काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकातल्या एका दुकानात गेले होते. दुकानात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे माझं पुस्तक मिळायला मला वेळ लागणार होता. मी जरा बाजूलाच थांबले. तिथे एका दुकानासमोर काही वाहने उलट सुलट पार्क केलेली होती. बाजूच्या दुकानातून एक "सुंदरा" बाहेर पडली आणि त्या अस्ताव्यस्त पार्किंगमधून स्वतःची ॲक्टिवा बाहेर काढायचा आटोकाट प्रयत्न करु लागली. समोरच चार/पाच कॉलेजकुमार उभे होते. त्यातला एकजण तिला मदत करायला पुढे सरसावला आणि तिला तिची गाडी पार्किंगमधून बाहेर काढून दिली. सुंदरा गोड हसून "थॅंक्स" म्हणाली.
"बास! याचसाठी केला होता सगळा अट्टाहास", असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले.
तो तिच्या गोड हसण्याकडे बघत कसबसं "ओह! दॅट्स फाईन मेंशन नॉट प्लीज”.. म्हणेपर्यंत ती निघूनही गेली होती. तो मात्र ती दिसेनाशी होइपर्यंत तिच्याकडे बघत राहिला.
थोड्या वेळाने तिथे एक मुलगा आला. या मुलीची गाडी पार्किंगमधून काढताना त्याच्या पल्सरचा बळी गेला होता. त्याची पल्सर अनेक गाड्यांचा चक्रव्यूहामध्ये अडकली होती. इथे प्रचंड उलथापालथ झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. शेवटी पाच मिनिटं अथक परिश्रम करुन त्याने त्याची पल्सर बाहेर काढली. त्या चार/पाच मुलांचा ग्रूप तिथेच मजा बघत उभा होता पण बिचाऱ्याच्या मदतीला कोणीही आलं नाही.
"स्त्री ही स्त्री ची शत्रू असते" हे ऐकलं होतं पण 'पुरुष हा पुरुषाचा शत्रू असतो', हे त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवलं. 😂😝
काही महिन्यांपूर्वी एका कामानिमित्त कोथरूडला गेले होते. परत येताना कॉलेजमधला एक मित्र भेटला. जुन्या आठवणी निघाल्या. बोलता बोलता म्हणाला, "इथे उन्हात उभं राहून बोलण्यापेक्षा कॉफी घेऊया का?"
मलाही वेळ होता म्हणून समोरच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मस्त कॉफी आणि सॅण्डविच घेऊन झाल्यावर वेटरने बिल आणून दिल. मी पर्समधून पैसे काढणार इतक्यात त्याने पटकन बिल दिलं आणि म्हणाला, “अग काय तू ? हे कॉलेज कॅंटिन नव्हे TTMM करायला." मी हसून लगेच पर्स बंद केली. स्त्री दाक्षिण्य का काय म्हणतात ते हेच असावं बहुदा.
काही दिवसांपूर्वी लेकीने मला सांगितल, "आई काल ना बसमध्ये माझ वरुणशी भांडण झाल. मी त्याच्याशी बोलत नव्हते तर कालपासून तो मला २० वेळा सॉरी म्हणाला. खरंतर मी त्याला कालच माफ केल होतं, पण तो कितीवेळा सॉरी म्हणतो ते बघायचं होतं मला." यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं मला.
लेकीने सांगितलेला दुसरा किस्सा ऐकल्यावर मात्र आपली लेक आता मोठी होतेय याची जाणीव झाली. त्या दिवशी घरी आल्यावर म्हणाली, "आई बॉइज काय एवढे पण वाईट नसतात जेवढे मला वाटत होते. आज माझा इरेझर मिळत नव्हता तर माझ्या बेंच पार्टनरने त्याच्याजवळचा extra इरेझर मला दिला. पुढची गम्मत म्हणजे नंतर मला माझा इरेझर मिळाला म्हणून मी त्याचा इरेजर त्याला परत दिला. नंतर मागच्या बेंचवरच्या मुलाने त्याच्याकडे इरेझर मागीतला. पण त्याने त्याला नाही दिला इरेजर आणि सांगितलं, 'आपल्या वस्तू आपण घेऊन यायच्या."
मनात आलं काल परवापर्यंत मुलींशी शत्रू असल्याच्या थाटात वावरणारे, मुलींशी भांडणारे मुलगे मुलींना कधी फेवर करु लागतात ते त्यांचं त्यांना पण कळत नसेल.
मध्यंतरी एका टिव्ही शो मध्ये एक वाक्य ऐकलं होतं, "पुरुषप्रधान संस्कृती म्हणता म्हणता पुरुष प्रधानच बनून राहिले आणि स्त्रीया मात्र राण्या बनून राज्य करु लागल्या." हे वाक्य पटलं नाही पटलं हा मुद्दा वेगळा. पण ज्या पद्धतीने प्रधान आणि राणीचा संदर्भ जोडला ते बघता हे वाक्य मला खूप आवडलं.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment