#हॉन्टेड स्टोरी
(ही कथा सत्यघटनेवर आधारीत आहे)
गोष्ट तशी फार जूनी नाहीये. तो २००२ सालातला ऑक्टोबर महिना होता. नक्की तारिख आठवत नाहिये पण त्या दिवशी रत्नागिरीत सध्याकाळी वादळ झाल होत. मुसळधार पाऊस बरसत होता.आमच लॉ कॉलेज संध्याकाळी असायच. ५ वाजता घरुन निघाले तेव्हा वाटलही नव्हत वादळ होइल. पावसाची शक्यता मात्र होती. अर्ध्या वाटेत गेले आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला रस्त्यावरची धुळ उडून डोळ्यात जात होती. वाऱ्याचा वेग अजूनच वाढला. माझी स्पिरिट गाडी एका साइडला जावू लागली. वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊसही सुरु झाला. एव्हाना मी कॉलेजला पोचू शकत नाही हे माझ्या लक्षात आल होत. मी गाडी साइडला घेतली आणि तिथल्याच एका दुकानात जावून थांबले. पावसामुळे संध्याकाळीच काळोख झाला होता. त्यात भर म्हणून नियमानुसार लाइट गेलेच होते. माझ्यासारखे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. संध्याकाळचे ७ वाजत आले होते. वादळाचा जोरही हळूहळू ओसरत होता. मी ही घरी आले. घरी आले तेव्हा साडेसात होवून गेले होते. आई म्हणाली, "चला सुखरूप आलीस एक काळजी मिटली. नुसता जिवाला घोर लागला होता त्यात आजोबांना (आईचे वडील) Admit केलय. मी हॉस्पिटलमध्ये जातेय झोपायला, पहाटे लवकर येइन", अस म्हणून आई हॉस्पिटलमध्ये गेली. लाइट आलेलेच नव्हते त्यामूळे TV बघता येत नव्हता की पुस्तक वाचता येत नव्हत. घरी मी आणि माझा धाकटा भाऊ मयुरेश दोघेच होतो. बाबा तेव्हा मुंबईला होते. आम्ही जेवून घेतल. तेवढ्यात आमच्या सोसायटीत रहाणारा आणि नुकतच लग्न झालेला सगळ्यांचा सुनील मामा आणि मामी गप्पा मारायला आमच्याकडे येवून बसले. मग एक एक करित सोसायटीमध्ये रहाणारे काही समवयस्क मित्र मैत्रिणी गप्पामध्ये सामिल झाले. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.
रात्रिचे १० वाजुन गेले होते. लाईट अजूनही आले नव्हते. बाजूला रहाणाऱ्या सावंत काकांनी, "झोपताना सेफ्टी डोअरला आठवणीने कुलूप लाव", अस सांगून त्यांचे दार लावून घेतले. आमच्या बिल्डिंगमध्ये L पॅटर्ननुसार फ्लॅट्स होते म्हणजे आमचा फ्लॅट नॉर्थ फेसिंग तर बाजूचा सावंत काकांचा फ्लॅट ईस्ट फेसिंग. आणि दोन्ही फ्लॅट्सना मिळून एक कॉमन पॅसेज. आमच्या घराच्या दरवाज्यापासून पासून जवळपास३ फुट लांब अंतरावर ग्रिलचे (लिफ्ट च्या दाराप्रमाणे) कॉमन सेफ्टी डोअर होते. त्याला रात्री झोपताना आम्ही कुलूप लावत असू. कुलुपाच्या एकूण ४ किल्ल्या होत्या; दोन सावंत काकांकडे तर दोन आमच्याकडे. हळूहळू ११ वाजत आले. एकएक करीत सगळे आपआपल्या घरी निघून गेले. आम्हीही दार लावून हॉलमध्येच झोपलो. झोप तर येत नव्हती बाहेर कुत्रे भयंकर आवाजात रडत होते. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मधूनच येणारा आवाज, मधूनच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज. कुत्र्याच ओरडण अशुभ असत ऐकल होत त्यात आजोबा हॉस्पिटलमध्ये मला सगळच विचित्र वाटत होत. भाऊ कधीच झोपला होता. मी मात्र कितीतरी वेळ कूस बदलत जागी होते. रामरक्षा, मारुती स्तोत्र,गणपती स्तोत्र म्हणता म्हणता कधी झोप लागली ते मला कळल नाही. जाग आली ति दारावर टकटक केल्याच्या आवाजाने. मी दचकले घड्याळात बघितले ते २ वाजले होते. एवढ्या रात्री कोण आल असेल ? आजोबा ठिक तर असतील ना? अशा अनेक प्रश्नांची मनात गर्दी सुरु झाली पण दार उघडायची हिम्मत काही होत नव्हती. छे कोणी नसेल उगाचच भास झाला असेल, असा विचार करुन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला तेवढ्यात पुन्हा टकटक!! आता मात्र मी घाबरले मी भावाला हाक मारली. तो झोपेतच माझ्यावर वैतागून म्हणाला, कोणी नाही ग तुला भास झाला असेल तु झोप." नाही रे मी दुसऱ्यांदा ऐकलाय हा आवाज" मी म्हणाले. "बर बघू परत आला तर अस म्हणून भाऊ डोक्यावर पांघरूण घेउन झोपला. थोड्या वेळाने पुन्हा टकटक झाली. मी खुप घाबरले पण तेवढ्यात बाजूचे सावंत काका उठून त्यांच दार उघडत असल्याचा आवाज मला आला. मी ही मग हिम्मत करुन उठले. इमर्जन्सी लाइट लावून पटकन दार उघडल तर बाहेर कोणीच नव्हत. सावंत काका मला म्हणाले, "कोण वाजवत होत दार कुणास ठावूक? तु पण ऐकलास ना आवाज?" मी होकारार्थी मान हलवली. "असेल कोणीतरी तु झोप आता" काका म्हणाले.मी हो म्हणून दार लावून घेतल. मनातून खर तर खूप घाबरले होते.झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती. पुन्हा रामरक्षा, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र एकामागून एक स्तोत्रे म्हणताना कधी झोप लागली ते काही कळक नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा आई घरी आली होती. तिला रात्रीचा प्रकार सांगितला. आईशी बोलताना रात्री लक्षात न आलेली एक गोष्ट अचानक माझ्या लक्षात आली आणि मी आईला म्हणाले, आई सेफ्टी डोअर लॉक असताना कोणी दारावर टकटक कस काय करु शकत? दरवाजापासून जवळपास ३ फुट अंतारावरून सेफ्टी डोअरमधून हात घालून कोणी दारावर टकटक कस काय करु शकेल? माझ्या या बोलण्यावर सावंत काका म्हणाले, "अग रात्री झोपताना सेफ्टी डोअरला कुलूप घालायला विसरली असशील." यावर मात्र आई म्हणाली, "नाही तिने कुलूप व्यवस्थित घातल होत मी पहाटे आले तेव्हा कुलूप उघडूनच आत आले." तेवढ्यात आमच्याकडे कोणीतरी आले आणि तो विषय अर्धवटच राहिला. पण माझ्या डोक्यातून हा विषय काही गेला नाही. मी सोसायटीतल्या माझ्या मित्र मैत्रीणींना ही हकीगत सांगितली आणि मग आम्ही नक्की काय प्रकार आहे हे शोधायचं ठरवलं.
मुळात या असल्या गोष्टींवर कोणाचाच फारसा विश्वास नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही या प्रकरणाचा छडा लावायचा हरप्रकारे प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तरी ग्रिलमधून हात घालून टकटक करणं शक्यच झालं नाही आणि ग्रिलमधून काठी घालून दारावर टकटक करुन बघितलेला आवाज मध्यरात्री आलेल्या आवाजाशी मॅच झाला नाही; कसा होणार? शेवटी बोटांनी केलेली टकटक आणि काठीने केलेली टकटक यात फरक तर जाणवणारच ना ? शेवटी मोठ्यांची बोलणी खाऊन प्रयत्न बंद केले. "दारावर टकटक केली कोणी आणि कशी ?" हा प्रश्न आजही माझ्या मनात घोळतोय. आयुष्यात अनेक निरुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांपैकीच हा ही एक प्रश्न!
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment