मी नाही करत वडाची पूजा;
जरीची साडी नेसून, दागिने घालून नटून सजून वडाच्या झाडाची पूजा करुन वाण वाटणे.... नाही साजरी करत अशी वटपोर्णिमा. पण नवऱ्यावर जीवावर बेतणारं संकट आलं तेव्हा मात्र वेस्टर्न कपडे घालूनच खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याची सेवा केली. प्रसंगी दागदागिने विकायचीही तयारी दाखवली.
नवऱ्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना नाही करत वडाकडे. पण त्याचं डाएट मात्र शक्य तेवढं सांभाळते. त्याची तब्बेत चांगली रहावी म्हणून सारे प्रयत्न करते.
वडाला दोरा गुंडाळत नाही पण नात्यांची गुंफण करायला अगदी छान जमलं मला.
वडाची पूजा करत नाही पण कुठलही झाड कधी तोडलं नाही. अगदी कुठल्या झाडाची फांदीही कधी तोडली नाही.
मी वटपौर्णिमेच्या सणाच्या विरोधात नाही. मला धार्मिक प्रथांचा आदर आहे कारण त्यामागे सामाजिक आणि शास्त्रीय कारणे आहेत हे मला ठावूक आहे. खर तर मला त्या कारणांचाच आदर जास्त आहे. म्हणूनच कुठलीही रुढी परंपरा आंधळेपणाने पाळणं मला जमत नाही. म्हणूनच साऱ्या निसर्गालाच नमस्कार करते रोज कारण निसर्ग कोपला तर केवळ विनाशच ..
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment