स्विकार
पार्किंगमध्ये गाडी पार्क करुन विक्रांत लिफ्टजवळ आला. त्याने आज जरा जास्तच प्यायली होती. पण तो काय करणार आजचा दिवसच तसा होता. आज बरोबर १० वर्षे झाली 'ती' त्याच्या आयुष्यातून निघून जाऊन. 'ती' निघून गेल्यावर तो जगणच विसरला होता. एक जिवंत पुतळा बनून राहिला होता तो. विचारांच्या तंद्रीतच तो लिफ्टजवळ गेला. त्याने इतकी प्यायली होती कि लिफ्टमध्येही त्याच्या झेपा जात होता. कसाबसा तो फ्लॅटसमोर आला. बेल वाजवणार इतक्यात त्याच्या कानावर ठुमरीचे बोल ऐकू आले...
जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए.....
तानपुऱ्यावर आतमध्ये कोणीतरी सुंदर आवाजात गात होतं. त्या सुंदर स्वरांनी त्याची नशा खाडकन उतरली. एकेकाळी याच ठुमरीच्या स्वरांची त्याला नशा चढत होती. आणि आज तेच स्वर त्याची नशा उतरवत होते. "कोण गात असेल ? रिचा? आवाज तर रिचाचाच वाटतोय. रिचा इतकं सुंदर गाऊ शकते?" त्याच्या मनात आलं.
आतमध्ये रिचा भान हरपून गात होती आणि तो दरवाज्याबाहेर उभा राहून त्याच्या भूतकाळात हरवून जातो.
तिला त्याने पहिल्यांदा बघितले तेव्हा तेव्हाच त्याला ती आवडली होती. मधुरा तिचं नाव. ती त्याचा आईकडे गाणं शिकायला यायची. सुरांची तशी पक्की नव्हती पण आवाज मात्र इतका गोड कि तिने बोलत राहवं आणि समोरच्याने फक्त ऐकत राहवं. कित्येक दिवस, कित्येक महिने सरतात. पण तिच्याशी साधं दोन शब्द बोलण्याचीही त्याची हिम्मत होत नव्हती. त्याच्या आईच्या तालमीत तिच्या सूरांमध्ये कमालीची सुधारणा होते.
तसं त्याच आयुष्य साधं सरळ. वडीलाचं छत्र लहानपणीच हरपलेलं. आई शाळेत म्युझिक टिचर. आणि घरीही गाण्याचे क्लासेस घ्यायची. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अगदीच गरिबी नसली तरी थोडीफार ओढाताण होतच असे. त्यामुळेच तो MBA करता करता एका ट्युशन क्लासेसमध्ये लेक्चररचा जॉबही करत होता. त्या दिवशी घरात हॉलमध्ये मधुराची शिकवणी चालू होती. तसं त्याला गाण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता पण निव्वळ मधुरासाठी तो मुद्दाम क्लासच्या वेळी घरीच थांबायचा. त्या दिवशीही तो घरात होता. त्याच्या MBA च्या प्रोजेक्टच काम करत होता. बाहेर मधुराचा क्लास चालू होता आणि तेवढ्यात अतिशय सुंदर स्वरांनी त्याचं लक्ष वेधलं....
जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए
गाण्याच्या या सुरांनी विक्रांतला वेड लावलं. हो मधुराच गात होती. तो आतल्या खोलीतून बाहेर येउन क्लासच्या ठिकाणी येउन बसला. मधुरा गात होती आणि तो भान हरपून तिचं गाणं ऐकत होता. तिच्या सुंदर चेहर्यावरून त्याची नजरच हटत नव्हती. ठुमरी संपली तरी तो मात्र भारावलेलाच होता. तिच्या सुरात कमालीची सुधारणा झाली होती खुद्द विक्रांतच्या आईने तिला पोचपावती दिली होती. ही ठुमरी ऐकावी तर मधुराच्या आवाजातच !
त्यानंतर त्यांच्यात जुजबी बोलणं चालू झालं. हळूहळू दोघं एकमेकांत गुंतत गेली. खऱ्या भावनेला शब्दांची गरज नसते त्यामुळे त्या दोघांनी मनातल्या भावना एकमेकांसमोर कधीच व्यक्त केल्या नाहीत. असेच दिवस जात होते आणि सरणाऱ्या दिवसांबरोबर त्यांच प्रेमही बहरत होतं. विक्रांतच्या आईलाही याची कुणकुण लागली होती. पण ती मनोमन खूश होती. कारण सुस्वभावी सुंदर आणि मुख्य म्हणजे गाण्याची आवड असणारी मधुरा त्यांना सून म्हणून पसंत होती. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. एक दिवस अचानकपणे मधुरा क्लासला यायची बंद झाली. तिचा फोनही लागत नव्हता. असेल काहीतरी प्रॉब्लेम अस समजून विक्रांत आणि त्याच्या आईने जवळपास दहा बारा दिवस तिच्या फोनची वाट पाहीली पण ना मधुरा आली ना तिचा फोन. तिचा पत्ता विक्रांतला नीटसा माहिती नव्हता पण तरीही त्याने तिचं घर शोधून काढलं. पण घराला कुलूप होतं. आजूबाजूला चौकशी केली तर त्यांनाही काहीच माहिती नव्हती. विक्रांत मनाने खचला. मधुराचं असं अचानक निघून जाणं त्याने चांगलंच मनाला लाऊन घेतलं होतं. विक्रांतच्या आईला त्याची अवस्था बघवत नव्हती पण ती हतबल होती. असाच महिना सरला एक दिवस विक्रांतच्या नावावर एक पत्र आलं ..... मधुराने पाठवलेलं .... त्यात लिहिलं होतं , "माझ्या घरातल्या माणसांनी माझ्या इच्छेविरूद्ध माझं लग्न एका श्रीमंत बिजवराशी लावून दिलं आहे. मला माफ कर विक्रांत,पण मला हे लग्न करावं लागलं. काकूंचीही माफी मागते कारण माझ्या नवऱ्याला माझं गाणं पसंत नाही. त्यामुळे लग्न झाल्या दिवसांपासून मी गाणं सोडलं. मला माहिती आहे आता तुला काही सांगण्याचा अधिकार मी गमावला आहे तरी कधीकाळी असलेल्या हक्काने सांगते, ' आयुष्यात खूप यशस्वी हो, खूप पैसा कमव कारण पैसा हेच सर्वस्व नसलं तरी पैशाच्या जोरावर अनेक सुखं विकत घेता येतात. पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, तुझी न होवू शकलेली तरीही मनाने फक्त तुझीच असणारी.. मधुरा”.
पत्र वाचून विक्रांत खूप रडला. पण त्या दिवशी तो रडला ते शेवटचं. त्यानंतर त्याने पैसा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवलं. त्याच्या सुदैवाने MBA झाल्यावर त्याला एका उत्तम पगाराची नोकरी मिळाली. झोकून देउन काम केल्यामुळे यशाचं एकएक शिखर तो सहज पार करत गेला अवघ्या काही वर्षात तो कंपनीमध्ये एका उच्च पदावर पोचला. त्याची आई त्याच हे यश डोळे भरून बघत होती. पण तरीही कुठूनतरी आतून तुटत होती. विक्रांतने लग्न करावं अशी तिची मनोमन इच्छा होती पण विक्रांत लग्नाला तयार होणार नाही हे तिला माहिती होतं.
अशीच अजून काही वर्ष सरली. एका अपघातामध्ये विक्रांतची आई त्याला सोडून निघून गेली. आईच्या जाण्याने विक्रांत पूर्णपणे खचला. तो अगदी एकटा पडला होता. आता त्याचा दिवस ऑफिसमध्ये आणि रात्र बारमध्ये जाऊ लागली. अशातच एके दिवशी त्याचा मित्र त्याला डान्सबारमध्ये घेऊन गेला. तिथे त्याची ओळख रिचाशी झाली. दारू आणि रिचा दोन्हीची नशा त्याला हवीहवीशी वाटू लागली. पैशाची त्याला कमी नव्हती. त्यामुळे रिचाबरोबर अनेक रात्री घालवणे त्याच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. रिचाच्या सहवासात फक्त त्याची शारीरिक गरज पूर्ण होत होती. मनातून मात्र तो आजही मधुराला विसरू शकत नव्हता. रिचा मात्र भावनिकदृष्ट्या कुठेतरी त्याच्यात गुंतत चालली होती. अशातच डान्सबारवर बंदी आली. विक्रांतशिवाय कधीही कोणाला जवळ येऊ न दिल्याने रिचाकडे इतर बारबालांएवढा रग्गड पैसा आणि कॉन्टॅक्ट्सही नव्हते. अखेर विक्रांतने आपला एक फ्लॅट तिला रहाण्यासाठी म्हणून दिला. पण त्या मोबदल्यात विक्रांत म्हणेल तेव्हा तिने त्याला खूश करायच ही अट विक्रांतने तिला घातली. हतबल रिचासमोर त्याची मागणी मान्य करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय नव्हता. रिचा मनातून खूप दुखावली गेली होती. ती विक्रांतवर मनापासून प्रेम करत होती पण विक्रांत मात्र तिच्याकडे फक्त भोगवस्तू म्हणून बघत होता. तशी रिचा चांगल्या घरातली मुलगी पण वडीलांवर आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि त्या धक्क्याने आईने अंथरुण धरले. हळूहळू कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि नाईलाजाने रिचाला डान्सबारमध्ये बारबाला म्हणून काम करावं लागलं. काही दिवसांत तिची आईही तिला सोडून कायमची निघून गेली आणि रिचा एकटी पडली. या एकटेपणातच तिला विक्रांत भेटला आणि ती त्याच्यात गुंतत गेली पण त्याला तिच्या मनाची नाही तर शरीराची गरज होती.पण तरीही ती विक्रांतवर मनापासून प्रेम करत होती.
फ्लॅटमधून येणारा गाण्याचा आवाज थांबला. आणि विक्रांत भूतकाळातून बाहेर आला.त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. रिचाच्या बाबतीत आपण केवढं चुकलो याची जाणीव त्याला झाली. आज रिचाच्या आवाजातली ठुमरी ऐकताना त्याला रिचा नाही मधुरा गातेय अस वाटत होतं.आपल्या जवळच्या किल्लीने त्याने फ्लॅटचे दार उघडले. आतमध्ये तानपुऱ्यासमोर बसलेली रिचा दिसली. आज त्याला रिचामध्ये; तिच्या सुरांमध्ये मधुरा सापडली आणि त्याने रिचाचा आपली पत्नी म्हणून स्विकार करायचा निर्णय घेतला. त्याच्या गळ्यातून नकळत ठुमरीचे सुर बाहेर पडले......
#जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment