तिच काय चुकलं?
त्या दिवशी तो जरा रागारागातच घरी आला. हातातली बॅग भिरकावून दिली आणि तिला जोरजोरात हाका मारु लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून त्याचे आई बाबा हॉलमध्ये आले. नक्की काय झालं ते कोणालाच कळेना. एरवी शांत असणारा तो आज एवढा का चिडला असेल? "ती आली नाही अजून ऑफिसमधून." त्याच्या आईने शांतपणे सांगितले.
तेवढ्यात ती आली. तिला बघून त्याचे आई वडील एकदम शांत झाले. घरातलं एकंदरीत वातावरण बघून काहीतरी बिनसलं आहे याची जाणीव तिला झाली.तिला बघून तो काही बोलणार इतक्यात तिने विचारलं, "मला बघून सगळे एकदम शांत का झालात ? काय झालं ?
"काय झालं ? सगळं करुन सवरुन असं निर्लज्जपणे विचारताना लाज नाही वाटत तुला ? का फसवणूक केलीस माझी? काय कमी होती माझ्या प्रेमात म्हणून असा विश्वासघात केलास माझा ?" तो रागारागाने म्हणाला.
"जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोलशील प्लीज ?" ती शांत शब्दात म्हणाली.
"आज दुपारी तुझ्या ऑफिसच्या समोरच्या ऑफिसमध्ये एका मिटिंगसाठी आलो होतो. तिथून निघेपर्यंत दिड वाजून गेला. विचार केला तुझाही लंच ब्रेक झाला असेल शक्य असेल तर दोघं एकत्रच जाऊ लंचला.खरं तर मी तुला फोनच करणार होतो पण नंतर विचार केला तुला सरप्राईज द्यावं. पण खरं सरप्राईज तर मला मिळालं. तुझ्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा ..... तू ....मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तुला तुझ्या त्या बॉसच्या मिठीत......" बोलता बोलता त्याचा स्वर कापरा झाला. त्याच्या मनात प्रचंड राग आणि दु:ख या दोन्ही भावना एकाचवेळी दाटून आल्या होत्या.
त्याचं बोलणं ऐकून ती दुखावली पण तितक्याच खंबीरपणे त्याला म्हणाली, " तू इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विचार करशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. कुठलाही विचार न करता थेट निष्कर्षापर्यंत पोचलास तू ? प्रत्येक वेळी जे डोळ्यांना दिसतं तेच खरं नसतं. तुला माहिती आहे आज ऑफिसमध्ये काय झालं ते? आज ऑफिसमध्ये प्रमोशन लिस्ट डिक्लेअर केली गेली. सरांनी त्यांच्या सख्ख्या भावाला त्याच्या पोस्टवरुन हटवून त्या जागी मला प्रमोशन दिलं. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला. त्याने लंच ब्रेकच्या आसपास हॅन्डओव्हरच्या प्रोसेसबद्दल डिस्कस करण्यासाठी मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं . एकएक मुद्दे वाढवून मुद्दाम उशीर केला. सगळा स्टाफ लंचसाठी कॅन्टिनमध्ये गेल्याची खात्री झाल्यावर त्याने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचवेळी सर केबिनमध्ये आले आणि त्यांच्यामुळे माझी सुटका झाली. झालेल्या प्रकाराने मी खूप घाबरले होते. सरांनी मला आधार दिला. घडलं काहीच नव्हतं खरं तर पण जर काही घडलं असतं तर या विचाराने धास्तावलेल्या मला जवळ घेऊन त्यांनी मला समजावलं. माझं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. यात कुठलीही वासना नव्हती रे, होती ती फक्त आपुलकी. त्या क्षणी सरांनी मला मित्रत्वाच्या नात्याने आधार दिला. आणि हो मित्रत्वाच्या नात्यानेच! उगाच मानलेला भाऊ वगैरे लेबल लावायला नाही आवडत मला. त्यावेळी मला सगळ्यात जास्त गरज तुझी होती. तू तिथे आलाही होतास पण मला आधार नाही देउ शकलास. का ? कारण मला आणि सरांना एकत्र बघून तुझा पुरुषी इगो दुखावला गेला आणि तू गैरसमज करुन घेउन तिथून निघून गेलास.
मला एक सांग हेच जर तू मला एखाद्या मैत्रीणीबरोबर बघितलं असतस तर खटकलं असतं तुला ? खात्रीने सांगते ; नसतं खटकलं. कधी बदलणार ही मानसिकता? एक स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या जवळ आहेत; मिठीत आहेत म्हणजे त्यांच्यात फक्त रोमान्स चालू आहे? बाकी कुठला अर्थ असूच शकत नाही का ? स्पर्श हा भावनांशी निगडीत असतो; शरीराशी नाही. म्हणूनच प्रत्येक स्पर्शाचा अर्थ आपल्याला कळतो, जाणवतो. शारीरिक स्पर्श हा भावना पोचविण्याचे एक माध्यम असतं फक्त. आपुलकीच्या मायेच्या स्पर्शाने दु:ख हलकं होतं. हळूवार हव्याहव्याशा वाटणाच्या स्पर्शाने मन मोहरुन जातं. वासनेने बरबटलेल्या स्पर्शाचा किळस वाटतो. सहज झालेला स्पर्श आणि सहेतूक केलेला स्पर्श अगदी लहान मुलांनाही कळतो. पण बघणाऱ्याचा दृष्टीकोन कोण ठरवणार? मला नाही वाटत माझ्याकडून काही चूक झाली आहे. चूक तर तुझी झाली आहे; मला समजून घेण्यात. अगदी सहज माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मोकळा झालास. एक क्षणही माझ्या मनाचा विचार करावा असं वाटलं नाही तुला?आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे सगळं तुला सांगतेय ते तुला खरं काय आहे ते कळावं म्हणून; माझी बाजू पटवून देण्यासाठी नाही. कारण जे खरं आहे ते फक्त सांगावं लागतं, ते पटवून द्यायची गरज नसते. तुला किंवा कोणालाही जर का असं वाटत असेल की, मी माफी मागावी तर तसं होणार नाही. काहीही झालं तरी माझी चूक नसताना मी माफी मागणार नाही. माफी तुला मागावी लागेल आज. कारण तुझा इगो हर्ट झाला असेल कदाचित पण माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. ऑफिसमध्ये जे घडलं सगळं विसरुन, घरी येवून नव्या उत्साहाने प्रमोशन सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं मी. पण इथे मात्र काही वेगळच वाढून ठेवलं होतं माझ्यासाठी. आता मी तुला विचारते, 'काय कमी होती माझ्या प्रेमात म्हणून असा अविश्वास दाखवलास माझ्यावर ?"
मनातलं सगळं बोलून ती शांत झाली. त्यानंतर कोणीच काही बोलत नव्हतं. ती जे बोलत होती त्यातला प्रत्येक शब्द बरोबर होता. पण तिचं बोलणं 'तो' किंवा त्याच्या घरातले समजून घेतील का ?
©मानसी जोशी

अप्रतिम!! खूप छान शब्दबद्ध केलाय.👍👍
ReplyDeleteअप्रतिम!! खूप छान शब्दबद्ध केलाय.👍👍
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete