायचे. सरस्वती पूजनाच्या दिवशी दरवर्षी सरस्वतीच सुंदर चित्र काढणाऱ्या कांबळे सरांना सेंड ऑफ च्या दिवशी जेव्हा शाळेतल्या एका मुलाने स्वतः काढलेल सरस्वतीच चित्र फ्रेम करुन गिफ्ट दिल, तेव्हा सर डोळ्यात पाणी आणून म्हणाले होते, "माझ्या आयुष्यात आजवर मिळालेल्या गिफ्ट्सपैकी सर्वात जास्त आवडलेल गिफ्ट आहे हे.”
पूजेच्या दिवशी भटजी म्हणून दरवर्षी रोहन भटचे बाबा यायचे. प्रसादाची सर्व जबाबदारीही त्याच्याच घरी असायची. जास्मिनला तर कामाचा प्रचंड आळस पण प्रसाद वाटपासाठी मात्र आवर्जून मदत करायची. याच कारण म्हणजे तिला प्रसादाचा शीरा मनापासून आवडायचा. हे कळल्यावर रोहनची आई डबाभर शीरा फक्त जास्मिनसाठी पाठवायची.
सगळ्या गोष्टी अगदी काल परवा घडल्यासारख्या आठवत होत्या. तेव्हा कोणाचा धर्म भ्रष्ट होत नव्हत्या की सामाजिक असमतोल होत नव्हता. कोणाच्या भावना दुखवत नव्हत्या की सणांच्या ब्रेकिंग न्यूज होत नव्हत्या. विचारात गढलेली असताना अचानक तिचा फोन वाजला. फोन ईम्रानचा होता.
"आज एवढ्या रात्री फोन केलास?" ती.
"ओ मॅडम रात्र तुमच्या अमेरिकेत. इथे आमच्या भारतात सकाळ आहे म्हटल." इम्रान.
आमच्या भारतात!!!! इम्रानच्या तोंडून हे शब्द ऐकून तिला भरुन आल.
"बरं ते जाऊदे. बिझी असलीस तरी महत्वाच बोलायला फोन केलाय त्यामुळे तुला बोलावच लागेल." इम्रान.
"नाही बिझी नाही बोल" ती.
आपल्या शाळेच यंदा ७५ व वर्ष आहे त्यामुळे पूजेच्या दिवशीच शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच गेट टूगेदर करायच ठरवल आहे. मला माहिती आहे एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुला यायला जमणार नाही. हा फोन तुला आमंत्रण द्यायला नाही तर देणगी दे म्हणून सांगायला केला आहे. शाळेची इमारत जूनी झालेय तिची डागडूजी, काही नवीन वर्ग बांधायचे आहेत, कम्प्युटर लॅबसाठी नवीन कम्प्युटर घ्यायचे आहेत. अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी सर्व माजी विद्यार्थी ऐच्छिक मदत करत आहेत. अस नाही की देणगी पैशाच्या स्वरुपातच हवी तू तुला जे योग्य वाटतय ते तू देवू शकतेस. जे काही ठरवशील त्यासाठी मी किंवा रोहन भट कोणालाही कॉन्टॅक्ट कर" ईम्रान.
ती काही वेळ तशीच शांत राहिली. पलीकडून इम्रानच 'हॅलो' ऐकून ती क्षणभर दचकली पण स्वतःला सावरत म्हणाली, "देणगी देइनच रे पण सत्यनारायणाची पूजा..... म्हणजे मी आत्ताच न्यूज बघितल्या त्यात तर .... "ती
"हे बघ जे काही कायदे असतील ते असतील. मला एवढच कळत कायदे माणसासाठी असतात माणूस कायद्यांसाठी नाही. आणि ही आपली शाळा आहे, राजकारणाचा फड नाही. ज्या शाळेने मला घडवल ती शाळा माझ्यासाठी अल्लापेक्षा कमी नाही. तुला आठवतय मुंबईत दंगल झाली होती तेव्हा परांजपे सरांनी काय सांगितल होत ? 'कुठलाही धर्म वाईट नसतो , कुठलाही माणूसही वाईट नसतो. वाईट असते ती माणसाची चुकीची विचारसरणी आणि ही विचारसरणी घडवणारी परिस्थिती. या परिस्थितीवर मात करा. कुठल्याही कठीण प्रसंगात आपली विवेकबुद्धी जागी ठेवा. समोरच्याचा आदर करा आणि माणूस म्हणून जगा. ' बस मी हेच लक्षात ठेवलय. शाळेत गेली ७४ वर्ष पूजा होतेय तशी यंदाही होणार. आणि यंदा तर साधी नाही महापूजा होणार." इम्रान.
"इम्रान तू ना फिलॉसॉफीचा प्रॉफेसर शोभतोस. आणि हो महत्वाच तू आमंत्रण दिल नाहीस तरी यंदाच्या महापूजेला मी येणार आहे." ती हसून म्हणाली.
मनातल सगळ मळभ दूर झाल होतं. सातासमुद्रापार असूनही मनाने मात्र ती शाळेच्या आवारात पोचली होती.
©मानसी जोशी