भेट
संध्याकाळी अमर त्याच्या मैत्रीणीच्या म्हणजेच श्वेताच्या साखरपुड्याला जायच्या तयारीत होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर आईचं नाव बघून अमर काहीसा वैतागलाच. कारण त्याला खात्री होती आईने लग्नाच्या विषयावर बोलायलाच फोन केलेला असणार. काहीसं वैतागूनच त्याने फोन घेतला. अपेक्षेप्रमाणे आईने लग्नाचा विषय काढलाच. हो नाही एवढं जुजबी बोलून, "आत्ता बाहेर निघालोय आल्यावर फोन करतो", असं सांगून काहीही ऐकून न घेता त्याने पटकन फोन ठेवला.
गेले दोन दिवस आई लग्नासाठी त्याच्या मागे लागलेली होती. त्याच्या मामीच्या माहेरच्या कुठल्यातरी मुलीचं स्थळ त्याच्यासाठी आलेलं होतं. चार वर्षांपूर्वी ग्रॅज्युएशन झाल्यावर तो मामाकडे एका फंक्शनसाठी गेला होता. तेव्हा ती मुलगी आणि तिची फॅमिलीही तिथे आली होती. त्याला तर आठवतही नव्हती ती मुलगी; तरी आई मात्र हे स्थळ बघण्यासाठी गेले दोन दिवस त्याच्या मागे होती. मनातून तो वैतागला होता. त्याला आत्ता लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. नुकतंच प्रमोशन झालं होतं. त्यामुळे जबाबदारी वाढली होती. आणि मुख्य म्हणजे निदान अजून एक दोन वर्ष तरी त्याला सिंगल असणं एंजॉय करायचं होतं. त्यात मामीच्या माहेरची मुलगी म्हणजे टिपिकल काकूबाई टाईपची असणार, असा त्याचा पक्का समज होता. त्यामुळे मुळात हे स्थळ बघायचीच त्याला इच्छा नव्हती. पण आई मात्र दोन दिवस या स्थळासाठी सारखे फोन करत होती आणि अमर प्रत्येकवेळी बिझी आहे सांगून फोन ठेवत होता.
श्वेता अमरची कॉलेजपासूनची मैत्रीण. दोघही एकाच ग्रूपमधली. त्यामुळे सहाजिकच तिच्या साखरपुड्याला कॉलेजचा अख्खा ग्रूप येणार होता. जवळपास ४ वर्षांनी सगळे एकत्र भेटणार होते. त्यामुळे अमरपण खूप खूश होता. श्वेताच्या साखरपुड्याचा हॉल तसा शहराबाहेर हायवेलगत होता. त्यामुळे अमरला निघायची जरा जास्तच घाई होती. चुकून हायवेला ट्रॅफिक लागलं तर पोचायला उशीर व्हायचा. त्यामुळे तो घाई गडबडीतच घरुन निघाला होता. अपेक्षेप्रमाणे श्वेताच्या साखरपुड्याला सगळा ग्रूप जमला होता. धमाल, मस्ती जुन्या आठवणी यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन, अमर रात्री ११.३० च्या दरम्यान घरी जायला निघाला.
पोर्णिमेची रात्र होती. बाहेर छान टिपूर चांदणं पडलं होतं. हवेत छान गारवा होता. सगळं वातावरण अगदी रोमॅन्टिक होतं. अमरने म्युझिक प्लेअर ऑन केला. त्यावर नेमकं त्याच्या आवडीचं गाणं सुरू झालं.....
मृगनयना_रसिकमोहिनी_.........
तो मजेत शिळ घालत गाडी चालवत होता. तेवढ्यात अचानक एक मुलगी हातवारे करत त्याच्या गाडीसमोर आली. त्याने करकचून ब्रेक मारला आणि चिडून काही बोलणार इतक्यात ती मुलगी गाडीजवळ येउन म्हणाली, " please help me ! माझी गाडी बंद पडलेय आणि इथे रस्ताही सुनसान आहे मला हायवे संपेपर्यंत लिफ्ट द्याल का? पुढे सिटीत गेल्यावर मी ऑटो किंवा टॅक्सी करेन पण प्लिज मला आत्ता लिफ्ट द्या."
खरंतर अमर ती समोर आल्यापासून फक्त तिच्याकडे बघत होता. तिचं सौदर्य बघून म्युझिक प्लेअरवर चालू असणाऱ्या गाण्यातल्या ओळी त्याच्या मनात घोळू लागल्या ...
"कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी..."
"Please believe me! मी कोणी चोर लुटारू नाहीये." त्या मुलीच्या आवाजाने अमर भानावर आला.
"ओके ! या ना आत बसा", असं म्हणत त्याने गाडीच दार उघडलं.
'Thanks' म्हणत ती गाडीमध्ये बसते.
अमरही 'वेलकम' म्हणून फॉर्मलिटी पूर्ण करतो. खरंतर 'ती पहाताच बाला' अशी त्याची अवस्था झालेली असते. 'लव्ह ॲट फर्स्ट साईट' होवू शकतं असं एक क्षण त्याला वाटून जातं आणि त्याचं त्यालाच हसू येतं.
काही वेळ कोणीच काही बोलत नाही. मग शांतता भंग करत ती म्हणते, "माझं नाव राधा. मी मित्राच्या साखरपुड्यासाठी गेले होते. घरी जाता जाता वाटेत गाडी बंद पडली. Thanks खरच तुमची खूप मदत झाली."
"Its ok, होतं असं कधीकधी. बाय द वे माझं नाव अमर आणि कोइन्सिडन्स म्हणा किंवा अजून काही मी सुद्धा आत्ता माझ्या मैत्रीणीच्या साखरपुड्यालाच गेलो होतो”.
यावर दोघही हसतात आणि हळूहळू त्यांच्यात मोकळ्या गप्पा सुरू होतात. तिच्याशी बोलता बोलता अमर घरी कधी पोचतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. घरी पोचल्यावर त्याच्या लक्षात येतं राधा त्याच्याबरोबरच आहे. तो राधाला म्हणतो, "सॉरी ! बोलण्याच्या नादात तुम्हाला हायवे एंड ला ड्रॉप करायचं लक्षातच नाही आलं नाही.”
"अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चूक तर माझीच आहे. माझ्या लक्षात यायला हवं होतं." राधा
"बरं तुम्ही कुठे राहता? म्हणजे जवळ असेल तर मी तुम्हाला ड्रॉप करतो." अमर
"MG Road निर्माण सोसायटी", इथून ती खूप लांब आहे. डोन्ट माईंड तुम्ही मला रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडा मी जाईन." राधा.
खर तर यावेळी राधासारख्या सुंदर मुलीला एकटीने घरी जाऊ देणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. पण MG Road म्हणजे शहराचं दुसरं टोक तिथे सोडायला जायचीही त्याची तयारी होती. पण येताना त्याला एकट्यालाच यावं लागल असतं. शेवटी हिम्मत करुन तो तिला विचारतो, "जर तुमची हरकत नसेल, तर तुम्ही माझ्या घरी थांबू शकता. उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या घरी जा. आत्ता यावेळी तुमचं एकटीने रिक्षाने एवढ्या लांब जाणं बरोबर नाही."
राधा काही क्षण विचार करते. खरंतर रात्री असं अनोळखी माणसाबरोबर त्याच्या घरी राहणं म्हणजे तिला जरा विचित्रच वाटत असतं. पण तरीही ती होकार देते कारण दुसरा ऑप्शनच तिच्याकडे नसतो.
दोघंही अमरच्या घरी जातात. अमर आपल्या बेडरुममध्ये राधाला झोपायला सांगतो आणि स्वतः हॉलमध्ये सोफ्यावर येऊन झोपतो. पण निद्रादेवी काही त्याच्यावर प्रसन्न होत नसते. डोळे मिटल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सतत राधाचा चेहरा येत असतो आणि डोळे उघडल्यावर राधाबरोबरचा आजचा प्रवास आणि प्रवासातल्या आठवणी!
रात्री कधीतरी त्याला झोप लागते. त्याला जाग येते ती मोबाईलच्या रिंगमूळे. सकाळी साडेसहाच्या सुमारास अमरचा फोन वाजतो अर्धवट झोपेत तो फोन घेतो. फोन आईचा असतो.
पलिकडून आई सांगते, "अमर राधा गेली"
राधाचं नाव ऐकून अमरची झोप उडते... "कोण राधा?" अमर जरा चाचपडतच विचारतो.
अरे तिच मुलगी जिचं तुला स्थळ आलं होतं. काल तू ज्या साखरपुड्याला गेला होतास ना ती पण तिथेच आली होती. पण वाटेत येताना एका टर्नवर तिचा अपघात झाला आणि ती जागीच ..... बोलता बोलता आईला रडू येतं. अमर सुन्न होवून सगळं ऐकत असतो.......
"चार वर्षांपूर्वी जेव्हा मामाच्या घरी तिने तुला बघितलं ना तेव्हाच तू तिला आवडला होतास. तेव्हापासूनच ती एकतर्फी प्रेम करत होती तुझ्यावर. तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची खूप इच्छा होती तिची. म्हणूनच काल मी तुला हेच सांगायला फोन केला होता की तू ज्या साखरपुड्याला जाणार आहेस तिथे राधा पण येणार आहे. तुला भेटेल तिथे ती. पण तू लग्न म्हटलं की विषयच टाळत होतास..." आई राधाबद्दल बोलत होती आणि अमर सुन्नपणे सगळं ऐकत होता.
तिने राधाबद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट रात्री भेटलेल्या राधाशी जुळत होती. म्हणजे,"काल रात्री मला भेटलेली राधा ....."मनात आलेल्या या विचारासरशी तो दचकला, "आई मी तुला नंतर फोन करतो असं म्हणून त्याने फोन कट केला आणि बेडरूममध्ये राधाला बघायला गेला. बेडरूममध्ये कोणीच दिसत नाही. तरीही तो राधाला हाका मारत घरभर फिरतो. हॉलमध्ये आल्यावर त्याच्या लक्षात येतं; मेन डोअरला आतून कडी आहे म्हणजे राधा बाहेर गेलेली नाही. पण मग ती घरात पण नाही याचा अर्थ ..... "काल रात्री मी एका भूतासोबत होतो. मी जिच्या प्रेमात पडलो ती भूत होती ?" तो मटकन खाली बसून डोळे मिटून घेतो. डोळे मिटताक्षणी त्याच्या डोळ्यासमोर राधाचा चेहरा येतो आणि मनात आपोआपच सुर उमटतात....
"कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी..."
©मानसी जोशी

jabardast...
ReplyDelete