विकेन्ड ब्रेक
"बघ शेवटी उशीर केलासच निघायला. आपलं ठरलं होतं ना सकाळी लवकर निघायचं.......", गाडीत बसल्यावर ती त्याच्यावर वैतागून बोलत होती. तर तो अतिशय शांतपणे सगळं ऐकत गाडी चालवत होता. तशी ती थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड. पण तेवढीच समजूतदार. तो मात्र शांत. क्वचितच चिडणारा पण जेव्हा चिडेल तेव्हा आकाश पाताळ एक करेल असा. थोड्याच वेळात गाडी हायवेला लागते. तो तिला सिटबेल्ट लावायला सांगतो. "हो लावते," असं म्हणून काहीसं वैतागून ती सिटबेल्ट लावते. तिला सिटबेल्ट लावायला अजिबात आवडत नसे. पण हायवेवर तरी निदान लावावाच लागत असे. थोड्याच वेळात तो गाडीच्या काचा वर करुन ए.सी. ऑन करतो. ती काहीसं रागानेच त्याच्याकडे बघते. पण बोलत मात्र काहीच नाही. तिला ए. सी. च्या गारव्यापेक्षा खिडकीतून येणारा वाराच जास्त आवडायचा. दोन मिनिटे तशीच जातात. ती मोबाईलमध्ये गर्क होते. तो म्युझिक प्लेअर ऑन करतो आणि गाणं सुरु होतं ......
"साथिया ....मद्धम मद्धम तेरी गीली हंसी..... ".
ती चटकन मोबाइलमधून डोकं बाजूला करुन त्याच्याकडे बघते. तो गालातल्या गालात हसत असतो. तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याने तिला डेडीकेट केलेलं पहिलं गाणं असतं ते.
"हसती रहे तू हसती रहे, हया की लाली खिलती रहें, जुल्फ के नीचे गर्दनपे सुबह ओ शाम मिळती रहे ....",
गाण्याच्या ओळींबरोबर तिचं मनही भूतकाळात जातं. तिला आठवत त्यावेळी तिला नुसतं बघण्यासाठी तो तासनतास तिची वाट बघत बसायचा. ती दिसल्यावर मात्र त्याचा सगळा थकवा निघून जायचा. तासनतास तिच्या बोलण्यात हरवून जायचा. सगळी कामं बाजूला ठेवून नुसतं तिच्याशी बोलण्यासाठी, तिला बघण्यासाठी ती भेटण्याच्या ठिकाणी जाऊन थांबायचा. सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पण दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात विचार येतो, "तेव्हा मला नुसतं बघण्यासाठी तासनतास ताटकळत रहायचा पण आज मी कितीही नटून सजून त्याच्या समोर गेले तरी याचं माझ्याकडे लक्षच नसतं. बरं लक्ष वेधून घेउन कशी दिसतेय विचारलं तरी मोबाईल किंवा लॅपटॉपमधून एक सेकंदासाठी डोकं वर करुन बघितल्यासारखं करुन म्हणतो वा ! छान दिसतेयस". मनात आलेल्या या विचारामुळे तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळतं. ती पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागते. तेवढ्यात म्युझिक प्लेअरवर दुसरं गाणं सुरु होतं.
तुने ना जाना ये दिल दिवाना....... सुनो ना सुनो ना सुनलोsना हमसफर मुझीको चुनलो ss ना ....".
त्याने तिला डेडीकेट केलेलं दुसरं गाणं. गाणं ऐकून ती चमकून त्याच्याकडे बघते. तो गालातल्या गालात मिश्किल हसत असतो. तिच्याही चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटतं. त्याने तिला प्रपोज केलेला दिवस तिला आठवतो. तसा तो साधा सरळ. रोमॅन्टिक होणं वगैरे उसके बस की बात नही. त्यामुळे प्रपोज करतानाही कुठलीही फिल्मी स्टाइल न वापरता फक्त एवढच म्हणाला होता, "तू मला आवडतेस, I love you". तिने मात्र विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्याने तिला प्रपोज केल्यावर अनेक मैत्रीणी तिला सांगत होत्या, " विचार कसला करतेस ? डायरेक्ट हो म्हणायचं ते. एवढा डिसेंट मुलगा शोधून पण सापडणार नाही”. ती मात्र तेव्हा मैत्री का प्रेम यातच अडकलेली होती. इतकी वर्ष झाली लग्न होवून पण सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटत होतं तिला. तेवढ्यात तो गाण्यावर शिळ घालतो. ती त्याच्याकडे बघते नेमकं त्याच वेळी तो ही तिच्याकडे बघतो. दोघांची नजरानजर होते. ती गोड हसते. कितीतरी दिवसांनी नव्हे महिन्यांनी त्यांच्यामध्ये नजरेचा संवाद होतो.त्याचं असं गाण्यांवर शिळ घालणं तिला खूप आवडायचं. म्युझिक प्लेअरवर एकामागून एक त्याने तिच्यासाठी डेडिकेट केलेली गाणी वाजत असतात. हे सारं त्याने ठरवून केल आहे हे एव्हाना तिच्या लक्षात येतं. ती मनोमन सुखावते. तिच्या मनातला राग, चिडचिड कुठल्या कुठल्या कुठे निघून गेलेली असते. त्या चार/पाच डेडिकेटेड गाण्यांमूळे त्यांच्यामध्ये आलेला गेल्या काही महिन्यातला दुरावा कमी झालेला असतो.
हायवे संपून गाडी साध्या रस्त्याला लागते. ती सिटबेल्ट काढणार तेवढ्यात तो तिला खूणेनेच नको सांगतो. ती विचारते, "का? हायवे तर संपला ना?" तो म्हणतो, "अग राणी सिटबेल्ट आपल्या सेफ्टीसाठी असतो. तुझी सेफ्टी महत्वाची आहे माझ्यासाठी." ती काही न बोलता सिटबेल्ट तसाच ठेवते. एरवी तिने कदाचित वाद घातला असता पण तो एवढ्या प्रेमाने सांगतोय म्हटल्यावर ती त्याचं म्हणणं टाळत नाही. हळूहळू त्या दोघांमध्ये छान संवाद सुरु होत असतो. गाडी हॉटेलवर पोचेपर्यंत त्यांच्या मनातला दुरावा जवळपास संपलेला असतो. दुरावा तर संपला पण तेवढच पुरेसं नसतं. मनं पुन्हा जुळणं हे पण तितकच महत्वाचं असतं. आणि हे काम करते ती समुद्रकिनऱ्यावरची रम्य संध्याकाळ!
तिने त्याला होकार दिल्यानंतर दोघांच्या प्रत्येक रविवारची संध्याकाळ समुद्रावरच जात असे. तिला संध्याकाळ खूप आवडायची आणि समुद्राच्या पाण्यामध्ये बुडणारा सूर्य, त्याचवेळी आकाशात पसरलेले मावळतीचे रंग बघत समुद्राच्या लाटांशी खेळत त्याच्या सहवासात हरवून जायचं आणि रात्री चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघूनच मग घरी जायचं. हे तिचं साधं सरळ स्वप्न. पण तेव्हा बरेचदा त्याला उशीर व्हायचा आणि मावळतीचे रंग बघायचे राहून जायचे. मग सहाजिकच तिची चिडचिड व्हायची. पण ही संध्याकाळ मात्र तिच्यासाठी खासच असते. तो आधीच आवरुन तयार होतो. तरी कुठलीही घाई न करता तो तिला तिच्या मनाप्रमाणे आवरु देतो. ती जेव्हा तयार होवून त्याच्यासमोर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरुन नजर न हटवता म्हणतो, "खूप छान दिसतेयस आज. असच बघत रहावसं वाटतय तुझ्याकडे”. त्याचं हे बोलण ऐकून ती चक्क लाजते. गेल्या कित्येक महिन्यात त्याने तिला अशी लाजलेली बघितलेलीच नसते. तो तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, "अशी लाजू नकोस नाहीतर समुद्र कॅन्सल करावा लागेल मला." ती पुन्हा लाजून त्याच्या मिठीत शिरते. एक क्षण तर तिला असं वाटत आपण स्वप्नात तर नाही ना?
" चला मॅडम निघुया आपण, नाहीतर सुर्यास्त होवून जायचा." त्याच्या या बोलण्याने ती भानावर येते. आणि त्याच्या मिठीतून बाजूला होते. दोघही रुममधून बाहेर पडतात. गाडीत बसल्यावर ती आठवणीने सिटबेल्ट लावते. तो सुखावतो.
समुद्रावर गेल्यावर दोघंजण खुप वेळ पाण्यात घालवतात. पाण्यातून फिरताना कधी सेल्फी , कधी सनसेटचे फोटोज, तर कधी एखादी मोठी लाट कॅमेरामध्ये कॅप्चर करायची धडपड, हे सगळं करता करता दोघहीजण एकमेकांमध्ये हरवून जातात. सुर्याचा गोळा आता पाण्यात पूर्णपणे बुडालेला असतो. ती दोघं जवळच्याच एका खडकावर बसतात. तिने पाहिलेलं 'रोमॅन्टिक इव्हिनिंगच' स्वप्न आज इतक्या वर्षांनी पूर्ण होत असतं. ती खूप खूश असते. काही क्षण शांततेत गेल्यावर ती त्याच्याकडे बघून म्हणते, "थॅक्स”.तो विचारतो, "कशाबद्दल?"
ती: अशी रम्य हवीहवीशी वाटणारी संध्याकाळ दिल्याबद्दल. खरं तर आजच्या पूर्ण दिवसासाठीच थॅंक्स.
तो: तू खुश आहेस ना ? माझ्यासाठी तेच खूप आहे.
काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर तो तिला म्हणतो, "सॉरी".
ती: आता हे काय मध्येच?
तो: गेल्या काही महिन्यात खूप दुर्लक्ष झालं तुझ्याकडे. खूप वेळा दुखावली गेलीस तू माझ्यामुळे. पण खरं सांगतो ग इतकं बिझी शेड्युल असतं आपलं कि आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही.संसाराचा गाडा रेटता रेटता मनातल्या भावना, हळूवारपणा रोमान्स सगळच हरवून गेलय कुठेतरी पण याचा अर्थ हा नाही कि आता माझं तुझ्यावर प्रेमच उरलं नाही. प्रेम तर आहेच अगदी पूर्वीइतकं किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त.
ती: (त्याचं बोलणं मध्येच तोडत) पण प्रेमाचं व्यक्त होणं कुठेतरी हरवून गेलय.
तो: अगं इतकी वर्ष झाली लग्नाला आता खरच गरज आहे का व्यक्त होण्याची? तू तर मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखतेस. माझ्या मनातलं तुला अगदी सहज कळतं. म्हणून मुद्दाम व्यक्त नाही केलं जात.i
ती: बुद्धीला पटतात रे या गोष्टी पण मनाचं काय ? मनाला तर कायमच गरज असते या साऱ्याची. खूप छान वाटतं हे ऐकताना कि कोणी आपल्यावर जिवापाड प्रेम करतं. सगळा शिण, ताण निघून जातो आणि एकदम प्रसन्न वाटू लागतं.
तो: पटलं तुझं म्हणणं मला. अगदी मनापासून पटलं. यापुढे अशी चूक नाही होणार; प्रॉमिस .
ती : "I am also sorry . चूका तर माझ्याकडून पण झाल्यात.
तो: बास ना आता. आपण इथे एकमेकांच्या चूकांची कबूली द्यायला नाही आलोय. जे घडायचं ते घडून गेलं. ते आता बदलता नाही येणार.जे झालं ते विसरुन जाऊया आणि जे क्षण मिळालेत ते आनंदात घालवूया. कितीतरी दिवसांनी फक्त दोघांचा असा वेळ मिळालाय आपल्याला.
ती: मग बोल ना काहीतरी रोमॅन्टिक....
तो: (हसून) ते रोमॅन्टिक होणं वगैरे नाही जमत मला पण एक सांगतो अगदी मनापासून ....
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य मी
आयुष्यच धरत नाही.
ती सुखावते आणि अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. आयुष्यातला सगळ्यात सुखाचा दिवस आज तिने अनुभवलेला असतो. थोड्या वेळाने ती त्याला विचारते, "निघुयात?" तो म्हणतो, थांबना थोडावेळ... त्याच्या या वाक्यावर दोघही हसतात. लग्नापूर्वीचे त्यांचे डायलॉग्ज आज एक्सचेंज झालेले असतात. ती म्हणते, "मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे”. "सांग ना मग" – तो.
तू सोबत असलास कि
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.....
तो तिचा हात हातात घेतो. पुन्हा नजरेचा नजरेशी संवाद होतो. दोन दुरावत चाललेली मनं आज पुन्हा जुळलेली असतात.
बाकी काही नको असतं नात्यांना फक्त थोडा वेळ हवा असतो आणि थोडी आपुलकी. बस एवढं दिलं ना कि बहरत जातं नातं..... आणि यासाठी हवा असतो एखादा विकएंड ब्रेक !
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment