संपली एकदाची परीक्षा!
आता सुट्टी!
माझ्यासाठी एक परीक्षा संपली दुसरी सुरु झाली. आता पसारे, मस्ती, धुडगूस, सगळं चालू.
सुदैवाने आमच्या सोसायटीमध्ये लेकीच्या वयाची भरपूर मुलं आहेत त्यामुळे "सुट्टीत काय?" हा प्रश्न मला अजिबात पडत नाही. वेगवेगळे खेळ, भांडणं,छोट्या पार्टीज आता सुरु होतील.
उन्हाळी सुट्टी लागली की हमखास nostalgic व्हायला होतं. आजकाल मुलांना खेळायला वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत. आमच्या वेळी कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, नवा व्यापार एवढेच गेम आम्हाला माहिती होते. त्यात पत्ते सगळ्यांच्या आवडीचे. खेळायला मेंबर्स जास्त असल्यामुळे बाकीच्या इतर खेळांपेक्षा पत्ते जास्त खेळले जात. मेंढीकोट, लॅडिज, झब्बू, बदाम सात किती प्रकार खेळायचो आम्ही. दिवसा पत्ते, संध्याकाळी क्रिकेट किंवा समुद्र. समुद्रावर जायच म्हणजे भेळ खाल्लाशिवाय परत यायच नाही असा जणू नियमच होता. पुन्हा रात्री पत्ते.. खेळताना भांडणं ,पत्ते फेकणं, रडारड हे सगळ अनेकदा घडायच. मग घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती या भांडणांमुळे वैतागून खेळ बंद करायची. मग कॅरम किंवा बाकीचे डाव मांडले जायचे.
आमच मुळ घर देवगडला त्यामुळे आईच्या शाळेला सुट्टी लागली की आम्ही तिकडे जायचो. तिकडे गेल्यावर नुसती धमाल असायची. सकाळी निरशा दुधाचा चहा घेऊन आजीबरोबर रतांबे(कोकम) किंवा काजू गोळा करायला जायच. दुपारी बारा वाजता नैवेद्य झाला की हसत खेळत जेवणं व्हायची. जेवणात जवळपास रोजच आमरस असायचा. "पानात वाढलेल काही टाकायच नाही" हा नियम ठरलेला. या नियमामुळे मात्र मी एकदा रडत रडत वांग्याची भाजी पाण्याबरोबर अक्षरशः गिळली होती. जेवणानंतर मग झोपाळ्यावर बसून गप्पा रंगायच्या. आठवड्यातून दोन दिवस आंबे घेऊन जाणारा ट्रक यायचा; मग दुपारी आंबा कॅनिंगच्या ठिकाणी कोणालातरी जबरदस्तीने(?) पाठवल जायच. बहुतेक वेळा यात मिच सापडायचे.
घरी सतत कोणी ना कोणी येत असायच. मला वाटत, मी पुण्यात जेवढा चहा एका महिन्यात करते तेवढा चहा देवगडच्या घरी एका आठवड्याला करत असतील. एखाद्या वेळी गावातल एखाद नमुना कॅरॅक्टर घरी येई आणि आमची भरपूर करमणूक होत असे.
संध्याकाळी क्रिकेटपासून अगदी खांब-खांब पर्यंत अनेक खेळ खेळायचो . भांडण झाली की खेळ थांबायचा. मग थोड्या वेळाने अंताक्षरी रंगायची. कधीकधी बाहेर फिरायला जायच आणि येताना करवंद, जांभळ गोळा करुन घरी यायच. त्यातली निम्मी-अधिक करवंद वाटेतच खावून संपलेली असायची.
दिवेलागणीच्या वेळी झोपाळ्यावर बसून शुभंकरोती, रामरक्षा, (लहान असताना तर पाढेही ) हा एक मोठा कार्यक्रम असे. आठ साडेआठच्या दरम्यान रात्रीच जेवण झाल्यावर पुन्हा अंगणात बसून गप्पा रंगत. मी आणि माझी आत्ये बहीण तर अंथरुणावर पडल्यावरही खूप वेळ गप्पा मारत बसयचो. अर्थात यावरुन कित्येकदा बोलणी खाल्ली आहेत. अशा लिहिण्यासारख्या खूप आठवणी आहेत.
आता प्रत्येकजण आपाआपल्या व्यापात अडकल आहे . लहानपणी भांडणं सोडवताना मावशी म्हणायची, "आत्ता एवढ भांडताय, पुढे लग्न झाल्यावर एकमेकांना भेटायची दूरच पण बघायची इच्छा झाली तरी ते ही शक्य होणार नाही." खरच आज असच घडतय. सगळ्यांनी एकत्र जमण्यासाठी ठरवून प्लॅनिंग कराव लागतय. अस वाटत जसजस आपण मोठं होत जातो तसतस #सहज सोप अस काही घडतच नाही आयुष्यात.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment