एक्झॅम फिव्हर
सद्ध्या ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवायला लागलेय. अशातच चढलेल्या Exam fever ने समस्त 'आई' वर्ग चांगलाच वैतागलेला आहे. आमच्याकडे तर अगदी भयानकच परिस्थिती आहे. आमची कन्यका या सहामाही परिक्षेच्या पेपर्समध्ये वेगवेगळे शोध लावून घरी येत आहेत. इतिहासात लागलेला नवीन शोध म्हणजे 'भारुड रचण्याच श्रेय चक्क ज्ञानेश्वर महाराजांना मिळाल आहे. जीथे त्यांना इतिहासच चुकीचा शिकविला जातोय तिथे तिची ही चूक म्हणजे अगदिच सामान्य आहे असा विचार करून मि उदार मनाने तिला माफ केल. "Shahaji Raje had appointed some teachers for Shivaji to teach him warfare". हे इतिहासाच्या पुस्तकातील वाक्य वाचून यापुढे कन्येने लावलेल्या इतिहासातील प्रत्येक शोधासाठी तिला माफ करण्याचा निर्णय मी घेतला आहे. असो. तर इतिहासाची लढाई लढून झाल्यावर. काल इंग्लिशची लढाई लढववायची होती. संध्याकाळी अहो जरा लवकरच घरी आले. जरा लवकर आलेत तर लेकीचा अभ्यास घेतील अशी उगाचच एक वेडी आशा होती मनाला. आवरुन चहा वगैरे झाल्यावर मी लेकिला म्हणाले. आता मी जरा बाहेर जावून येते बाबा घेतिल पुढचा अभ्यास, "छे छे अग मला बाहेर जायचय मित्राकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणत होता परवा. बघूया भेटून येतो त्याला". आयुष्याच्या जोडीदारच अस एकटिला लढायला सोडून गेला म्हटल्यावर काय बोलणार? असो.. बाहेर जायचा बेत रद्द....... काय करणार? रात्रीच जेवण आणि किचनचची काम आवरुन बेडरूममध्ये गेले. फारच उकडत होत म्हणून AC ऑन केला तर रीमोट बिघडलेला. आता रिमोट दुरुस्त करुन आणणे हे जणू फक्त माझच काम आहे ते उद्या करायलाच हव असा मनात विचार करुन बेडवर आडवी झाले आणि थोबाडपुस्तिका चाळू लागले. गौरी ब्रम्हेची पोस्ट वाचली त्यातल शेवटच वाक्य काळजाला भिडल....... आयुष्य खूप सुंदर आहे फक्त....................... .................................... मुलांची परिक्षा संपली पाहिजे. तेवढ्यात मैत्रिणिचा फोन आला, "अग तो Rivision चा question 6B लिहिलाय का चिन्मयीने?" थांब चेक करते अस म्हणून कन्येची वही हातात घेतली तर त्याच्यात 6B हा प्रश्नच अस्तिवात नव्हता. मी मैत्रिणीला तस सांगितल्यावर ती मोठ्या मनाने म्हणाली, "असूदे मी Whats ap करते तुला जमल तर घे करुन उद्या पेपरला विचारतील बहुदा." चला लढाई पुन्हा सुरू ..... तासभर डोकफोड करुन अखेर साडेदहा वाजता झोपायला बेडरूममध्ये गेले. झोपताना गौरीच्या पोस्टमधले शब्द थोडा बदल करुन ओठांवर आले ...... आयुष्य सुंदर आहे फक्त ................ मुलांचा अभ्यास घ्यायला लागता कमा नये. यावर अहो म्हणाले ....... आणि AC चा रिमोट बिघडता कामा नये. कोणाच काय तर कोणाच काय असा विचार करुन मी शांतपणे झोपी गेले ...
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment