आत्ता घडलेला ताजा किस्सा
संध्याकाळी भाजी मंडईबाहेर दोन अल्ट्रा मॉडर्न मॉम्सचा संवाद ऐकण्याचा दुर्मिळ योग आला .
-Hi ! after long time. परवा ओपन हाऊसला(पेरेंट्स मिटिंग) पण नव्हतीस तू.
-हो अग या वीकेंडला आउटिंग जायचं आधीच ठरलं होतं आमचं.
-अंशू कुठाय ?
-तो काय तिकडे गाडीवर बसलाय; त्याचा फेव्हरेट गेम खेळत. आज Children Day आहे ना, मग मला म्हणाला आज गिफ्ट म्हणून मला XXXX गेम डाउनलोड करुन दे.
-How Sweet!
-काय झालं ग मिटिंगला
-काही नाही नेहमीचच मुलांची रिडिंग हॅबिट डेव्हलप करा. त्यांच्या हातात मोबाईल नको तर स्टोरी बुक्स द्या. आता ही मुलं होमवर्क करताना मारामार स्टोरी बुक्स कुठून वाचणार?
-हो ना यार सिरिअसली. मागे मी विचारलं kindle वर काही बुक्स आहेत का? तर म्हणाल्या E-book नको. आता Gadgets वापरली तर चांगलच आहे ना. पण जुनाट विचारातून बाहेरच येत नाहीत.
-नुसतच दाखवायच ग आमची शाळा किती मॉडर्न आहे . प्रत्यक्षात सगळ्या जुन्या मेथडच वापरतात
हा सगळा संवाद चालू असताना ६/७ वर्षांचा मुलगा मात्र गेममध्ये तल्लीन झाला होता. आजूबाजूच्या जगाचं त्याला अजिबात भान नव्हतं. संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात कशी काय रमतात तेच कळत नाही. आमच्या सोसायटीमधली मुलं संध्याकाळी पार्किंगमध्ये खेळत तरी असतात किंवा भांडत तरी असतात. पण खेळ म्हटला की भांडणं आलीच. त्यामुळे आम्ही कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. असो. बाकी या अल्ट्रा मॉडर्न मॉम्सनी कितीही अक्कलेचे तारे तोडलेले असले तरीही E-books नको सांगणाऱ्या आणि मुलांना वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करणाऱ्या त्या टिचरचं मात्र मला मनापासून कौतुक वाटलं.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment