फेसबूकमॅनिया
कोकणातल्या एका गावात एक सदानंदराव नावाचे सद्गृहस्थ रहात होते. कोकणात असतं तसं मोठं कौलारू घर, मागच्या दारी नारळा पोफळीच्या बागा आणि दूरवर नजर जाईपर्यत दिसणारी आंब्याची बाग. या सगळ्या वैभवाचे ते एकटेच मालक. कोकणात दिसते तशी भाऊबंदकी यांच्या वाट्याला कधी आली नाही. शिवाय चांगली सरकारी नोकरी. लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही यांच्यावर खुश होत्या. लोकं त्याना अण्णा म्हणत. तर अशा या अण्णानी व्हीआरएस घेतली. घरी दारी सतत गडी माणसांचा राबता. बागेतही कामाला बारा महिन्याचे गडी ठरलेले. ऑफिसमध्ये सतत कामाची सवय असणाऱ्या अण्णांचं मन काही घरात रमेना. सहाजिकच त्यांची चीडचीड वाढली. या साऱ्याचा परिणाम म्हणजे गडी माणसे तर वैतागलीच पण त्यांची बायकोही कंटाळली. ऑफिसला जात होते तेच बरं होतं असं काहीसं पुटपुटत बसायची. त्यांच्या कॉलेजला शिकणाऱ्या मुलाचा तर त्यांनी जीव नकोसा करून टाकला होता.
एक दिवस त्यांचा मोबाईल हौदात पडला आणि त्याने मान टाकली. पण त्यांच्या कॉलेजकुमार मुलाने मात्र या संधीचा फायदा उठवत आपला स्मार्टफोन त्यांना देण्याचा मोठेपणा दाखवला. अण्णांना सुरुवातीला हा स्मार्टफोन काही वापरता येईना . चिरंजीव येथेही मदतीला धावाले. फोन वापरायला तर शिकवलाच शिवाय व्हॉट्स ॲप, फेसबुकची ओळख पण करून दिली. अण्णा खुश झाले. त्यांना हे व्हॉट्स ॲप, फेसबुक फारच आवडले. चिरंजीवानी संधी साधून नवीन फोनची डिमांड केली आणि खुश झालेल्या अण्णानी ती लगेच पूर्णही केली. अण्णाना फेसबुक मात्र फारच आवडले. सहाजिकच मोबाईल डेटा पुरेना त्यामुळे घरात इंटरनेट आले. चिरंजीव सुखावले, गडी माणसेही कटकट बंद झाल्याने खूश झाली. अण्णाची बायको तर फेसबुकला देवच मानू लागली. एकंदरीतच सगळी सुखावली.
अण्णांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. त्या ग्रूपवर ते काही बाही लिहू लागले. मुळात हुशार असणाऱ्या अण्णांचे लेखनकौशल्यही अगदी उत्तम होते. त्यांचे लेख खूप जणांना आवडू लागले. शेअर होऊ लागले. हळूहळू अण्णांच्या ग्रूपमध्ये मेम्बर्सची संख्या वाढत गेली. त्यात तरुण तरुणींचीही संख्याही लक्षणीय होती. अण्णांची लोकप्रियताही वाढत होती. असंच वर्ष सरलं. अण्णांचा मुलगा शिक्षणासाठी मुंबईला निघून गेला. घरात काही मदत लागली तर ती करणारा मुलगा मुंबईला गेल्याने अण्णांच्या बायको बिचारी एकटी पडली. हाताशी मदतीला कोणीच नव्हते. त्यात अण्णा सदानकदा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेले. बिचाऱ्या मनातल्या मनात मोबाईल आणि फेसबुकला शिव्यांची लाखोली वाहत असत. कालचा देव त्यांना आज दानव वाटू लागला. अण्णा वयाने मोठे असल्याने आणि फेसबुक ग्रूपमध्ये लोकप्रिय असल्याने अनेक तरुण तरुणी मेसंजरवर आपले प्रोब्लेम्स त्यांच्याशी शेअर करत, सल्लेही मागत. अनेकांच्या प्रेमकथा अण्णांना ठाऊक होत्या. अण्णांनी ग्रूपचे संमेलनही भरावले. त्यात मात्र त्यांच्या पत्नीला मिरवायला मिळाले. पण अण्णांभोवती पडलेला तरुणींचा गराडा बघून मात्र त्या संतापल्या आणि घरी गेल्यावर ब्रम्हास्त्र काढलं (आता ते कोणतं हे काही सांगायची गरज नाही).
अण्णांचा फेसबुकवरचा वावर कमी झाला. पण अण्णांना काही चैन पडेना. ते चोरून लपून शक्य तेव्हा फेसबुक चेक करायचे. हळूहळू रात्री पत्नी झोपाल्याची खात्री करून निर्धास्तपणे फेसबुक वापरू लागले. काही दिवसाने त्यांच्या मुलाने त्यांना कॅम्पसमधून सिलेक्शन झाल्याची बातमी दिली व कॉलेज मधलीच एक मुलगी पसंत केल्याचेही घाबरत घाबरत सागितले. हा धक्का पचातोय न पचातोय तोच दोन दिवसात तिला घरी घेऊन येत असल्याचेही सांगितले. अण्णांच्या पत्नी तर डोक्याला हात लावून बसल्या.
"मुलगी कोकणस्थ असेल का हो?' सौभाग्यवतीच्या या प्रश्नावर अण्णा उखडलेच.
"अग कोकणस्थ कुठली घेऊन बसलीस आपल्या धर्मातली असली तरी खूप झालं." अण्णा गरजले. "काय???.........." सौभाग्यवतीना रडू आवरेना.
दोन दिवस स्मशान शांततेत गेले. अण्णांनी दोन दिवसात फेसबुकला हातही लावला नाही. अखेर दोन दिवसांनी अण्णांचे चिरंजीव एका हाफ पॅन्ट घातलेल्या तरुणीला घेऊन आले. तिला बघून तर अण्णांच्या पत्नीने तोंडाला पदर लावला. "हे आमचे अण्णा ...चिरंजीवांनी ओळख करून दिली.
"तुम्ही xxxx ग्रुपचे ॲडमिन सदानंदराव ना? त्या तरुणीने विचारताच सगळ्यांचेच डोळे विस्पारले. सौ नी तर अण्णांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.
अण्णांनी होकारार्थी मान हलवली.
"wow........thats great ". मला तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता होती. तुमचं प्रोपिक बघितलेलं असल्यामुळे मी आज तुम्हाला चटकन ओळखल. मी संमेलनाला पण नाही येऊ शकले."
ती तरुणी उत्साहात बोलत होती. बोलता बोलता अण्णांच्या चिरंजीवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "डार्लिंग यांच्यामुळेच आपल जुळलं .....तुला पटवायचे सगळे सल्ले यांनीच मला दिले....
परत अण्णांकडे बघत म्हणाली ,"मी तुम्हाला परवा रात्रीपासून किती मेसेजेस केले. हे सांगायला की मी आज माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाणार आहे. मला काही टिप्स हव्या होत्या तुमच्या. पण दोन दिवस तुम्ही ऑनलाईन आलाच नाहीत. खूपच अपसेट झाले होते मी. but ......I am so happy now . ohh God I cant believe its you .......तुम्ही माझे "फादर इन लॉ" होणार...........हाऊ स्वीट! असं म्हणत त्या तरुणीने चित्कारत अण्णांना जवळपास मिठीच मारली.
थोबाडीत मारल्यासारखी अण्णांची अवस्था झाली होती . सौभाग्यवतीच्या नुसत्या जळजळीत कटाक्षाने अण्णांचं अंग होरपळून गेलं. याक्षणी त्या अण्णाना पारावरच्या जखिणीप्रमाणे भासत होत्या. चिरंजीव मात्र बिचारे या साऱ्याकडे आवासून बघत राहिले.
©मानसी जोशी

छान सुरुवात. पण काही कमी पडतंय असं जाणवलं. कदाचित तुझे मोठे लेख वाचायची सवय आणि हा त्यामानाने खूप कमी लांबीचा..
ReplyDeleteमी कदाचित चुकीचा असेन, पण मोठाल्या फ्लॅट (मोठे लेख वाचायची सवय) मधून लहान फ्लॅट मध्ये यावं आणि खोलीत शिरावं तर खोली संपलेली.. फ्लॅट चीही आणि लेखाचीही (deepness).
हा लेख तू शक्य झाल्यास अजून फुलवावास पुढे हि4 नम्र अन आग्रहाची विनंती ��
~ केसंविदि
Thanks
ReplyDelete