चैत्र पाडव्याचा दिवस होता. संध्याकाळी तो आणि ती गच्चीवर बसून भविष्याची स्वप्न रंगवत बसलेले होते.
अचानक ती त्याला म्हणाली, "नको ना जाऊस आज. बघ तू आज जाशील आणि उद्या मला ॲडमिट केलय म्हणून फोन येइल आणि उद्या लगेच तुला निघावं लागेल."
तो हसून म्हणाला, "अगं जावं लागेल मला मार्च महिना आहे. आत्ता रविवारला जोडून सुट्टी आली म्हणून जमलं यायला. पुढे रजा लागतील त्यामुळे आत्ता रजा नाही घेता येणार."
"बघ हा मी आधीच सांगितलय तुला. नाहीतर नंतर म्हणशील मी सांगितल नाही म्हणून," ती.
"बरं मॅडम निघतो मी आता मला निघावं लागेल”, तो हसून म्हणाला.
"थांब ना थोडावेळ आजचा दिवस फक्त माझ्या एकटीचा हक्क आहे तुझ्यावर. पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्या हक्कात कोणीतरी वाटेकरी आलेल असेल", ती.
"वेडी आहेस तू खरच! खरं सांगू माझाही पाय निघत नाहीये ग. पण ऑप्शन नाही. जायलाच हवं मला आणि कोणीतरी नाही हा; एक गोड परी आलेली असेल," असं म्हणून तो जायला निघाला. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तिला सुखरुप घरी पोचल्याचा फोन केला. घरात तिची आई आणि ती दोघीच होत्या. बाबांची ट्रान्सफर मुंबईला असल्यामुळे आणि भावाचं ट्रेनिंगही नेमकं त्याचवेळी मुंबईला आल्यामुळे, दोघही आदल्या रात्रीच मुंबईला गेले होते.
सकाळी चहा घेऊन झाल्यावर तिने कशीबशी एक पोळी खाल्ली. घशाशी प्रचंड जळजळ होत असल्यामुळे तिला काहीही खायची इच्छाच होत नव्हती. थोड्यावेळाने तिच्या कंबरेतून बारीकशी कळ आली. पण तिने दुर्लक्ष केलं. पुन्हा 10/15 मिनिटांनी अजून एक कळ आली. तरीही ती काहीच बोलली नाही. तिसऱ्या वेळी मात्र जरा जोरात कळ आली. आता मात्र तिने आईला सांगितले.
आई म्हणाली, "उगाच रिस्क नको, दिवस भरत आले आहेत. आपण डॉक्टरांकडे जाऊया. नेमक घरात कोणी नाहीये".
"आई काळजी करु नकोस मी रिक्षा स्टॅंडपर्यंत चालत येते. जाऊया आपण", ती शांतपणे म्हणाली.
डॉक्टरांनी तपासलं आणि लगेचच ॲडमिट करुन घेतलं.
"आत्ता कुठे सुरुवात आहे संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होइल. काळजी करु नका व्यवस्थित आहे सगळ", असं बोलून डॉक्टरनी आईला धीर दिला.
मॅडम 'प्रायव्हेट' रुम आत्ता अवेलेबल नाहीये. आत्ता तुम्हाला 'सेमी प्रायव्हेट रुम' देते. संध्याकाळी मिळेल 'प्रायव्हेट रुम', नर्सच्या या वाक्याने आईला पुन्हा टेंशन आलं.
"आई ठिक आहे नो प्रॉब्लेम. मी करेन ॲडजस्ट", ती शांतपणे म्हणाली आणि आई निर्धास्त झाली.
आईने त्याला फोन करुन तिला ॲडमिट केल्याचं सांगितल. त्याला संध्याकाळच तिचं बोलणं आठवल आणि मनापासून हसायला आलं.
तिला ॲडमिट करुन सलाईन लावण्यात आल. तिच्या आईने कोणी तरी मोठं हव हव म्हणून स्वतःच्या काकूला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. सेमी प्रायव्हेट रुममध्ये दोन्ही डिलिव्हरी झालेल्या स्त्रीया होत्या.
तिला सतत त्याचं वाक्य आठवत होतं, "कोणीतरी नाही एक गोड परी येणार आहे....." समोरच्या बेडवरच बाळ रडू लागल. त्या पेशंटच्या नातेवाईकानी नर्सला बोलावल. नर्स आतमध्ये आली आणि बाळाला ड्रॉपरने दूध पाजू लागली. हा काय प्रकार आहे. कोणालाच कळत नव्हतं. नर्सने सांगितल, "त्या बाळाला जीभेच्या वरची टाळूच नाहीये..."
हे ऐकून तिला धडकी भरली... , "देवा मुलगा किंवा मुलगी कोणीही होवूदे पण हेल्थी असूदे ..,अशी तिने देवाकडे मनोमन प्रार्थना केली.
दुपारनंतर चारच्या सुमारास तिला लेबररुममध्ये नेण्यात आलं. जीवघेण्या कळा येत होत्या. सगळ सहन करत होती ती. असिस्टंट डॉक्टर, नर्स सगळेजण तिला धीर देत होते. जरा वेळाने असिस्टंट डॉक्टरने तपासल आणि तिच्या लक्षात आलं , बाळाचे ठोके कमी झाले आहेत. तिने लगेच डॉक्टरना फोन लावला. डिलिव्हरी नॉर्मल होण्यासारखी वाटत होती म्हणून डॉक्टरनी सांगितल पेशंटला ऑक्सिजन लाव. तिच्या आईला लेबर रुममध्ये आत बोलावण्यात आलं. ज्या मुलीला कधी साध सलाईन लावलेलही बघितल नव्हतं त्या मुलीला ऑक्सिजन लावलेला बघून मात्र आई थोडीशी घाबरली.
ऑक्सिजन लावूनही काही फायदा झाला नाही . अखेर डॉक्टरनी सिझरचा निर्णय घेतला. थोड कॉंप्लिकेशन आहे हे आईला स्पष्ट जाणवत होतं. आईने थरथरत्या हाताने फॉर्मवर सही केली.
ऑपरेशन थिएटरमध्ये लगबग चालू झाली आणि अखेरीस 4. 55 ला एक गोंडस परी जन्माला आली. मुलगी झाली हे ऐकताक्षणी ती खूदकन हसली. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
रात्री निघायच म्हणून तो ऑफिसमधून जरा लवकरच निघाला. वाटेतच त्याचा मोबाईल वाजला. त्याने गाडी बाजूला लावून फोन घेतला. मुलगी झाल्याच कळताक्षणी प्रचंड आनंद झाला. 'या क्षणाला आपण तिकडे का नाही', असं त्याला सारखं मनातून वाटत होतं. त्याला आदल्या रात्रीच तिच बोलण आठवून हसायला आलं. त्याला आता त्याच्या प्रिंसेस ला बघायची घाई झाली होती.
आज तिच प्रिंसेस अकरा वर्षांची झाली. तुझ्या आयुष्यात तुला सगळी सुखं मिळूदेत; वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चिन्मयी...
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment