डोरेमॉन! अनेकांचे आवडते कार्टून. माझ्या लेकीलाही डोरेमॉन प्रचंड आवडतं. मध्यंतरी आमच्याकडे Disney चॅनल लागायचं अचानक बंद झालं होतं. मी मनातून देवाचे आभार मानले होते. पण लेकीच्या हट्टामुळे दिवाळीच्या सुट्टीत कस्टमर केअरला कॉल करुन ते पुन्हा चालू केले. लेक खूश झाली. सगळं व्यवस्थित सुरु होतं पण प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा लेकीच्या वहीवर 'Homework not done' आणि 'Notebook incomplete' हे दोन्ही रिमार्क्स एकाच दिवशी आले. यासाठी डोरेमॉनच जबाबदार असल्याची मला खात्री होती म्हणूनच मी रागारागात Disney चॅनेल बंद करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला . या कस्टमर केअर वाल्यांचा काय प्रॉब्लेम असतो कळत नाही; तुम्ही भाषा कुठलीही सिलेक्ट करा ते तुमच्याशी हिंदीमध्येच बोलायला सुरुवात करतात. मी माझ्या तोडक्या मोडक्या गावठी हिंदी भाषेत त्यांना Disney चॅनेल बंद करायची विनंती केली.
"मॅम बहोतही अच्छा चॅनेल हैं आप क्यों बंद करना चाहती हो? इसपर बच्चोंके लिए कितने अच्छे अच्छे प्रोग्रॅम्स होते हैं प्रती महिना सिर्फ 18 रुपये कट होते हैं आपके अकाउंटमेसे........." कस्टमर केअरवाला मला समजवायचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
"अच्छा हैं इसलिए तो बंद करना हैं| अभी एक्झॅम्स सरपर हैं , बच्चे सारा दिन टिव्ही देखते रहेंगे तो पढाई कब करेंगे ? और आप मुझे समझानेकी कोशिश ना ही करो तो बेहतर हैं| मै आपको बोल रही हूँ चॅनेल बंद करना हैं तो बंद करना हैं | ( रागारागात फाडफाड इंग्लिश बोलतात तसं मी फाडफाड हिंदी बोलले.)
कस्टमर केअरवल्या त्या मुलाने माझ्या बोलण्यावरून योग्य तो अंदाज बांधून चॅनेल बंद करण्याची रिक्वेस्ट फॉरवर्ड केली आणि दहा मिनिटात चॅनेल बंद होइल अस सांगितलं. अर्थात या प्रकारानंतर लेक मनातून माझ्यावर प्रचंड चिडली होती.
हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, D2h वाल्यांनी Disney चॅनेल पुन्हा बेसिक पॅकमध्ये इनक्लूड केल्याचा साक्षात्कार परवाच माझ्या लेकीला झाला.त्यामुळे मी फोन करुन चॅनेल बंद करु शकत नसल्याचा आसुरी आनंद सद्ध्या लेकीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहतोय.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment