असेल बुवा रोमॅन्टिक वगैरे वाटत हा पावसाळा! पण मला मात्र हा पावसाळा कधीच आवडला नाही. हा तसं रोमॅन्टिक कथा कविता वाचून पावसाळा आवडून घ्यायचा खूप प्रयत्न केला मी, पण नाहीच आवडला कधी मला.
शाळेत असताना पावसाळा न आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे पी.टी. च्या पिरिएडला खेळायला बाहेर जायला मिळायचं नाही.( आमच्या शाळेत गेम्स आणि पी.टी. असे वेगळे पिरिएड्स नव्हते. फक्त शनिवारी त्या कवायती वगैरे व्हायच्या पी.टी. च्या पिरिएडला बाकी इतर दिवशी फक्त खेळ). मग शिक्षकांचा मूड चांगला असेल तर वर्गात भेंड्या, नाव-गाव-फळ-फूल, असे खेळ खेळले जायचे. मूड नसेल तर संपलच.. करा अभ्यास, सोडवा गणितं किंवा अगदीच काही नसेल तर कविता पाठ करा असं सांगण्यात यायचं. शाळेत तर नाहीच पण घरी आल्यावर पण अंगणात साचलेल्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे खेळायला मिळायचं नाही. दुसरं कारण म्हणजे पावसाळी सॅन्डल्स! आमच्या शाळेत पायातले शूज हा स्कूल युनिफॉर्मचा एक भाग नव्हता. त्यामुळे ऋतूप्रमाणे चप्पल खरेदी व्हायची. त्यात त्या पावसाळ्यात वापरायच्या 'चपाक चपाक' आवाज करणाऱ्या सॅन्डल प्रचंड बोअर प्रकार असे. त्याच्यात ठरलेली डिझाइन्स त्यामुळे अनेक जणींच्या सॅन्डल्स एकसारख्याच असायच्या. बरं त्या वापरुन चिखल उडत नाही असं कधी घडलं नाही. मग त्या का वापरायच्या हे आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे.
पुढे कॉलेजला जायला लागल्यावर तर पावसाने माझा अक्षरश: छळ मांडला. कॉलेजला युनिफॉर्म हा प्रकार नव्हता त्यामुळे रोज वेगवेगळे ड्रेस घालायचं स्वातंत्र्य तिथे मिळालं. माझा वाढदिवस मे महिन्यामध्ये येत असल्याने मला अनेक नवीन ड्रेस तेव्हा मिळत असत. ते नवीन ड्रेस कॉलेजला वापरायची प्रचंड उत्सुकता तेव्हा असायची पण पावसामुळे ते कधीच शक्य झालं नाही आणि पावसाळा संपेपर्यंत त्या ड्रेसबाबतचा सगळा उत्साह मावळलेला असायचा. सगळ्यात जास्त वैताग यायचा तो सुट्टीच्या दिवशी. दिवसभर घरात बसून वैताग यायचा; खासकरून संध्याकाळ जास्त कंटाळवाणी जायची. कारण मला संध्याकाळी घरात बसायला कधीच आवडत नाही. पण पावसामुळे कुठे जायची पण इच्छा व्हायची नाही. पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रावर जायलाही घरातून परवानगी मिळायची नाही. कारण समुद्राला उधाण आलेलं असायचं.
मी घरातून कॉलेजला जायला निघायची आणि पावसाची वेळ नेहमी एक असायची. अगदी पाच मिनिटांपूर्वी उन असायचं आणि मी घरातून निघाले की अचानक अंधारुन यायचं आणि पावसाला सुरुवात व्हायची. मी वैतागायचे मग आई म्हणायची, "अगं चिडतेस काय पावसाचेच दिवस आहेत मग पाऊस पडणारच ".
तर एकूणच पावसाळा हा मला लहानपणापासूनच न आवडणारा. त्या ओल्या चिखल पसरलेल्या रस्त्यावरुन छत्री सावरत चालायचं. कधी वाऱ्यामूळे छत्री उलटी होते तर कधी कोणाला तरी लागायची भीती. या सगळ्या प्रकारात अंग अर्धअधिक भिजलेलं असतं. बरं रेनकोट तर त्याहीपेक्षा बोअर!
त्यातल्या त्यात या पावसाळ्यात आवडणारी एकच गोष्ट म्हणजे; घरातल्या खिडकीत बसून बाहेर मुसळधार पडणारा पाऊस बघत आवडती गाणी ऐकणे आणि जोडीला आलं घातलेला कडक चहा किंवा वाफाळणारी कॉफी! पण पुण्यात आल्यापासून मुसळधार पाऊस क्वचितच बघायला मिळतो.
मला पाऊस आवडत नसला तरी पावसामुळे हिरवीगार झालेली सृष्टी बघायला मात्र फार आवडते.पावसात फिरायला आवडत नसलं तरी पाऊस पडून गेल्यावर बाईकवरुन फिरण्याचा आनंद काही वेगळाच.
सुदैवाने 'अहों'नाही पाऊस आवडत नाही त्यामुळे मी निर्धास्त झाले आणि पाऊस आवडून घेण्याचा अट्टाहास किंवा प्रयत्न अगदी आनंदाने सोडून दिला.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment