स्वरप्रीती - एक विलक्षण प्रेमकहाणी
“Ajay we are going to visit Ganesh Temple please join us”. अनिल अजयला हाक मारून म्हणाला.
अजय हसून म्हणाला, “No No तुम्ही जा मला थोडा वेळ इथेच थांबायचं आहे and please speak in Marathi . I can understand Marathi ......
"ok boss! sorry next time sure ...." त्याच बोलणं मध्येच तोडत अनिल म्हणाला. यावर दोघेही खळखळून हसले..
"बर ऐक समुद्रामध्ये जास्त आतमध्ये जाऊ नकोस आणि हो त्या पडक्या वाड्याजवळ बिलकुल जाऊ नकोस ती जागा ठीक नाहीये." अनिल जाता जाता अजयला समजावत म्हणाला.
अजयने उत्तरादेखल फक्त मान हलवली आणि दूरवर अथांग पसरलेल्या समुद्राकडे शांतपणे एकटक बघू लागला.
अजय हा US मधून आलेला अनिलचा मित्र. उच्चशिक्षणासाठी US ला गेलेल्या कोकणातल्या अनिलची ओळख अजयशी होते. अजय हा भारतीय वंशाचा अमेरिकन मुलगा. त्याची आई मराठी आणि शास्त्रीय संगीत शिकलेली पण NRI असणाऱ्या आणि पैसा हेच सर्वस्व असणाऱ्या माणसाशी नाईलाजाने लग्न केल्यामुळे तिची कला तिच्यापुरातीच मर्यादित राहिलेली. घरातल वातावरण कधीच खेळीमेळीच नाही. अजयला मात्र त्याच्या आईने लहानपणापासूनच मराठी आणि थोडफार शास्त्रीय संगीत शिकवलं होत. सहाजिकच मराठी भाषा आणि एकूणच मराठी संस्कृती याबद्दल त्याल प्रेम आणि आकर्षण दोन्ही होते. अनिल हा महाराष्ट्रातील आहे हे कळल्यावर अजयने त्याच्याशी मैत्रीचा हात स्वतःहून पुढे केला. नवख्या देशात अनिललाही त्याचा आधार वाटला. बघता बघता मास्टर्स पूर्ण झाल. समजायला लागल्यापासून भारतात कधीही न गेलेल्या अजयला भारत विशेषकरून महाराष्ट्र बघायची खूप इच्छा होती. त्यामुळे परीक्षेनंतर इतर कुठेही न जाता तो आणि त्याचे मित्र अनिलबरोबर त्याच्या गावी आले होते.
कोकणात आल्यापासून अजयला हे सार आपल्या ओळखीच आहे अस वाटत होत. विशेषकरून हा समुद्र. या समुद्रावर आल्यापासून त्याला सतत वाटत होत हा अथांग सागर जणू वर्षानुवर्ष त्याची वाट बघतोय. त्या अथांग सागराकडे तो भान हरपून पहात होता. त्याच्या मनात विचार आला. काय नातं असेल या सागराच माझ्याशी? हा काय त्याच्या आयुष्यातला त्याने पाहिलेला पहिला समुद्र नव्हता पण तरीही जी ओढ त्याला या समुद्राबद्दल वाटत होती ती या आधी कधीच वाटली नव्हती. एक अनामिक हुरहूर लागली होती त्याच्या मनाला.
"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"
अजयच्या कानावर आलेल्या गाण्याच्या मंजुळ सुरांनी अजय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. गाणं मात्र ऐकू येत होत.
आइयेsssss मेहेराबां ......
गाण्याच्या सुरांनी व्याकुळ होवून तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. चालता चालता तो पडक्या वाड्याजवळ गेला. तिथे एक सुंदर तरुणी दिसली. अजय त्याच्याही नकळत तिच्याकडे खेचला जात होता. तिच गायन चालूच होत. तो मुग्धपणे ते ऐकत होता.. गाता गाता तिच अजयकडे लक्ष गेल आणि ती एकदम शांत झाली. “का थांबलात गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं”, अजय नकळतपणे बोलून गेला. ती तरुणी काहीही न बोलता जायला निघाली. तिला थांबवत अजय म्हणाला, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.अजयही तिच्यामागून चालत तिला म्हणाला, प्लीज थांब ना तुझ्याशी बोलायचं आहे. “आज नको उद्या संध्याकाळी भेटू आपण, मला आता निघायला हव खूप उशीर झालाय. तुम्हीही घरी जा”’ एवढ बोलून ती धावतच पडक्या वाड्याच्या दिशेने निघून गेली. "अजय..........अजय ........... "अनिलची हाक ऐकू आली आणि अजय भानावर आला.
“आलो”, असा प्रतिसाद देवून तो पळतच गेला.
अनिल म्हणाला, "अजय त्या बाजूला कशाला गेलास? मी सांगितलं होत ना जाऊ नकोस तिकडे? I know you don’t believe in such things but still....... अरे तू कोकणात आला आहेस इथे तुला खूप haunted places बद्दल ऐकायला येईल. Please you are my guest; my responsibility. ...... "
अनिल वैतागून बोलत होता. अजयच मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हत त्याला सतत मुग्धाच आठवत होती. तिचे भावूक डोळे, मुग्ध पण आर्त करणारे सूर, पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला होता. “अजय काय सांगतोय मी?” अनिलने वैतागून विचारले.
"सॉरी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन." अजय कसबस म्हणाला. एक क्षण त्याला वाटलं कि अनिलला सांगाव त्या मुलीबद्दल पण नकोच उगाच तो काहीतरी भलतच सांगेल, असा विचार करून तो गप्प राहिला.
घरी गेल्यावर अजय एकदम गप्प गप्प होता. कोणाशी बोलायची त्याची इच्छाच नव्हती. त्याला फक्त मुग्धा आठवत होती. बाकी सगळेही फिरून दमले असल्यामुळे तसे गप्पच होते. त्यामुळे तसा कोणालाच संशय आला नाही. पटापट जेवण उरकून सगळे झोपायला गेले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या सगळ्यांना गाढ झोप लागली. अजय मात्र जागा होता. मुग्धाच्या आठवणीत तळमळत होता. दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावातली काही मोजकी ठिकाण पाहून संध्याकाळी सगळे घरी आले. सगळे खुप दमले होते. अजय मात्र खूप उत्साही होता कारण त्याला मुग्धा भेटणार होती. फ्रेश होवून तो समुद्रावर जायला तयार झाला. पण त्याच्याबरोबर जायची कोणाचीच इच्छा नव्हती. अजय एकटाच जायला निघाला ते पाहून अनिलच्या बाबांनी त्यांच्याकडच्या गड्याला विसूला त्याच्याबरोबर पाठवलं. अजय मनातून वैतागला पण त्याचा नाईलाज होता. समुद्रावर पोचल्यावर अजयने विसूला घरी जायला सांगितले. त्यालाही घरी जायची घाई असल्याने तो निघून गेला. तो गेल्याची खात्री झाल्यावर अजय पळतच त्या पडक्या वाड्याच्या दिशेने निघाला. त्याला आसपास मुग्धा कुठेच दिसत नव्हती . त्याने तिला हाक मारली पण तिचा काहीच पतिसाद आला नाही. इतक्यात त्याला आठवलं काल ती पडक्या वाड्याच्या दिशेने धावत आतमध्ये गेली होती. तो हि धावत तिकडे गेला. वाड्याच्या गंजलेल्या गेटमधून आत गेल्यावर तो क्षणभर थांबला. त्याला अनिलचे शब्द आठवले. नाही काही झाल तरी अनिलाशी बोलल्याशिवाय इथे जाण योग्य नाही, त्याच्या मनाने त्याला कौल दिला आणि तो परत जाण्यासाठी निघाला. गेटमधून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा गाण्याचे तेच सूर ऐकू आले.

........एका अनामिक ओढीने तो वाड्याकडे खेचला गेला.
अंधार पडून गेला तरी अजयचा पत्ता नाही म्हटल्यावर अनिल थोडा घाबरला. पण गडी बरोबर असल्यामुळे तशी भीती नाही असा विचार करून तो गप्प राहिला. त्याने अजयचा मोबाईल ट्राय केला पण तो स्विच्ड ऑफ लागत होता. अखेर साडेआठ वाजून गेल्यावर अनिल आणि त्याचे मित्र अजयला शोधायला समुद्रावर जायला निघाले. अनिलच्या बाबांनी त्यांच्या घराजवळच्या गड्याला सखारामला त्यांच्या सोबतीला पाठवलं. अनिल मनातून खूप घाबरला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी अजय बरोबर पाठवलेला गडी विसू भेटला. तो पहिल्या धारेची मारून चांगलाच तर्र झाला होता. त्याला अजयबद्दल विचारल्यावर कसबस हेलकावे खात त्याने खर काय ते सांगितलं. अनिल विसुवर चांगलाच वैतागला. पण त्याच्यावर चिडण्यात काहीच अर्थ नव्हता. अजय आज एकटाच समुद्रावर गेला या विचाराने अनिलच्या काळजात धस्स झाल. सगळे पळतच समुद्राकडे निघाले. समुद्रावर आल्यावर सगळ्यांनी अजयला खूप हाका मारल्या पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. अखेर सगळे धावत पडक्या वाड्याच्या दिशेने निघाले. अजय कुठेच दिसेना . ना हाकेला ओ देईना अनिलने हिम्मत करून वाड्यामध्ये जायचे ठरवले. सखारामने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण अनिल काहीच ऐकायला तयार नव्हता. अनिल आणि अजयचे मित्रही त्याच्याबरोबर वाड्यात गेले.
वाड्याच गेट उघडून आत गेल्यावर दोन चार वटवाघुळे पंख फडफडवीत त्यांच्या डोक्यावरून गेली. मनातून सगळेच घाबरले होते. कधी रामरक्षा म्हणत तर कधी अजयला हाक मारत त्यांनी वाड्यात प्रवेश केला. पडका जरी असला तरी वाडा अतिशय सुंदर असावा. पौर्णिमेच्या चंद्राच शुभ्र प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्यामुळे मनातली भीती थोडी कमी झाली होती. तेवढ्यात एक उंदीर अनिलच्या पायाजवळून गेला आणि भीतीने अनिल जोरात ओरडला. तो उंदीर होता हे कळल्यावर सगळ्यांनाच हसू आले. सगळे अजयला हाका मारत अख्खा वाडा फिरून आले तरी अजय कुठेच दिसत नव्हता. अखेर निराश होवून सगळे वाड्याबाहेर जायला निघाले. तेवढ्यात अनिल कशालातरी अडखळला. बॅटरीच्या उजेडात त्याला अजयचा मोबाईल दिसला. तो पाहून सगळ्यांची खात्री झाली कि अजय इथेच आला होता. मोबाईल डिसचार्ज होवून स्विच्ड ऑफ झाला होता. आता जास्त वेळ वाड्यात थांबण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून सगळे वाड्याच्या बाहेर आले. वाड्याबाहेर सगळा गाव जमा झाला होता. अनिलला आणि त्याच्या मित्रांना पाहून अनिलच्या बाबांचा जीव भांड्यात पडला. अनिल आणि त्याचे मित्र त्याच्या बाबांसोबत पोलीस स्टेशनला गेले. तिथे रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी जुजबी चौकशी करून अजयचा मोबाईल ताब्यात घेतला. आणि सगळे आपआपल्या घरी निघून गेले. अनिलला खूप अपराधी वाटत होत. आपण अजय बरोबर गेलो असतो तर बर झाला असत अस प्रत्येकालाच वाटत होत. दिवसभराचा थकवा आणि अजयच्या गायब होण्याच टेन्शन यामुळे बसल्या जागीच सगळ्यांचा डोळा लागला. पहाटे चारच्या सुमारास अनिलच्या मोबाईलच्या मेसेज टोनच्या आवाजाने सगळे दचकून उठले. अनिलने झटकन 'व्हॉट्स ॲप' ओपन केले. त्यावर अजयने पाठवलेली एक 'ऑडिओ' पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद तरळला. अनिलने क्लिप डाऊनलोड केली. सगळे शांतपणे क्लिप ऐकू लागले. अजय बोलत होता.
“अनिल मला माफ कर मी तुझ्यापासून मुग्धाच सत्य लपवल. पण मी सत्य लपवल्यामुळे मला माझ्याबद्दलच एक मोठ सत्य कळल; माझ्या गतजन्मातल सत्य. या पडक्या वाड्यात आल्यावर मला माझा गतजन्म अगदी जशान तसा आठवला. कोणी विश्वास ठेवा अगर ठेऊ नका पण मी जे सांगतोय तेच सत्य आहे.
"मी निशिकांत – या वाड्याच्या मालकांचा म्हणजेच गायक पंडितशास्त्री जोशींचा मुलगा. आपल्या पत्नीशी म्हणजेच सिनेतारका कामिनिशी असलेले वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यावर आपल उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त संगीत साधना करण्यात घालवायाच अस ठरवून पंडितशास्त्री आपल्या कोकणातल्या मूळ गावी परत आले. समुद्राजवळची जागा विकत घेवून त्यांनी हा वाडा बांधला. त्यांच्याकडे संगीत शिकण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळाले. त्यांचे नियमच तसे जाचक होते. अस्सल जवाहिऱ्यासारखे ते आपला शिष्य पारखून घेत असत. मी माझ्या आईजवळच असायचो. पॉप म्युझिकच शिक्षण घेतलेला मी तसा शास्त्रीय शिक्षणासाठी कधीच उत्सुक नव्हतो. माझ्या आई आणि वडिलांमध्ये कितीही मतभेद असले तरी मला मात्र कुणाजवळही रहायची मुभा होती. त्यांच्या वादात मी कधीच भरडलो गेलो नाही. मला कोकणातल्या या गावाच आकर्षण नव्हत पण बाबांच्या ओढीने मी अधूनमधून येत असे. माझ आणि बाबांचं खूप जमायचं. त्यावर्षी मात्र मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर कोकणातल्या या वाड्यात भरपूर दिवस रहाण्यासाठी आलो होतो. बोलता बोलता एक दिवस मी बाबांना पॉप म्युझिक ऐकवलं यावर हसून ते म्हणाले, “तू फक्त गाण म्हटलस, श्रोते तुझ गाण ऐकतील, त्यावर थिरकतील पण तुझ्या सुरांनी मंत्रमुग्ध होणार नाहीत.” यावर मी चिडून म्हणालो होतो, सगळेच श्रोते काही शास्त्रीय सुरांनी मंत्रमुग्ध होत नाहीत. मी जर मुग्ध झालो तर मी मान्य करेन.” यावर ते हसून म्हणाले, “बाळा मी तुझ्या सुरांबद्दल बोलतोय तुझ्या गाण्याच्या प्रकाराबद्दल नाही. गाणं मग ते कुठलही असो त्याला शास्त्रीय सुरांचा रियाज असेल तरच त्याचे सूर मंत्रमुग्ध करतात. मला मनातून राग आला होता पण मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी संध्याकाळी बाबा पाय मोकळे करण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडले. मी घरात एकटाच होतो. खिडकीत उभा राहून एकटक या समुद्राकडे पहात होतो तेवढ्यात माझ्या कानावर गाण्याचे काही सूर पडले.

मी मत्रमुग्ध होवून ते गाणं ऐकू लागलो आणि माझ्याही नकळत त्या आवाजाच्या दिशेने खेचला गेलो. चालत चालत मी अंगणात आलो ती गातच होती.....
"आईयेsssss मेहेरबा ....." आणि अचानक तीच माझ्याकडे लक्ष गेल ती क्षणात गायची थांबली.
मी म्हणालो, “का थांबलात? गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं” यावर काहीही न बोलता जायला निघाली.
तिला थांबवत मी विचारल, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.
ती पाहताच बाला........अशी माझी अवस्था झाली होती. तिच्या सौंदर्याने आणि सुरांनी मला घायाळ केला होत. बाबा घरी आल्यावर मी त्यांना मुग्धाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले ती आपल्याकडे कामाला येणाऱ्या सदू काकांची नात. तिचे आई वडील लहानपणीच वारले. त्यामुळे ती लहान असल्यापासूनच कामाला येताना ते मुग्धाला बरोबर घेऊन येत आता ती मोठी झालेय तर बागेच सगळ काम तीच बघते. यावर बाबांना मी हसून म्हणालो, “बाबा मी हरलो! नकळतपणे तुमच्या स्वरांचे संस्कार झालेल्या मुग्धाच्या गाण्याने आज मी खरोखरच मुग्ध झालो आणि बाबांना सगळी हकीगत सांगितली. त्यांनाही खूप आश्चर्य वाटल. दुसऱ्या दिवशी मुग्धाच गाण ऐकून अस्सल हिऱ्याची पारख करण्यात आयुष्य गेलेल्या त्यांच्यासारख्या गायकाला घरात रोज येणाऱ्या कोहिनूर हिऱ्याची पारख करता आली नाही याच प्रचंड दुख झाल. सदुकाकांच्या परवानगीने मुग्धाची शिकवणी सुरु झाली. तिच्याबरोबर माझीही. तीच मन हेलावून टाकणार गाण लाघवी स्वभाव आणि मंत्रमुग्ध करणारा चेहरा यामुळे मी कधी तिच्या प्रेमात पडलो तेच मला कळल नाही. संगीताच्या सुराबरोबर सुरु झालेली आमची प्रेमकहाणी हळूहळू बहरू लागली होती. असेच दोन महिने सरले आणि एक दिवस माझ्या आईचा म्हणजेच सिनेस्टार कामिनीचा निरोप घेवून मुंबईवरून एक माणूस आला होता. मला एक चांगला ब्रेक मिळणार होता. मी मुंबईला जायचे ठरवले माझ्या आग्रहावरून बाबाही माझ्याबरोबर मुंबईला यायला तयार झाले. त्यादिवशी संध्याकाळी मुग्धा खुप उदास झाली होती मी जाणार होतो.........खूप दिवसांसाठी. तिला समजावता समजावता मीसुद्धा खूपच भावूक झालो आणि प्रेमाच्या त्या आवेशात आम्ही कधी एकरूप झालो ते आम्हालाच कळल नाही. जेव्हा शुद्द आली तेव्हा लक्षात आल कि जे घडू नये ते घडल होत. मुग्धासारख्या संस्कारी मुलीने हि गोष्ट फारच मनाला लावून घेतली. पण मी तिला समजावले आणि लवकरच परत येऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तिने रडतच मला विचारले, “तू नाही आलास तर?”
त्यावर मी हसून म्हणालो, "तू तेच मंत्रमुग्ध करणार गाण म्हण, मी कुठेही गेलो तरी तिथून परत येईन. तिचा निरोप घेऊन मी निघालो पण वाटेतच आमचा अपघात झाला आणि त्या अपघातात आम्ही दोघेही मारले गेलो. मुग्धाला हा धक्का सहन झाला नाही. तिने या विशाल समुद्रात आपल्या शरीराला झोकून दिल. पण मी तिच्याकडे परत येणार हा विश्वास तिला होता म्हणूनच इतकी वर्ष “त्या” गाण्याचे सूर आळवत ती माझी वाट बघत माझ्यासाठी थांबून राहिली आणि अखेर तिच्या गाण्याच्या सुरांनी पुन्हा व्याकुळ होवून मी तिच्याजवळ परत गेलो. आता आम्ही एकत्र निघालोय खूप दूरच्या प्रवासासाठी आणि एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. ............... "अजयच बोलण थांबल आणि गाण्याचे सूर वाजू लागले..........

समाप्त
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment