हॉन्टेड स्टोरी
(ही घटना सत्यघटनेवर आधारीत आहे)
दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही. रात्रीची वेळ होती. बाहेर भरपूर पाऊस पडत होता. गणपतीच्या सणामुळे सोसायटीमधली बरीचशी माणसं गावाला गेलेली असल्याने सोसायटीमध्ये तसा सन्नाटा होता. आमच्या मजल्यावरचे सगळेजण गावी गेल्यामुळे पूर्ण मजल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हतं.
रात्रीचे ११ वाजून गेले होते. बाहेरचा ढोल ताशांचा आवाज बंद झाला होता. त्यातच लाईट सारखे येत-जात होते. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. कुत्रे बेसूर आवाजात रडत होते. आमच्या घरात सगळे शांत झोपले होते. का कुणास ठावूक पण मला झोपच लागत नव्हती. खर तर दिवसभर भरपूर दगदग झाली होती. तरीही निद्रादेवी प्रसन्न व्हायला तयार नव्हती.
अशातच दारावरची बेल वाजली. मी दचकले. इतक्या रात्री कोण आलं असेल? मला काही सुचेना मी 'अहोना हाक मारुन उठवलं. तो अर्धवट झोपेत म्हणाला, "नाही वाजली ग बेल, तू झोप.
"नाही काय? बेल वाजली, मी ऐकली", मी.
तरीही समोरून काहीच रिस्पॉन्स नाही म्हटल्यावर मी उठून हॉलमध्ये गेले आणि लाईट लावला. दरवाजाजवळ जाऊन की होलमधून बघितलं तर बाहेरचं नीट दिसत नव्हतं. पण बाहेर कोणीतरी उभं आहे हे मात्र कळत होतं.
तेवढ्यात अहो बाहेर आले आणि म्हणाले, "अगं दार उघड".
"नको बाहेर कोण आहे ते समजत नाहीये. परत अख्ख्या मजल्यावर फक्त आपणच आहोत", मी.
"असूदे दार उघडून बघूया, बाहेर सेफ्टी डोअर आहे ना?" असं म्हणत अहोंनी दार उघडलं.
दार उघडून बघितल तर बाहेर वॉचमन उभा होता. सेफ्टी डोअरच्या गॅपमधून एक पेढ्यांची पुडी आत सरकवत म्हणाला, "वो xxxxx साहबने नयी गाडी लेली, उन्होने ये सबको देनेको बोला था|"
यावर मी वैतागून त्याला म्हणाले, ये कोई वक्त हैं पेढे देने का ? रात के ११ बजे ?"
यावर वॉचमन काही पाल्हाळ लावणार इतक्यात अहो त्याला म्हणाले, "हा ठिक हैं आप जावो."
तो निघून गेला आणि हॉन्टेड स्टोरी कॉमेडी स्टोरीमध्ये बदलली.
©मानसी जोशी