मुलांचे पसारे ही समस्त आयांची एक मोठी समस्या आहे. कितीही वेळा सांगितल तरी पसारे करतातच. साम, दाम, दंड, भेद कशाचाच उपयोग होत नाही. माझ्या लेकीने एके दिवशी मात्र शहाण्या मुलीसारखं वागून पसारा आवरुन ठेवला. संध्याकाळी मला म्हणाली, "आई बघ मी सगळी वह्यापुस्तकं आवरुन ठेवली." मी कामात होते कामं करता करता very good म्हणून पुन्हा कामात गर्क झाले. तर वैतागून म्हणाली तुला माझं कौतुकच नाही. मला वाटलं होतं तू माझं कौतुक करशील ......."
"अगं म्हटलं ना very good." आणि एवढं विशेष काय केलस तू ? आपलं सामान आपण आवरुन ठेवायचच असतं. त्यात कौतुक कसलं करायचं ? कामच आहे तुझं ते. आवरुन ठेवत नाहीस हे विशेष असतं." मी वैतागून म्हणाले.
या प्रसंगाला खूप महिने होऊन गेले. मी तर विसरुनही गेले होते सगळं. एक दिवस आम्ही घरी क्रिकेट मॅच बघत होतो. कुठली सिरिज ते आठवत नाही पण तेव्हा धोनी कॅप्टन होता. धडाधड विकेट पडत होत्या. मॅच जवळपास हातातून गेल्यातच जमा होती. अशातच धोनी खेळायला आला. सुसाट फलंदाजी करत त्याने मॅचमध्ये पुन्हा जीव आणला आणि आपण ती मॅच जिंकलो. मी सहज म्हटलं, "धोनी खरच खूप ग्रेट आहे ना. कसला खेळला आज. अगदी कॅप्टनशीपला साजेशी खेळी खेळला."
माझं बोलणं ऐकून बाजूलाच बसलेली माझी लेक म्हणाली, "आई त्यात विशेष काय आहे ? तो कॅप्टन आहे. त्याने आज खेळायलाच हवं होतं. त्याचं कामच आहे ते. तो खेळला नसता तर विशेष होतं. तूच म्हणतेस ना आपलं काम आपण करायचच असतं. त्यात कौतुक करण्यासारखं काहीच नसतं. "
हे ऐकून आम्ही सगळीजणं खूप हसलो. 'मेरी बिल्ली मुझेही म्याव' असं म्हणत लेकीला जवळ घेतलं आणि त्या दिवशी मात्र मी मनापासून लेकीचं कौतुक केलं.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment